यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे
युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन...
दि. १४ : अनेक हुतात्म्यांच्या योगदानामुळेच
आपल्याला हे स्वातत्र्य अनुभवायला मिळालं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यदिन हा
प्रत्येक भारतीयाच्या मनातील हुतात्म्यांच्या कार्याप्रती स्मरण करण्याचा हा
अभिमान दिन आहे. हा दिन प्रत्येक भारतीयाने आपापल्यापरीने साजरा केला पाहिजे हे
देखील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. याच जाणिवेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियान व विश्वास ग्रुपतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या
पूर्वसंध्येला युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ‘युवा
स्वतंत्रता ज्योत रॅली’,
गुरूवार, १४ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता
हुतात्मा चौक,
गंगापूर रोड (प्रारंभ) - के.टी.एच.एम. महाविद्यालय - अशोकस्तंभ
- मेहेर सिग्नल - हुतात्मा स्मारक (सीबीएस) येथे रॅलीचा समारोप होणार आहे.सदर
युवा स्वतंत्रता ज्योत रॅली ज्या सामाजिक, संघटना, संस्थांना
स्वत:चे बॅनरसह सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी विवेकराज ठाकूर ९०२८०८९०००, मंदार ठाकूर ९१५८६३५९५१, भूषण
काळे ९६५७४३९८३३,
कैलास सुर्यवंशी ७७२००५२५९२, अभिजीत
साबळे ९५०३३६२६७६ यांचेशी संपर्क साधावा.
तरी
या रॅलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष
विनायक पाटील,
कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव
डॉ. कैलास कमोद,
कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य
सौ. कविता कर्डक,
रऊफ पटेल, अॅड. नितीन ठाकरे, राजवर्धन कदमबांडे, विक्रम मोरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment