Friday, 28 September 2018

मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी आणि मोजमाप शिबीर

यशवंतराव चव्हाण प्रतिशष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे, महात्मा गांधी सेवा संघ आणि स्टार्की फाऊंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी आणि मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरसी ग्रुप मुंबई, टाटा ट्रस्ट, मुंबई, एस. आर. व्ही. ट्रस्ट मुंबई यांच्या विशेष सहकार्याने हे शिबीर रविवारी ३० सप्टेंबर २०१८ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत नु. म. वि प्रशाला ह. दे प्रशाले शेजारी, सोलापूर येथे हे शिबीर होईल. 

विनामूल्य रांगोळी कार्यशाळा

रांगोळी म्हणजे प्रसन्नता, सकारात्मक व भारतीय संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब असं चित्र लगेच डोळ्यांसमोर चटकन उभं राहतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "मंजिरीच्या झटपट रांगोळ्या व रांगोळी काढायच्या सोप्या व विविध पद्धती" या विषयावरती प्रशिक्षणार्थींच्या आग्रहाखातर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २० ऑक्टोबर २०१८ शनिवारी दुपारी २ ते ५ यावेळेत  बेसमेंट सभागृह, वाय बी  सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ, मुंबई २१ कार्यशाळा होईल. अधिक संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, ऑफीस २२०४५४६० (२४४). 

Thursday, 27 September 2018

ठाणे विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील काही निवडक ज्येष्ठांचा, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मा. महेश झगडे, आय. ए. एस. निवृत्त प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, तर श्री. विश्र्वंभर दास, डॉ. दामोदर खडसे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्री. अरबिंद हेब्बार आणि डॉ. भगवान नागापूरकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. सत्कारानिमित्त मुकेश, किशोर कुमार, लता, आशा यांच्या काही निवडक गाण्यांचा खास कार्यक्रम आयोजीत केला आहे.

हा कार्यक्रम मंगळवारी २ ऑक्टोबर २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका ठाणे (प) येथे सुरू होईल. रोटोरीयन दिलीप दंड, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, रोटेरीयन अॅड. विशाल लांजेकर, सचिव, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, अमोल नाले, सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्र, आणि मुरलीधर नाले अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्र यांनी अधिक संख्येने लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. 

Wednesday, 26 September 2018

डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सर्व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा विभाग शिक्षण विकास मंच मागील ६ वर्षांपासून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे चव्हाण सेंटर आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना ‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार दि. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाकडून उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तकं मागविण्यात आले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापन पध्दती, शालेय उपक्रम, समाजाचा सहभाग, शैक्षणिक प्रशासन अशा विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असावे.

तसेच शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना त्यात मांडलेल्या असाव्यात. हे पुस्तक दि. १ ऑक्टोबर २०१७ ते दि. ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. तरी संबंधित प्रकाशकांनी/लेखकांनी सदर ग्रंथाच्या दोन प्रती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१. येथे पाठवाव्यात अशी विनंती डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजकशिक्षण विकास मंच यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. माधव सूर्यवंशी – ९९६७५४६४९८ श्री. रमेश मोरे – ९००४६५२२६२

Monday, 24 September 2018

वाहतूक सुरक्षा कार्यशाळा संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, सारथी सुरक्षा, सहा महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने ६, ७, व ८ सप्टेंबर २०१८ रोजी वाहतूक सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन सोलापूरातील सहा महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.

६ सप्टेंबर २०१८ रोजी संगमेश्वर येथील महाविद्यालयामध्ये पहिली कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत २५० विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी सहभाग घेतला,  सौ. राजमान्य यांनी कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती वैशाली शिदे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर यांचा सत्कार केला त्यानंतर सारथी सुरक्षा या संस्थेचे प्रमुख श्री.विनय मोरे आणि त्यांचे सहकारी आनंद राजेभोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच विभागीय केंद्राचे सदस्य श्री दत्ता गायकवाड यांचा देखील प्राचार्यांनी सत्कार केला.

 प्रा. श्री. मोहोरकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. त्यानंतर सारथी सुरक्षाचे विनय मोरे यांनी कार्यशाळेस प्रारंभ केला आणि आपल्या व्याख्यानातून रोज सरासरी ४०० अपघात आपंल्या देशामध्ये होतात आणि त्याची कारणे अनेक असल्याचे त्यांनी सांगितले. १८ ते ४० वयोगटातील नागरिकाचे अधिक बळी जातात. ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाच्या निमंत्रक खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी राज्यातल्या महाविद्यालयामध्ये जाऊन तरुण व तरुणींना याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

संवाद स्वरुपात कार्यशाळा पार पडल्या त्यामुळे गंभीर आणि करमणूक याची जोड या कार्यशाळेत जाणवली. वाहतुकीचे नियम नीट समजावून सांगितले. फुटपाथ वरूनच का चालावे तसेच फुटताथ नसल्यास कोणती काळजी घ्यावी आणि न घेतल्यास कशाप्रकारे अपघात होऊ शकतात याची माहिती सुध्दा त्यांनी दिली. त्याचबरोबर वाहन चालवताना वेग,वाहतुकीचे नियम का पाळले जावेत तसे न केल्यास कोणत्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे अपघात कसे होतात याची माहिती व्याख्यानातून आणि दृकश्राव्याच्या माध्यमातून विनय मोरे यांनी करून दिली. अपघात टाळण्यासाठी किती बारकाव्याने काळजी घेतली पाहिजेयाचे विस्तृत विवेचन श्री.विनय मोरे यांनी आपल्या २ तासांच्या व्याख्यानातून दिले. संवादाच्या माध्यमातून अनेक शंका आणि नियम व कायदे याबाबत विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अनेक प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या.

त्यानंतर प्रमुख पाहुणे मा.वैशाली शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांनी मार्गदर्शन केले. आणि मोलाच्या सूचना दिल्या. तसेच तरुण पिढी हि देशाची संपत्ती आहे. आपण सर्वजण याच वयोगटातले आहात वाहतुकीचा कायदा असो अथवा इतर कायदे किंवा नियम आपण जरूर पाळले पाहिजेत. एक चांगला नागरिक म्हणून या देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे म्हणूनच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम आयोजीत केल्याचे सोलापूर विभागीय केंद्राचे सदस्य श्री.दत्ता गायकवाड यांनी याप्रसंगी सांगितले.
दि.०७ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी वि. गु. शिवदारे कला व विज्ञान महाविद्यालय दुपारी शंकरराव पाटील विज्ञान महाविद्यालय अनगर ता. मोहोळ व सायंकाळी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय येथे सदर कार्यशाळा संपन्न झाली. दि.०८ सप्टेंबर रोजी सकाळी नागेश करजगी ओरचीड महाविद्यालय आणि दुपारी कुचन महाविद्यालय येथे ही कार्यशाळा संपन्न झाली.

सप्टेंबर ६, ७, ८ या तीन दिवसात सहा महाविद्यालयात एकूण सहा कार्यशाळा संपन्न झाल्या हा तीन दिवसांचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा.मोहोरकर, शिवदारे महाविद्यालयाच्या प्रा.सौ.शिवपूजे, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्रा. गवळी, ओरचीड महाविद्यालययाचे प्रा. राजाराम चव्हाण तर कुचन महाविद्यालयाचे प्रा.निंबाळकर आणि तात्या महाविद्यालायाचे प्राध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सारथी सुरक्षाचे आनंदराजे भोसले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, प्रशांत बाबर आणि दत्ता भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.

Monday, 17 September 2018

सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - २०१९

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय
सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - २०१९
साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व 
नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम...
दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्‍या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे अठरावे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्‍या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०१७ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनीशी दिलेल्या फॉर्मवर भरुन शनिवार दि. १ डिसेंबर २०१८ च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई - २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये ०२२-२२०२८५०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा मनिषा खिल्लारे (९०२२७१६९१३) व मिनल सावंत (८४२४०७३३२२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.
डाऊनलोड माहितीपत्रक व फॉर्म
१) राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार अर्ज - https://goo.gl/RiHYtM
२) राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार नियमावली - https://goo.gl/vJ5Lnj
३) राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार अर्ज - https://goo.gl/z8a8Us
४) राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार नियमावली - https://goo.gl/EU2k7T

Thursday, 13 September 2018

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘पेशन्स स्टोन’

नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १५ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतिकी रहीमी यांचा ‘पेशन्स स्टोन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.

अफगाणिस्तानमध्ये घडलेली ही एक नाजूक आणि हृदयद्रावक कहाणी आहे. एक स्त्री आपल्या मूक पतीजवळ तिच्या जगण्याचा रहस्यमय, रोमांचकारी सत्यप्रवास कथन करते. त्यातूनच हा चित्रपट पुढे सरकत जातो. यात स्त्रीचे बालपण, एकाकीपण, तिची अपूर्ण स्वप्ने, इच्छा आकांक्षा मांडते. नात्यामधील असलेली जगण्याची आस आणि प्रेमभावना याचे विलक्षण मिश्रण यात आहे.

सन २०१२ मध्ये अफगाणिस्तान येथे प्रदर्शित झालेल्या या पर्शियन चित्रपटाचा कालावधी १०० मिनिटांचा आहे.

हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Tuesday, 11 September 2018

'बलुतं'ची चाळीशी

आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा
अन क्रांतीचा जयजयकार करा...

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) आणि ग्रंथाली वाचक चळवळ.....
आयोजित

'बलुतं'ची चाळीशी

कधी - गुरुवार, २० सप्टेंबर २०१८
सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत
कुठे - रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

सविस्तर तपशिल लवकरच..


Thursday, 6 September 2018

विज्ञानगंगाचे तिसावे पुष्प कृत्रिम बुध्दिमत्ता

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत तिसावे पुष्प शास्त्रज्ञ सचिन सातपुते यांचे कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि २१ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

बालाजी सुतार यांच्या कथेवर, कवितांवर आधारीत ‘गावकथा’ नाट्य-सादरीकरणाचा ९ सप्टेंबरला प्रयोग....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत, गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे ‘गावकथा’ हा बालाजी सुतार यांच्या कथांचे, ललित गद्याचे अंश आणि कविता यांच्यावर आधारित संहितेच्या नाट्य-सादरीकरण प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.हा नाट्यप्रयोग सध्या राज्यभर गाजत असून मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत या कार्यक्रमाचे प्रयोग झालेले आहेत.ग्रामीण महाराष्ट्रातील गाव-खेड्यांचा भोवताल, मागच्या दोन-तीन दशकांत अतिशय झपाट्याने बदलून गेला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्यभानाचा र्‍हासही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीची बिकट अवस्था, स्त्रियांचं अवघड आयुष्य, दिशाहीन तरूणाई आणि मूल्यविहीन ग्रामीण राजकारण अशा अनेक अंगांनी गावाचा वेध घेणारी ही रंगमंचीय मांडणी आहे. ‘रंगदृष्टी, पुणे’या संस्थेने या प्रयोगाची निर्मिती केली असून संजय मोरे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. प्रयोगाला मयुर मुळे, दीप डबरे यांचे संगीत असून, संगीत साथ शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांनी केली आहे. यामध्ये संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, हर्षा ए.जी., अरबाज मुलानी आदी एकूण १६ कलाकारांचा चमू असून प्रयोगाचा वेळ साधारणपणे ऐंशी मिनिटांचा आहे. प्रवेश सर्वासाठी खुला असून नाट्यरसिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काव्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, डॉ. श्रीरंग देशपांडे, स. भु. कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, बिजली देशमुख, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. मुस्तजीब खान, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, एमजीएम फिल्म आर्ट विभाग प्रमुख शिव कदम, सुबोध जाधव,गणेश घुले,मंगेश निरंतर,श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार,श्रीराम पोतदार आदींनी केले आहे

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी ८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मो. ह. विद्यालय ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक आणि संवादक प्रा. दीपा ठाणेकर या असतील. 

सौ. वंदना मिश्रा चतुर्वेदी, सौ. प्राजक्ता पं सामंत, श्री. भगवान दत्तात्रय चक्रदेव, श्री. नरेंद्र वाबळे आणि डॉ. मृदुला निळे या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ठाणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुसकर आणि सचिव अमोल नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी युनिक आयडी कार्ड (स्वालंबन कार्ड) नोंदणी शिबीराचे आयोजन


परभणी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, समाज कल्याण विभाग, जि. प. परभणी व महात्मा गांधी सेवा संघ परभणी संचलीत अपंग पुनर्वसन केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यामाने परभणी जिल्ह्यातील अपंग व्यक्तींसाठी "स्वालंबन कार्ड/युनिक आयडी कार्डची ऑनलाईन नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ सप्टेंबर २०१८ रोजी जि. प. कन्या प्रशाला, स्टेशन रोड, परभणी येथे सकाळी ११ वाजल्या पासून ते सायंकाळी ४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. तरी कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र, आधार कार्ड, सही/अंगठा, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, फोटो इत्यादी कागदपत्रे घेवून उपस्थितीत रहावे असे मा. जि. समाज कल्याण अधिकारी जि. प. परभणी. मा. श्री. आर. जी. गायकवाड (वै. सा. का. परभणी) आणि मा. श्री. विजय कान्हेकर (संचालक तथा सचिव म. गा. से. सं. परभणी) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मा. श्री. विष्णू वैरागड संपर्क - ९८५०१४१४३१

Wednesday, 5 September 2018

स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्ग

आजच्या काळात आत्मरक्षण अथवा स्व-संरक्षण ही बाब महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आज महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र अभियानातर्फे स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचा कार्यक्रम शनिवारी १५ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. प्रवेश विनामुल्य असून संपर्क अरविंद खैरे यांच्याशी साधावा - ९८१९५०१५३२