परभणी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
मुंबई,
विभागीय केंद्र परभणी, चतुरंग प्रतिष्ठान परभणी व मॉडेल
इंग्लिश एज्युकेशन सोसायटी शारदा महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने
पुरग्रस्तांसाठी मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मदत संकलन केंद्राचे
उद्घाटन कृषिभूषण व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय कांतराव काका झरीकर यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे
समन्वयक विजय काणेकर, अनिल जैन अध्यक्ष
मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी व चतुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास पानखेडे
उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना मा. कांतराव काका देशमुख यांनी
पुरस्थितीमुळे झालेली भीषण अवस्था व या परिस्थितीतून सावरण्यासाठी ‘आम्ही
परभणीकर’ म्हणून मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन केले. त्यानंतर अनिल जैन,
विलास पानखेडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
या संकलन केंद्रात दिनांक १५ ऑगस्ट २०१९
पर्यंत ही मदत संकलित करण्यात येणार असून १६ ऑगस्ट रोजी ती पुरग्रस्तांसाठी
पाठविण्यात येणार आहे या याची सर्व परभणीकरांनी नोंद घ्यावी .
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा. सचिन खडके यांनी तर प्रास्ताविक मा. विजय काणेकर यांनी केले. या
कार्यक्रमाला चतुरंग प्रतिष्ठानचे बालासाहेब फुलारी, रुस्तुमराव कदम, निखील जैन, श्रीराम गरजे, गंगाधर गायकवाड, धर्मराज शेजुळ, डॉ. प्रशांत मेने, प्रा. भ. पु. कालवे, एकनाथराव
मस्के,
टी. डी. जाधव, प्रा.डॉ. भगवान पाटील, डॉ. नितीन बावळे, डॉ रमेश भालेराव, विष्णू वैरागड, प्रा.
डॉ. हनुमंत शेवाळे, प्रा. डॉ. दत्ता चामले, प्रा. डॉ. अविनाश पंचाळ, फुलसावंत सर, प्रा. शाम पाठक, सुरेश जयपूरकर, राजाराम मूत्रटकर व तुकाराम
पवार यांची उपस्थिती होती .
या संदर्भात आपल्याला काही माहिती हवी
असल्यास प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण - ८६६९०९६२८१ व प्रा. सचिन खडके ९४२१३५५०९६
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment