Saturday, 29 October 2016

'रंगस्वर' तर्फे 'सूरप्रभात' कार्यक्रम संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व "रंगस्वर" तर्फे दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी "सूरप्रभात' हा कार्यक्रम शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात संपन्न झाला. श्रीमती सुष्मीता दास (गायन) तबला- ओजस अधिया संवादिनी - सिद्धेश बिचोलकर आणि पंडित गणपती भट ( गायन) तबला- श्रीधर मंदारे संवादिनी - केबल कावले यांचा संगीतमय जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे  सूत्र संचालन रेखा नार्वेकर यांनी केले. 

Sunday, 23 October 2016

पाचवी शक्ती ह्या विषयावर शास्त्रज्ञ प्रा. एन. कृष्णन यांचे व्याख्यान संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे 'विज्ञानगंगा' हा उपक्रम प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो. 'विज्ञानगंगा' उपक्रमांतर्गत होणा-या कार्यक्रमाचे आठवे पुष्प प्रतिष्ठानच्या सभागृहात नुकतेच पार पडले. ह्या आठव्या मार्गदर्शन कार्यक्रमाचा विषय होता The fifth force (पाचवी शक्ती) प्रा. एन. कृष्णन्. आतापर्यंत आपल्याला गुरूत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, तीव्र अणुशक्ती, आणि सौम्य अणुशक्ती ह्या चार प्रकारच्या शक्ती माहित आहेत. तथापि, पाचवी शक्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे हाती येत आहेत याची माहिती प्रा. एन. कृष्णन् यांनी दिली. केलेले मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून कार्यक्रमाच्या शेवटी शंकासमाधनासाठी अनेक प्रश्न विचारले गेले.

Tuesday, 18 October 2016

'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ....


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली तीन दशके सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक क्षेत्रांत वेगवेगळे उपक्रम राबविताना नव्या पिढीची जडण-घडण सम्यकपणे घडावी, असा आम्हा सर्वांचाच प्रयत्न असतो. प्रागतिक आणि परिवर्तनवादी विचारांची विधायक दृष्टी असलेली क्रियाशील तरुणाई या प्रक्रियेतून पुढे येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत व त्याला एक राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत आहोत. या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर अनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकिर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसाच्या खंडाविना पूर्ण होत आहे, ही आपल्या सर्वांनाच आनंदानची व अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने त्यांच्या या कारकिर्दीतील काही महत्त्वाची धोरणे व निर्णय यांचा या पुस्तिकेत अतिशय मोजक्या शब्दांत परिचय करून दिला आहे. अतिशय कमी वेळेत या पुस्तिकेच्या संदापनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
- सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
http://ycpmumbai.com/images/pdf/parva_parivatan_2016.pdf

'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ....


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली तीन दशके सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक क्षेत्रांत वेगवेगळे उपक्रम राबविताना नव्या पिढीची जडण-घडण सम्यकपणे घडावी, असा आम्हा सर्वांचाच प्रयत्न असतो. प्रागतिक आणि परिवर्तनवादी विचारांची विधायक दृष्टी असलेली क्रियाशील तरुणाई या प्रक्रियेतून पुढे येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत व त्याला एक राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत आहोत. या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर अनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकिर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसाच्या खंडाविना पूर्ण होत आहे, ही आपल्या सर्वांनाच आनंदानची व अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने त्यांच्या या कारकिर्दीतील काही महत्त्वाची धोरणे व निर्णय यांचा या पुस्तिकेत अतिशय मोजक्या शब्दांत परिचय करून दिला आहे. अतिशय कमी वेळेत या पुस्तिकेच्या संदापनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
- सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
http://ycpmumbai.com/images/pdf/s_pawar_book_18102016.pdf

Monday, 17 October 2016

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१६ सुप्रसिद्ध उद्योगपती श्री प्रतापशेठ दादा साळुंखे यांना देण्यात येणार...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना/व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता / विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास / आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृति/कला क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्तीस/संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम. रु. २,००,०००/- व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे..वरील क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणा-या व्यक्ती अगर संस्था यांच्या विषयी प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करुन पारितोषिक निवड समितीने सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. प्रतापशेठ दादा साळुंखे यांची या वर्षीच्या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे. श्री प्रतापशेठ दादा साळुंखे यांनी गेली अनेक औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या क्षेत्रातील त्यांचे असाधारण कर्तृत्व लक्षांत घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमाध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते श्री. प्रतापशेठ दादा साळुंखे यांना देण्यात येईल.

Sunday, 16 October 2016

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये रंगला 'कट्टा शिक्षणाचा'......यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई शिक्षण विकास मंच, शिक्षणकट्टा अंतर्गत वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांवर चर्चा होत असते. यावेळी हि चर्चा 'माध्यमिक स्तरावरील विषययोजना' या विषयावर करण्यात आली. या कार्यक्रमास शिक्षण, प्राध्यापक, निवृत्त शासकीय अधिकारी, शैक्षणिक विषयांवर काम करणा-या सामाजिक संस्था, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, समाज माध्यम प्रतिनिधी, व शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती होती. माध्यमिक स्तरावरील विषययोजनेचे स्वरूप या कट्टयाच्या संयोजक बसंती रॉय यांनी समजावून सांगितले. काट्याचे आयोजनाचे महत्व समन्वयक श्री. माधव सुर्यवंशी यांनी सांगितले. या चर्चासत्रास शिक्षणविकास मंचचे मुख्य संयोजक मा. डॉ. वसंत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Wednesday, 12 October 2016

कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत

राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा...
माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला दि. २२ फेब्रवारी २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सलग ५० वर्षे राज्याच्या व देशाच्या कायदेमंडळात सदस्य असलेले शरद पवार हे एकमेव नेते आहेत. राज्य व केंद्रात विविध मंत्रिपदे आणि अनेक संस्थांची धुरा यशस्वीपणाने हाताळणा-या मा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या विषयी अधिक माहिती डाऊनलोड करा 

http://ycpmumbai.com/images/pdf/vaktrutva_spardha2016.pdf

माजी केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या संसदीय कारकीर्दीस 22 फेब्रुवारी 2017 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. या पाच दशकांमध्ये पवार साहेबांच्या हस्ते अनेकविध निर्णय झाले. अनेक प्रकल्प उभे राहिले. आदरणीय पवार साहेबांचे हे विचार आणि कार्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावर या स्पर्धा घेण्यात येणार आहे. सोबतच्या माहितीपत्रकांत शालेय निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यांची सविस्तर माहिती दिली आहे. अधिकाधिक विद्यार्थी आणि युवांनी यात आपला सहभाग नोंदवावा.

http://ycpmumbai.com/images/pdf/nibhandh_spardha2016.pdf

शिक्षण कट्टा - माध्यमिक स्तरावरील विषययोजना १५ ऑक्टोंबर २०१६शिक्षणप्रेमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे 'शिक्षणकट्टा’.
शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा गेली पाच वर्ष सुरू आहे. यावेळी हा कट्टा शनिवार, दिनांक १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी दुपारी २ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे आयोजित केला आहे. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘माध्यमिक स्तरावरील विषययोजना’ हा विषय ठेवण्यात आला आहे. या अनुषंगाने पुढील मुद्यांवर चर्चा आयोजित केली आहे.
१) मा.ना.शिक्षणमंत्री यांनी नुकतीच घोषणा केली आहे की गणित आणि इंग्रजी हे विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार सुरू आहे.
२) समाजशास्त्राऐवजी राष्ट्रीय माध्यमिक स्तरावर व्होकेशनल कोर्सेसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
३) माध्यमिक स्तरावरील सहशालेय (श्रेणी) विषयांच्या अध्यापनात व मूल्यमापनात काय सुधारणा करता येतील, तसेच अंतर्गत मूल्यमापन आणखी प्रभावी कसे करता येईल या दृष्टीनेही शासनाचा अभ्यास सुरू आहे.
या तीनही मुद्द्यांवर येत्या कट्ट्यात चर्चा होईल.
‘शिक्षण विकास मंच’ चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपली भूमिका मांडावी ही विनंती.
श्रीमती बसंती रॉय
संयोजक
शिक्षणकट्टा, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
लक्ष्यवेध: ‘
माध्यमिक स्तरावरील विषययोजना’ या विषयासंदर्भात कोणत्याही संस्थेला किंवा सदस्यांना स्वतःचे सादरीकरण करावयाचे असल्यास, कृपया आधी संपर्क करावा. ठिकाण-सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ,मंत्रालय समोर, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१
अधिक माहितीसाठी संपर्क – माधव सूर्यवंशी (समन्वयक-९९६७५४६४९८)

Tuesday, 11 October 2016

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सोलापूर विभागीय केंद्राचा शुभारंभ...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या विभागीय केंद्राचा शुभारंभ रविवारी सायंकाळी वा. का. किर्लोस्कर सभागृहात पार पडला. यावेळी 'आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचे योगदान' या विषयावर पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव प्रतिष्ठान सोलापूर केंद्राचे अध्यक्ष गो. मा. पवार होते. व्यासपीठावर माजी आमदार युन्नूसभाई शेख, माजी खासदार धर्मण्णा सादूल, आमदार दिलीप सोपल, राजशेखर शिवदारे, राहुल शहा, विचारवंत दत्ता गायकवाड, प्रतिष्ठानचे सचिव दिनेश शिंदे उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन आणि यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सचिव दिनेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राज्यात प्रतिष्ठानची १० कार्यालये असून, सोलापूरचा ११ व्या केंद्राचा शुभारंभ होत असल्याचे स्पष्ट केले.
प्रतिष्ठानचे सदस्य, आमदार दिलीप सोपल यांनी यशवंतरावांच्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या गतिमान काळात कोणाला थांबायला वेळ नाही.. डायरेक्ट वरच्या पदापर्यंत पोहोचण्याची घाई झाली आहे. तळागाळातील सामान्यांचे काम करुन आलेल्या अनुभवावर जनतेचे प्रश्न मांडता येतात, हे हल्लीची पिढी विसरत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
उल्हास पवार यांनी आपल्या व्याख्यानातून यशवंतरावांच्या विविध पैंलूंवर प्रकाश टाकला. जातीनिरपेक्षता मांडणारे प्रभावी नेते, उत्त संसदपटू होते. जनसंपर्क कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. सामान्य कार्यकर्त्यांची उंची कशी वाढवावी याची उत्तम जाण त्यांच्याकडे होती. वसंतराव नाईक यांच्यासारख्या दूददृष्टी नेता ११ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री राहिला हे यशवंतरावांनी त्यांच्यातील हेरलेल्या कार्तकर्तृत्वामुळेच. आजचा काळातही आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतरावांचे योगदान मोलाचे असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. गो. मा. पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. त्यांनी यशवंतरावांच्या विविध पैलूंची उदाहरणे दिली. 

Thursday, 6 October 2016

पाचवी शक्ती ह्या विषयावर शास्त्रज्ञ प्रा. एन. कृष्णन यांचे व्याख्यान


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. एन. कृष्णन (शास्त्रज्ञ, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)  यांचे The fifth force (पाचवी शक्ती)  ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आतापर्यंत आपल्याला गरूत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, तीव्र अणुशक्ती, आणि सौम्य अणुशक्ती ह्या चार प्रकारच्या शक्ती माहित आहेत. तथापि, पाचवी शक्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे हाती येत आहेत. हीच पाचवी शक्ती हा सदर व्याख्यानाचा विषय आहे. व्याख्यान २२ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, मुंबई ४०००२१ येथे होणार आहे. 

Tuesday, 4 October 2016

स्व. भा. ल. भोळे स्मृती व्याख्यानमाला संपन्न..


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर, आधार बहुउद्देशिय संस्था, नागपूर व महात्मा गांधी स्मारक निधीच्या संयुक्त विद्यमाने 'विवेकवादी जगणे खरंच इतके कठीण आहे का?" या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दापोलीचे कार्यकर्ते मा. मुक्ता दाभोळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. ३० सप्टेंबर २०१६ रोजी सायं ६.०० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे करण्यात आले. 
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र. नागपूरचे अध्यक्ष मा. डॉ. गिरीश गांधी अध्यक्षस्थान होते

सोलापूर विभागीय केंद्रातर्फे व्याख्यानाचे आयोजन..


सोलापूर विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सोलापूर विभागीय केंद्राच्या वतीने 'आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचे योगदान' हे व्याख्यान रविवार ९ ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० वाजता वा.का. किर्लोस्कर सभागृह, २ रा मजला, हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे आयोजित केले आहे. वक्ते मा. उल्हासदादा पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. गो. मा. पवार असणार आहेत या कार्यक्रमास व व्याख्यनास आपली उपस्थिती रहावे अशी विनंती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सोलापूर विभागीय केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.