Friday, 16 August 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिकतर्फे देशभक्तीपर कवितांतून झाली स्वातंत्र्याची जाणीव



नाशिक : देशासाठी लढणार्‍या वीरांचं स्मरण करून देशभक्तीचा, क्रांतीचा अविष्कार कवींनी प्रभावीतपणे सादर करून वातावरणात जल्लोष निर्माण केला. स्वातंत्र्यजपण्यासाठी देश रक्षणासाठी सर्वांनी सज्ज राहायला हवे. असा निर्धारच कवितांमधून कवी मांडत होते. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणार्‍या सैनिकांचे स्मरणही कवितांतून येत होते. स्वातंत्र्याचे गीत नव्याने गाऊया विषयावरील कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा अविष्कार रसिकांना अनुभवण्यास मिळाला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन विश्वास हब येथे करण्यात आले होते. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी अशोक निलकंठ सोनवणे उपस्थित होते. संमेलनाचे सूत्रसंचलन कवी रविंद्र मालुंजकर यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.
कवींनी स्वातंत्र्यया विषयावरील कवितांचे सादरीकरण केले. त्यात पोवाडा, गझल, गेय, कविता अशा विविध प्रकारातून देशाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. शालेय विद्यार्थी ते ज्येष्ठ कवी नाशिकबरोबरच निफाड, सिन्नर, पिंपळगाव, घोटी येथून यात सहभागी झाले होते. दर्जेदार कविता व कवींची उर्स्फुत उपस्थिती नाशिकच्या काव्य क्षेत्रासाठी निश्‍चितच अभिमानास्पद आहे.
कवी राज शेळके यांनी स्वातंत्र्याचे प्रतीक आमच्या अभिमानाची भाषा, एकजुटीने निशाण, आमच्या जगण्याची अभिलाषा, भारतभूच्या जयकाराला गर्वाने गर्जतो एक तिरंगा, अखंड हिंदुस्थानाला पोसतो, या ओळीतून देशाची अखंडता, अभिमान व्यक्त केला.
कवी अरूण सोनवणे यांनी उज्ज्वल माझा देश तयाची उर्जस्वल ही माती, या मातीशी इमान अमुचे, या मातीशी नातीया ओळीतून मातीशी इमान राखण्याचे आश्वासन दिले व देशाच्या समृद्धीची लौकीकाची जाणीव करून दिली. कवी प्रशांत केंदळे यांनी या मातीचा वास मिळाला, आभाळाचा श्वास मिळाला, स्वातंत्र्याचा अर्थ कळाया, मोठ्ठा कारावास मिळालायातून प्राणपणाने लढणार्‍या वीरांचे स्मरण केले व स्वातंत्र्याचा अर्थ कष्टातून मिळाल्याची जाणीव व्यक्त केली. विविध कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या त्यात रमेश हरी संवत्सरकर, चंद्रकांत वासुदेव गोडबोले, पांडुरंग यादव पानसरे, शुभम दिगंबर मोरे, अमोल नामदेव चिने, राधाकृष्ण साळुंके, गणेश पवार, नामदेव जाधव, विलास पंचभाई, अजय बिरारी, वृषाली साटम-पोहरे, सचिन मोहिते, विलास गोडसे, प्रशांत कापसे, शिवाजी क्षीरसागर या कविंचा समावेश होता.



No comments:

Post a Comment