Monday, 28 November 2016

७ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ पत्रकार परिषद...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे
७वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ पत्रकार परिषद...

जानेवारी २०१७ मध्ये होणा-या '७ व्या यशवंत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या  चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेले चित्रपटाचे समीक्षण. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'चित्रपट समीक्षण स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे
'७व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७' च्या निमित्ताने बुधवार ३० नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता पत्रकारांसाठी चर्चा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला श्री. शरद काळे, सरचिटणीस (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ) डॉ. जब्बार पटेल - फेस्टिवल डायरेक्टर ( यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ) उपस्थित राहणार आहेत आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. याविषयी अधिक माहितीसाठी श्री. संजय बनसोड (९८१९९६२६३६ ) श्री. शैलेश चव्हाण ( ९९२०३९७२९८ ) वर संपर्क करू शकता.

विज्ञानगंगाचे दहावे पुष्प...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील मानववंश शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. सुभाष वाळिबे यांचे 'आशिया खंडातील मानव मुळात आफ्रिकन होता का ?' या विषयावरील दहावे पुष्प गुरुवार दि. ८ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालय समोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनती. 

Sunday, 27 November 2016

”भारतीय संविधान दिना” निमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर


२६ नोव्हेंबर २०१६ ”भारतीय संविधान दिना” निमित्त सॅम मित्र मंडळ व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभाग जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने मु. पेडली, ता.सुधागड , जिल्हा रायगड इथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . खारघर ,नवीन मुंबई येथील नामांकित यरला रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर डॉ. प्रशांत जगताप व टीम, तसेच सुधागड पी.अस.सी. मधून डॉ.मुळे व सौ. डॉ. भिडे व टीम रुग्णांच्या चेकप साठी उपस्थित होते. डायबेटीस, ब्ल्डप्रेशर, मुल्व्याद, हर्निया, अॅपेंडीक्स, मासिक पाळी , गर्भ पिशवी विकार, गर्भावती महिला, डोळे तपासणी, इत्यादी विकारांवर तपासणी केली गेली. ”भारतीय संविधान दिना” चे औचित्य साधून, शिबिर दरम्यान उपस्थित प्रत्येक व्यक्तीला भारताचे प्रीअॅम्बल दिले गेले व सामुहिक वाचनाच्या माध्यमातून ‘ समानता व बंधुत्वाचा निरोप देण्याच प्रयत्न सॅम मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन खामकर साहेब यांनी केले आहे. अश्या शिबाराचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे रायगड जिल्हाध्यक्ष मा.अभिजित दादा देशमुख यांनी केले आहे. युवा कार्यकर्ते नंदकीशोर शिंदे, संदीप ठाकूर, प्रणीत कडू, बाजीरंग कुर्ले, दर्शन तळेकर, सौरभ खामकर, प्रशांत दळवी, रुपेश कुर्ले, राज तळेकर, शुभम मेणे, सुनील कुवर, प्रवीण खानेकर, शिवराज खामकर, प्रशांत सगळे, विजय देशमुख यांनी सक्रीय सहभाग घेतला. कार्यक्रमास तळेकर गुरुजी, मेने सर, विजयजी जाधव, सचिन झुन्झाराव, निलेश देशमुख, पोलीस पाटील देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, 16 November 2016

'विज्ञानगंगा'चे नववे पुष्प..


'कृष्ण विवर' ह्या विषयावर शास्त्रज्ञ प्रा. जे. एस. यादव यांचे व्याख्यान संपन्न..
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत टाटा इन्स्टिटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ प्रा. जे. एस यादव यांचे 'कृष्ण विवर' या विषयावरील नववे पुष्प बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सांस्कृतिक सभागृहात पार पडले. 'कृषण विवर', श्याम विवर, कृष्ण गर्त या ब्लॅक होल याविषयी गुरूत्वाकर्षण कसे प्रबळ आहे याविषयी माहिती प्रा. जे. एस.यादव यांनी दिली. केलेले मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून कार्यक्रमाच्या शेवटी शंकासमाधनासाठी अनेक प्रश्न विचारले गेले.

Friday, 11 November 2016

यशवंतराव चव्हाण राष्टीय पुरस्कार समिती बैठक पार पडली...


दिनांक ११ नोव्हेंबर २०१६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार"च्या समिती बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या  पाचवा मजला, समिती कक्षामध्ये पार पडली. यावेळी बैठकीस राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष मान. श्री. अनिल काकोडकर, DAE Homi BHABHA Chair Person, Member AEC, Bhabha Atomic Research center, मान.श्री शरद काळे सरचिटणीस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, डॉ. संजय देशमुख उपकुलगुरू, मुंबई विद्यापीठ, Mr. I M Kadri Architects, श्री रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. यावेळी मा. अनिल काकोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई चे सरचिटणीस श्री. शरद काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. 

Saturday, 5 November 2016

'विज्ञानगंगा'चे नववे पुष्प.. 'कृष्ण विवर'


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत टाटा इन्स्टिटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ प्रा. जे. एस यादव यांचे 'कृष्ण विवर' या विषयावरील नववे पुष्प बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. प्रा. यादव हे आय.एफ.आर मध्ये सन १९८२ पासून कार्यरत असून एस्ट्रोसेट उपग्रहावर कृष्ण विवरांसंबंधी माहिती मिळविण्यासाठी बसविलेल्या उपकरणाचे ते निर्माते आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती..

Friday, 4 November 2016

'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' पुस्तिका प्रकाशित...


पुणे विभागीय केंद्र : आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकीर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसांच्या खंडाविना पूर्ण होत आहे. यानिमित्ताने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या निमित्ताने आयोजित उपक्रमाची माहिती पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
या पुस्तिकेच्या प्रकाशनाला राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर आनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
http://ycpmumbai.com/images/pdf/parva_parivatan_2016.pdf