Tuesday, 31 December 2019

अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी जिएसटी प्रणाली आजही व्हेटीलेटरवर – प्रा. डॉ अजित जोशी

आर्थिक मंदिची सुरुवात २०१६ च्या सुरुवातीपासून झाली, आसा स्टेट बँकेचा दावा आहे. सरकारने नोटाबंदी केली, मात्र त्याचा परिणाम काय झाला हे आजही माहित नाही. तज्ञांचे सल्ले घेतले नसल्याने धोरणात त्रृटी दिसल्या, हे सिद्ध झाल आहे. काळा पैसा बाहेर आला नाही, भ्रष्टाचार थांबला नाही, या धोरणामुळे असंघटित क्षेत्राच्या गुडघ्याच्या वाट्या फोडल्या गेल्या. श्रीमंतांच नुकसान झाल नाही, मात्र गरिबांना घायाळ केल. उद्योजकांच्या धोका उचलण्याच्या वृत्तीला धक्का बसला, असे प्रतिपादन सीए डॉ. अजित जोशी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारक सभागृह येथे आयोजित 'राजकीय अर्थकारणाचे परिणामया विषयावरील व्याख्यानात डॉ. जोशी बोलत होते. व्यासपीठावर सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सोलापूरचे अध्यक्ष युनूस, कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे, चेंबर चे अध्यक्ष राजू राठी, राजगोपाल उपस्थित होते. श्री शिवदारे यांनी प्रास्ताविक केले. दिनेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. जोशी म्हणाले, आर्थिक क्षेत्रात जगातील अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात महिला मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. ७० व्या दशकात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्टीयीकरण केले. तेव्हा बँकात स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर नोक-या मिळाल्या. कालांतराने स्त्रिया आज बँकांच्या मुख्य पदांवर आहेत. हे राजकीय अर्थकारणाचे उत्तम उदाहरण आहे.
नोटाबंदी झाल्यानंतर शेती, उद्योग तसेच असंघटित क्षेत्रातील रोजगारांवर गदा आली. नोटाबंदीचा निर्णय थेटपणे लागू करणे अत्यंत चुकीचे ठरले. नोटाबंदीप्रमाणेच जीएसटी लागू करतानाही सरकरकडून घाई झाली. यातूनच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष श्री राजशेखर शिवदारे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. चेंबर चे अध्यक्ष राजू राठी यांनी व्याख्यानामागील भूमिका मांडली. केंदाचे अध्यक्ष मा. युनुसभाई शेख यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या व्याख्यानास व्यापारी उद्योजक व नागरी बँकांचे संचालक व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
तसेच
सोलापुर वालचंद कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी राजकारणात सहभागी व्हाव का? या विषयावर मार्गदर्शन प्रा. अजित जोशी यांनी दिले. यावर मुलांनी व मुलीनी प्रश्न विचारून संवाद साधला. या कार्यक्रमास प्रा. चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र सोलापूर आणि वालचंद शिक्षण समुह यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
Monday, 30 December 2019

३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला फ्यूजन – २०१९ संगम सप्तकलांचा...


रसिकांसाठी अविस्मरणीय संगीतानुभव मैफलीसाठी प्रवेश विनामूल्य
नाशिक (दि. ३१) : नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी, याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप, विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत फ्यूजन२०१९ संगम सप्तकलांचा...या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मैफिल सर्वांसाठी विनामुल्य आहे.
मंगळवार, ३१ डिसेंबर २०१९ रोजी सायं. ६ ते ९ या वेळात विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड,  नाशिक ४२२०१३ येथे सदर मैफल संपन्न होणार असून कार्यक्रमाची संकल्पना विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची असून संयोजक मिलिंद धटिंगण हे आहेत. सदर उपक्रमाचे ५ वे वर्ष असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला वेगळे आणि अभिरूची संपन्न कार्यक्रमाची परंपरा विश्वास गृपने राखली आहे.
शब्द-सूर-ताल-रंगरेषा या समन्वयातून वैशिष्ठपूर्ण अविष्कार रसिकांना अनुभवास मिळणार आहे. चित्र, शिल्प, गायन, नृत्य अशी ही विविधरंगी मैफल आनंदानुभवच देणार आहे.
विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, सारस्वत बँक, फॅरवशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी, जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट, स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव (ब.), नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न होत आहे.
संयोजक मिलिंद धटिंगण असून गायन, मकरंद हिंगणे, मिलिंद धटिंगण, विवेक केळकर, मीना परूळकर-निकम, शुभंकर हिंगणे करणार आहेत. सहगायिका तन्मयी घाडगे, दिशा दाते,
जुई आंबेकर आहेत.

Sunday, 29 December 2019

विज्ञानगंगाचे पंचेचाळीसावे पुष्प ‘आश्चर्यजनक आवर्तने : मूलद्रव्यांची' संपन्न...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत आश्चर्यजनक आवर्तने : मूलद्रव्यांची' (Surprising Recurrences of Chemical Elements) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कन्सेप्ट अनलिमिटेड या संस्थेच्या संचालक डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, इ. मूलद्रव्यांची प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. शेवटी प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी प्रात्यक्षिक देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

Monday, 23 December 2019

Electrical Regulations And Safety Audit


Free Lecture
Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai, Maharashtra Mahila Vyaspeeth has organized Free Lecture on Electrical Regulations And Safety Audit by renowed speaker Hon. Prakash Kulkarni on Saturday, 11 January 2020, 11 am to 1 pm at Basement Hall, Y B Centre, Nariman Point, Mumbai. For more information please contact us on 8291416216 / Office : 22045460 Ext. 244.


Sunday, 22 December 2019

‘राजकीय अर्थकारणाचे परिणाम’ विषयावर व्याख्यान...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक कायदेविषयक सल्लागार डॉ. अजित जोशी यांचे राजकीय अर्थकारणाचे परिणाम यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर यंत्रमाग धारक संघ चे प्रेसिडंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवार २८ डिसेंबर, २०१९  रोजी सायंकाळी ६ वाजता श्री शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर येथे सदर व्याख्यान पार पडणार आहे.


विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी मोफत एक दिवसीय विधी साक्षरता कार्यशाळेचे निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक व्यक्तीला आपले राज्य काय, आपली प्रतिज्ञा काय अशा बाबींची माहिती मिळावी, त्याचा विचार व्हावा, यासाठी कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम मार्फत सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. महिला व बालके याबाबत कायद्याची पार्श्वभूमी, महिलांवरील विविभ प्रकारे होणारे अत्याचार व उपाय, मुलांसाठीचे लैंगिक प्रतिबंध कायदा, महिलांचे अश्लील देह प्रदर्शन प्रतिबंधक कायदा १९८६, हिंदू विवाह कायदा, वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा याविषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला उपस्थितांकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमचे सचिव विनायक कांबळे, दिलीप तळेकर, प्रॉस्पर डिसोजा, प्रकाश धोपटकर, जे. बी. पाटील, भूपेश सामंत आदि उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यशाळेची सांगता करण्यात आली.Saturday, 21 December 2019

‘फिनलंडची शिक्षणपद्धती - प्रशिक्षण कार्यशाळा..’


फिनलंड या देशाची शिक्षणपद्धती जगात सर्वोत्कृष्ट समजली जाते. या पद्धतीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेरंब कुलकर्णी सध्या भारतात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई एक कार्यशाळा आयोजित करत आहे.
कार्यशाळेचा विषय : फिनलंडची शिक्षणपद्धती
दिनांक : (मंगळवार) १४ जानेवारी, २०२०
वेळ : सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००
स्थळ : रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई- ४११००२१.
कार्यशाळा कोणासाठी?
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्थाचालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षणप्रेमी. प्रवेश मर्यादित.
नोंदणी: नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवरील फॉर्म भरून पाठवा.
https://bit.ly/2Mh0qRA
फॉर्म भरून पाठवण्याची मुदत : दिनांक ११ जानेवारी २०२० पर्यंत किंवा प्रवेशक्षमता पूर्ण होईपर्यंत, यांपैकी जे लवकर असेल ती. आसनक्षमता मर्यादित असल्यामुळे ११ जानेवारीची वाट न पाहता त्वरीत फॉर्म भरून पाठवा.
नोंदणी शुल्क : या विषयात रस आहे, हे दाखवण्यासाठी २०० (दोनशे) रुपये एवढी नाममात्र रक्कम कार्यक्रमासाठी आल्यानंतर प्रतिनिधींकडून आकारण्यात येईल.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :
१०.०० ते १०.३० प्रत्यक्ष नोंदणी आणि चहापान
१०.३० ते १.३० भोजनपूर्व सत्र
१.३० ते २.०० भोजन
२.०० ते ५.०० भोजनोत्तर सत्र
कार्यशाळेत फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचे पुढील मुद्दे हाताळण्यात येतील:
१) ऐतिहासिक अंगांनी आढावा
२) धोरणकर्त्यांची भूमिका
३) शिक्षकांचे प्रशिक्षण
४) मूल्यमापन - महत्त्व आणि पद्धती
५) फिनलंडकडून भारताला काय शिकता येईल
?
कार्यशाळेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : माधव सूर्यवंशी : ९९६७५४६४९८ / ८३६९९४५५७८

Tuesday, 17 December 2019

Maharashtra Mahila Vyaspeeth has organised Certified course…


Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai, Maharashtra Mahila Vyaspeeth has organised Certified course in Co-operative Housing Society Management And Government Diploma in Co-operation And Accountancy for managers, managing committee members, office bearers, consultants and accountants special on demand Saturday Sunday batch.
There are 16 sessions, 6 hours each for Co-operative Housing Society Management. Fees for this course is only 10,000 Rupees. Period of this course is from 1st  February 2020 to 22nd March 2020.
And for Government Diploma in Co-operation And Accountancy, there are 20 sessions, 6 hours each. Fees 15,000 only. Period of this course is from 1st  February 2020 to 11th April 2020.
Training will be provided in English And Marathi with Power Point Presentation. Lectures will be given by experts, Advocates in the field. Detail notes will be provided.
Admission has now strated for the course. For Admission and more details contact Sanjana Pawar between 11 am to 6 pm on –
Mobile – 8291416216

Office – 22045460, 22028598, Ext : 244.


Monday, 16 December 2019

Pre Dac Batch


Academy of Information Technology (YCP) announces Pre Dac Batch from 12th March 2020.
This course is designed to provide students with sound concepts and knowledge of Computer Fundamentals, C Programming, Data Structure, Data Communication and Networking, OOPS concepts and Operating System.
This course helps student to crack C-DAC Common Admission Test (C-CAT) for admission to Post Graduate Diploma Courses.

Sunday, 15 December 2019

मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व्याख्यान संपन्न...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने आपला कायदा जाणून घ्या या व्याख्यानमाले अंतर्गत मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३या विषयावर डॉ. सुरेंद्र श्रीरंग धाकतोडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मानवी हक्क संरक्षण कायदा म्हणजे काय? कायद्याअंतर्गत कोणत्या तरतुदी येतात? कायद्याचा उपयोग काय? अशा अनेक गोष्टींची त्यांनी माहिती दिली. शेवटी उपस्थितांना प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.

अनिता माजगावकर-कुलकर्णी यांच्या स्वरांतून निथळली पहाट स्वरांची हळूवार लकेर...


सूर विश्वास
नाशिक (दि. १४ ) : पहाट स्वरांची हळूवार लकेर, वातावरणात धुके दाटलेले आणि अशा वेळी स्वरांचा अनोखा माहौल दाटून आलेला होता. स्वरांची जादू नकळत रसिकांच्या मनावर अधिराज्य करत होती. स्वर होते अनिता माजगांवकर-कुलकर्णी यांचे.
विश्वास गृपतर्फे सूरविश्वासचे अकरावे पुष्प अनिता माजगांवकर-कुलकर्णी यांनी गुंफले. मैफिलीची सुरूवात भैरव रागातील बडा ख्यालाने केली. विलंबित एक ताल शब्द होते. बलमवा मोरे सैय्याप्रेमाच्या नात्याची आर्त धून आणि त्यातून येणार्‍या स्वराची आस प्रभावीपणे मांडली. त्यानंतर तीन तालातील छोटा ख्याल सादर केला. जागो मोहन प्यारेस्वरांचे अलवारपण आणि ईश्वर भक्तीची आस यातून प्रतीत झाली. या भक्तीमय वातावरणानंतर वंदे गणपती विघ्न विनाशनया रागावर आधारित गीताने मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत ही मागणी केली. मैफलीचा समारोप शंकरी चरण मेया अहिर भैरव रागातील गीताने झाली. जीवन जगण्याचे नवे भान आणि अध्यात्माची सांगड हे मैफलीचे प्रमुख सूत्र होते.
नितीन वारे (तबला), ईश्वरी दसककर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात आज इगतपूरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाध्यपदी निवडीबद्दल लेखक विवेक उगलमुगले यांचा सन्मान करण्यात आला. कलावंतांचा सन्मान संजीवनी  कुलकर्णी, अनुराग केंगे, राजा पाटेकर, प्रियांगी गोसावी यांचे हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

Wednesday, 11 December 2019

विज्ञानगंगाचे पंचेचाळीसावे पुष्प ‘आश्चर्यजनक आवर्तने : मूलद्रव्यांची'...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत आश्चर्यजनक आवर्तने : मूलद्रव्यांची' (Surprising Recurrences of Chemical Elements) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कन्सेप्ट अनलिमिटेड या संस्थेच्या संचालक डॉ. मानसी राजाध्यक्ष शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘स्ल्युथ’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी स्ल्युथ
चित्रपट चावडी
नाशिक (दि. ११) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने
चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इंग्रजी दिग्दर्शक जोसेफ मँकीवाईज यांचा स्ल्युथहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
चित्रपट चावडीत आता चार विविध नाटकांवर आधारीत चित्रपट दाखविणार आहोत. त्यातील पहिला चित्रपट स्ल्युथहा अँथनी शॅफर यांचा त्याच नावाच्या नाटकावर आधारीत आहे.
अँड्य्रु वाईक हा यशस्वी हेरकथा लेखक आहे. मिलो टिंडेल त्याच्या बायकोचा प्रियकर व केशभुषाकार त्याला भेटायला येतो. लेखकाच्या अलिशान घरात एक खेळ सुरू होतो व रंगतच जातो. चित्रपटाचा शेवट अत्यंत विलक्षण असून रसिकांसाठी वेगळा अनुभव ठरेल.
१९७२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १३८ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Monday, 9 December 2019

‘मानवी हक्क संरक्षण कायदा’


आपला कायदा जाणून घ्या व्याख्यानमाले अंतर्गत
मानवी हक्क संरक्षण कायदा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने आपला कायदा जाणून घ्या या व्याख्यानमाले अंतर्गत मानवी हक्क संरक्षण कायदाया विषयावर डॉ. धाकतोडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक १३ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे हे विनामूल्य व्याख्यान पार पडणार आहे.

Monday, 2 December 2019

लेख पाठविण्याचे आवाहन...

आवाहन...

दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचामार्फत 'शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये याच विषयावर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा आमचा विचार आहे. तरी इच्छुकांनी या  पुस्तकासाठी आपले  लेख पाठवावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
१. लेख मुलांचे वाचन या क्षेत्रात झालेले अभ्यास/संशोधन, स्वतःचे अनुभव, या क्षेत्रात स्वतः केलेले किंवा निरीक्षण केलेले प्रयोग यांवर आधारित असावेत.
२. शब्दमर्यादा :- कमाल १२००
३. लेख मराठीत, देवनागरी लिपीत (युनिकोड आणि/किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये) असावेत. आवश्यक तेथे लेखासोबत फोटो जोडण्यात यावेत.
४. लेख दिनांक ३१ जानेवारी २०२० पर्यंत sanskrutivachan@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावे.
५. लेखाखाली लेखकाचे नाव, पत्ता आणि तीन ते चार वाक्यांत संक्षिप्त परिचय द्यावा.
६. लेख स्वीकारण्याचे, नाकारण्याचे, स्वीकारलेल्या लेखांत योग्य ते संपादकीय संस्कार करून बदल करण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे असतील.


डॉ. वसंत काळपांडे
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

‘यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार’ युथ कौन्सिल, नेरुळ या संस्थेस प्रदान...


नवी मुंबई, दि. ३० : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्रातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार यावर्षी नेरुळ, नवी मुंबई येथील यूथ कौन्सिल या समाजसेवी युवा संस्थेस, नेरूळ येथील स्टर्लिंग कॉलेजच्या सभागृहात दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी अध्यक्ष प्रमोद कर्नाड व कविवर्य अशोक नायगावकर यांच्या हस्ते युथ कौन्सिलचे संस्थापक सचिव सुभाष हांडेदेशमुख यांना समारंभ पूर्वक अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. अशोक पाटील, कार्यकारिणी सदस्य अविनाश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. रोख रुपये १५,०००/- व सन्मानपत्र असे स्वरुप असलेला हा पुरस्कार गतवर्षी मराठी साहित्य संस्कृती कलामंडळ यांना प्रदान करण्यात आला होता.
युथ कौन्सिल, नेरूळ या संस्थेने वृक्षारोपण, श्रमदान व रक्तदान शिबीरे, ग्राम/ पाडे दत्तक घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासह तेथील युवकांना सक्षम करणे, तेथील ग्रामस्थांच्या घरी दिवाळीत गोड पदार्थ घेऊन जाऊन दिवाळी साजरी करणे, वंचितांचे पुनर्वसन, वृक्षदिंडी, आरोग्य शिबीरे अशी कामे केल्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष, प्रमोद कर्नाड यांनी मानपत्र वाचन करताना सांगितले. तत्पूर्वी प्रास्ताविकात त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान करीत असलेल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रसंगी युथ कौन्सिलच्या वरिष्ठ सदस्यांचा सत्कारही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास कार्यवाहुल्यामुळे व सद्यराजकीय स्थितीमुळे जाहीर करुनही दिलीप वळसेपाटील समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजित मगदूम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अशोक पाटील यांनी केले.
पुरस्कार समारंभानंतर कवि अशोक नायगावकर यांची धमाल काव्यमैफल झाली. त्यास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी अनेक काव्य रसिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.