Friday, 31 August 2018

‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘दिग्दर्शक इंगेमार बर्गमन फिल्म उत्सव’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १ सप्टेंबर व रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रसिद्ध स्विडीश इंगेमार बर्गमन फिल्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहेत.

इंगेमार बर्गमन यांचा सिनेमा जागतिक सिनेमा सृष्टीत क्लासिक किंवा अभिजात म्हणून ओळखला जातो. मानवी संबंधांची गुंतागुंत, अनेक मानव निर्मित संस्था व सामाजिक अनुबंध व त्यातील परस्पर व्यवहार यावर भाष्य करणारा त्यांचा सिनेमा अनुभव विश्व समृद्ध करणारा आहे. त्यांच्या सिनेमातील पात्रे व प्रतिमासृष्टी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. अत्यंत मनस्वी, कलंदर अशा बर्गमन यांनी तटस्थपणे व तीव्रपणे मानवी संवेदनांचा, सबंधांचा व व्यवहारांचा शोध घेतला. 

शनिवार १ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत बर्गमन यांच्या कारकीर्दीचा वेध घेणार्‍या लघुपटाचे सादरीकरण होणार आहे.

रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत बर्गमन यांनी दिग्दर्शित केलेले खालील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

१)वाईल्ड स्ट्रॉबेरीज : हा एक रूपकात्मक रोड मुव्ही आहे. चित्रपटात वर्तमान आणि भूतकाळ, स्वप्न आणि सत्य ह्यांचा सतत लपंडाव चालू रहातो. एका वयोवृद्ध प्राध्यापकाचा ह्या बाह्य आणि त्याच्या अंर्तजगताचा शोध अत्यंत मनोरंजक आहे. सदर चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९१ मिनीटांचा आहे.
२)सेवन्थ सील : युरोपातील धर्मयुद्धांचा कालखंड, प्लेगच्या साथीनी थैमान घातलेले ह्या पार्श्वभूमीवर एक सरदार व त्याचा उचभ्रु मित्र एका मोहिमेवरून घरी येत असतात. मृत्युचे, भितीचे, रोगराईचे, स्वदेशातील वातावरण त्यांना खिन्न करते. त्यातच त्यांची गाठ प्रत्यक्ष मृत्युशी पडते. सरदार मृत्युबरोबर बुद्धीबळाचा पट मांडतो. मृत्युला सरदाराचे नियतीतून सुटका नाही याची खात्री असते. त्यातुन अनेक मुलभूत तात्विक प्रश्‍न निर्माण होतात. बर्गमनच्या प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार म्हणजे सेवन्थ सील. सदर चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९६ मिनीटांचा आहे.
३) समर इंटरल्युड : ही मारीची एका बॅलेरीनाची गोष्ट आहे. स्वान लेक ह्या बॅलेचा सराव चालू असतांना तिला टपालाने पाठविलेली एक डायरी मिळते. तेरा वर्षांपूर्वी तीची एका हेन्सीक नावाच्या तरूणाशी गाठ पडलेली असते. त्यातून त्या दोघांची मैत्रीही जुळते. तेरा वर्षांनी तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांच्या कडु गोड स्मृती त्या डायरीच्याद्वारे जाग्या होतात. सदर चित्रपट १९५१ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९६ मिनीटांचा आहे.
४) ऑटम सोनाटा : जगप्रसिद्ध पियानो वादक शार्बेट आणि तिच्या मुलींच्या संबंधांची ही नाट्यमय कहाणी आहे. शार्लोट आता निवृत्तीनंतरचे जीवन जगत आहे. तिच्या वादनाच्या कारकिर्दीत तिचे आपल्या इव्हा व हेलेन ह्या मुलींकडे दुर्लक्ष झाले आहे. इव्हाच्या घरी ती येते. तेथे तिची हेलेन ह्या तिच्या मतीमंद मुलीशीही गाठ पडते. इव्हा व शार्लोट ह्यांच्या भेटीमध्ये इतक्या वर्षांच्या तणावाचे निराकरण होते कां? सदर चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी १०० मिनीटांचा आहे.

हे चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Monday, 27 August 2018

फोम फ्लोअर (तीनदिवसीय कार्यशाळा)


सध्या विविध कार्यक्रमात आणि रोजही फोम फ्लोअरचे विविध प्रकार वापरले जात आहेत. ते कसे बनवले जातात व त्याचं साहित्य काय असेल अशी शंका प्रत्येक महिलेच्या मनामध्ये असते, त्याच अनुषंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे फोम फ्लोअर तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत प्रियांका घरात या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे मर्यादीत १२ सीट असून प्रथम येणा-यास प्राधान्य देण्यात येईल.
नेकलेस विथ अरनिंग, फिंगर रिंग, ब्रेसलेट, हेअर ब्रोच, सारी ब्रोच इत्यादी प्रकार शिकविले जाणार आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून २००० रूपये शुल्क, आणि १०५० मटेरिअल्स शुल्क आकारले जाईल.
ही कार्यशाळा ५,६,७ सप्टेंबरला दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, बेसमेन्ट हॉल, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालया शेजारी नरिमन पॉईंट येथे सुरू होईल. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

कॅफे स्टाईल कॉफी घरी कशी तयार करतात (एकदिवसीय कार्यशाळा)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे कॅफे स्टाईल कॉफी घरी कशी तयार करतात या विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पल्लवी नेने या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे मर्यादीत सीट असून प्रथम येणा-यास प्राधान्य देण्यात येईल.

कार्यशाळेत क्रन्ची कॉफी, चोकोमोचा, हॉट चॉकलेट, क्रीमी कोल्ड कॉफी, हॉट कॉफी आणि ट्रॅडीशनल हॉट कॉफी इत्यादी प्रकार शिकविले जाणार आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाईल. त्यामध्ये प्रिंटेड नोटस् आणि कॉफीसाठी लागणारं सर्व साहित्य पुरवलं जाईलं.

ही कार्यशाळा शनिवारी १ सप्टेंबरला ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, बेसमेन्ट हॉल, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालया शेजारी नरिमन पॉईंट येथे सुरू होईल. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

Sunday, 26 August 2018

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप

सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण (अलिमको) कानपूर जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप केंद्रिय स.क.मंत्री कृष्णपाल गुर्जर,मा खा.शरदचंद्रजी पवार,मा.खा.सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थिती करण्यात आले.

घरी पिज्जा कसा तयार करू शकता.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे स्पेशल पॅन पिज्जाची एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कुकिंग मंत्रा अकादमीच्या अध्यक्ष पल्लवी नेने यांनी उपस्थित महिलांना प्रात्यक्षित करून दाखवले, आणि विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली. 

विवेकवादी चळवळीत हवी तरूणांची साथ हवी - मुक्ता दाभोळकर


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र ठाणे, कोकण मराठी साहित्य परिषद, युवा शक्ती मुंबई-ठाणे यांच्या विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरण दिनानिमित्त विवेकवादी चळवळीत हवी तरूणांची साथ हवी आणि वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे मुंबई-ठाण्यातील अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.
प्रशिक्षक, विद्यार्थी आणि पालक यासर्वांनी दोन वर्ग भरून गेले होते. अ आणि ब असे दोन गट करून दुपारी २ वाजता स्पर्धेला सुरूवात झाली. वेगवेगळे विषय समोर असताना १) डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी भारतीय समाजासाठी दिलेले योगदान २) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ग्रंथसंपदा या दोन विषयांवर पूर्व पदवीधरकांचा या विषयांवरती बोलण्याचा कल अधिक होतो. महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईल या विषयावरती अधिक बोलले.
व्याख्यानाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर अमोल नाले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविकं केलं. सुरूवातीला मुक्ता दाभोळकर यांनी तरूणांनी विवेकवादी का व्हायला हवं हे समजून सांगितलं, त्यानंतर विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यंक्रमाचा विडिओ या लिंकवर उपलब्ध आहे. https://youtu.be/g84gINPo7H8

इनकन टॅक्स आणि जीएसटी संबंधीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी विषयावरती मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे इनकन टॅक्स आणि जीएसटी संबंधीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी या विषयावरती मंगळवारी ४ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत सनदी लेखापाल (सीए) अजीत जोशी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हा कार्यक्रम बेसमेंट हॉल, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालयाच्या शेजारी, नरिमन पॉईंट येथे होईल. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

Monday, 20 August 2018

वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप

सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण (अलिमको) कानपूर जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी २४ ऑगस्ट २०१८ रोजी ग. दी माडगुळकर सभागृह, विद्या प्रतिष्ठान, एम. आय. डी. सी, बारामती पुणे येथे सकाळी १० वाजता ते सायंकाळी ६ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येईल. यापूर्वी तपासणी झालेल्या व मोजमाप केलेल्या ३५०० ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येईल.

या कार्यक्रमाला मा. ना. थावररचंदजी गेहलोत (केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री) मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब (अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई) मा. खा. सौ. सुप्रिया सुळे ( निमंत्रक, अपंग हक्क विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई) मा. आ. अजित पवार, मा. श्री. रूपेश जयवंशी (आयुक्त, अपंगकल्याण आयुक्तालय, पुणे) मा. श्री. नवलकिशोर राम (जिल्हाधिकारी, पुणे) याचबरोबर केंद्रातील राज्यातील सचिव, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. 

Sunday, 19 August 2018

मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी काय करता येणे शक्य आहे तसेच उत्तम कार्यक्रम कसे करता होतील आणि विचारांची, साहित्याची देवघेव होऊन एकूणच मराठी भाषा/वाड्:मयाचा विकास कसा साधता येईल या विषयावरती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक कार्यक्रमाला हजर होते.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही राज्यातील एक नामांकित संस्था आहे. मराठी वाड्:मय, भाषा आणि संस्कृती या क्षेत्रात संस्थेचे मोठे कार्य आहे. मुंबईत संस्थेच्या असलेल्या ४४ शाखांच्या माध्यमातूंन अनेक उपक्रम सुरू आहेत.

बैठकीला उपस्थित राहिलेल्या प्राध्यापकांनी सहली, पुस्तक प्रकाशन सारखे विविध उपक्रम राबिवण्याचा सल्ला आयोजकांना दिला. तसेच विद्यार्थ्यांनी कविता वाचन करत येणाऱ्या पिढीला ईरिडिंग विचार करावा असेही सांगितले.

औरंगाबादेत युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली उत्साहात संपन्न

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद - नवमहाराष्ट्र युवा अभियान व रोटरॅक्ट क्लब ऑफ औरंगाबाद एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी या भावनेने ‘युवा स्वातंत्र ज्योत रॅली’चे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवार, दि. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन विभागीय केंद्राचे कार्यकारिणी सदस्य डॉ.श्रीरंग देशपांडे यांच्या हस्ते सायं. ६ वा. मशाल प्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद सेंटरचे अध्यक्ष आशुतोष बडवे, डीआरआर रोटरॅक्ट क्षितिज चौधरी, सुबोध जाधव, गणेश घुले, डॉ.दिनेश वंजारे, श्रीकांत देशपांडे, श्रीराम पोतदार आदी मान्यवर होते.
रॅलीचे यंदा अकरावे वर्ष होते,रॅली चा समारोप पैठणगेट येथे भारतीय संविधानाच्या सरनामा वाचनाने व राष्ट्रगीताने झाला. याप्रसंगी तीनशेहून अधिक युवांची उपस्थिती होती.रॅलीच्या यशस्वीतेसाठी मंगेश निरंतर, प्रवीण देशमुख, दीपक जाधव, डॉ.राहुल बडे, ऍड.तथागत कांबळे, ऍड.सुस्मिता दौड, अक्षय गोरे, सचिन दाभाडे, ऋषिकेश खंडाळे, सुशील बोर्डे, ओंकार तेंडुलकर, प्रभाकर लिंगायत, गिरीजाराम क्षिरसागर, उमेश राऊत, निलेश काळे,निलेश निकम आदींनी पुढाकार घेतला.

देशासाठी लढणार्‍यांचे स्मरण करून प्रत्येकाने देशहिताचा विचार करावा- विश्वास ठाकूर


नाशिक  : देशासाठी लढणार्‍या हुतात्म्यांचे स्मरण करून देश विकासासाठी व देशरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे असून लोकशाही मूल्यांची जपणूक करून समानता जोपासावी. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘युवा स्वतंत्रता ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड येथून रॅलीला प्रारंभ झाला. गंगापूरनाका,  के.टी.एच.एम. महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, हुतात्मा स्मारक सीबीएस येथे रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी अर्चना भागवत यांनी राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन केले. भारतमातेच्या वेशातील मुलगी सजविलेल्या रथात विराजमान झालेली होती.
यावेळी उपस्थित युवकांनी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. रॅलीत अनेक सामाजिक संस्था उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. रॅलीच्या सुरूवातीला  शिक्षण व आरोग्यविषयक प्रबोधनपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. रॅलीमध्ये प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य अ‍ॅड. नितिन ठाकरे तसेच अमर भागवत, चंद्रशेखर ओढेकर, किरण निकम, प्रसाद पाटील, गोरख चव्हाण, विवेकराज ठाकूर, मंदार ठाकूर, कैलास सुर्यवंशी, किशोर त्रिभुवन, रमेश बागुल, सुरेश वाघ, पूनम काशिकर, प्रियंका ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

‘चित्रपट चावडी’ तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘द मिस्टीक मॅस्युर’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १८ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ईस्माईल मर्चंट यांचा ‘द मिस्टीक मॅस्युर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
 सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
नोबेल पारीतोषिक विजेते लेखक विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल (व्ही.एस. नायपॉल) यांचे नुकतेच निधन झाले. ते भारतीय वंशाचे पण त्रिनीदाद, टोबॅगो येथील रहिवासी त्यांच्या पहिल्याच कादंबरीवर आधारीत द मिस्टीक मॅस्युर हा चित्रपट आहे.

साधारण १९४० चे त्रिनीदाद हे शहर एक ब्रिटीश वसाहत तिथे गणेश रामसेयोर नावाचा भारतीय वंशाचा तरूण व त्याची पत्नी लीला रहात असतात. गणेश लेखक होण्याची स्वप्ने पहातांना हिंदु धर्माचा प्रचार करतो. परंतु, त्याची किर्ती हळुहळु दैवी शक्ती असलेला अशी झाली. गणेशच्या महत्त्वाकांक्षा वाढत जातात. त्यानंतर नेमके काय घडते? हे बघण्यासाठी अवश्य या. सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या इंग्लिश चित्रपटाचा कालावधी ११७ मिनिटांचा आहे.

हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

मान्यवरांनी पेमानंद रूपवते यांच्या आठवणींना उजाळा दिला

कालकथित प्रेमानंद रुपवते यांचे शनिवार दि. ४ ऑगस्ट २०१८ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई , बहुजन शिक्षण संघ आणि चेतना संस्था, तसेच विविध संस्था –संघटना-मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, मुंबई येथे स्मृती –अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या सभेस मा. बाळासाहेब थोरात , मा. सुप्रिया सुळे, मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, मा. मिलिंद रानडे, मा. आनंदराज आंबेडकर, मा. भीमराव पांचाळे, मा. रावसाहेब कसबे, मा. क्रांती शाह, मा. लामा लोबझांग, मा. उल्हास पवार, मा. डॉ. सुधीर तांबे, मा. मधुकरराव पिचड आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वांना रूपवते यांच्या आठवणींना उजाळा दिला. संपुर्ण कार्यक्रम या लिंक वरती उपलब्ध आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/311493786075160

Monday, 13 August 2018

घरी पिज्जा कसा तयार करायचा (एकदिवसीय कार्यशाळा)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे स्पेशल पॅन पिज्जाची एकदिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. कुकिंग मंत्रा अकादमीच्या अध्यक्ष पल्लवी नेने सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील. शुक्रवारी २४ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बेसमेंट हॉल, जनरल जगन्नाथ भोसलेमार्ग, नरिमन पॉईट येथे कार्यशाळा होईल. (ही कार्यशाळा फक्त २० लोकांसाठी असून प्रथम संपर्क साधणा-यास पहिले प्राधान्य दिले जाईल.)
कार्यशाळेत सहभागी होणा-या प्रत्येक प्रशिणार्थीकडून १५०० रूपये शुल्क आकारलं जाईल. त्याबरोबर घरी ज्वारी, बाजरी, गहू, यांच्या पीठापासून पीज्जा कसा तयार करता येईल. तसेच सॉस, बीबीक्यू, डबल चीज, स्पेशल पनीर, असे अनेक पीज्जाचे प्रकार घरी कसे तयार करायचे याबाबतही नेने मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेला लागणारं सर्व साहित्य महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे पुरवलं जाईल. त्याच्यासोबत तूम्हाला नोटस देण्यात येतील. तसेच प्रक्टील सत्र, पिज्जा बनवण्याच्या आणखी नवीन पध्दती, आरोग्याला हितकारण रेसीपी, शिकवतं असताना तयार केलेल्या पिज्जाची टेस्ट सुध्दा सहभागी प्रशिक्षणार्थीला देण्यात येईल. संपर्क संजना पवार - ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८

धनकवडी येथे ६०० कर्णबधिर व्यक्तिंना मोफत श्रवणयंत्र


स्टार्की फाउंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅन्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, मुंबई, ठाकरसी ग्रुप, मुंबई, विद्या प्रतिष्ठान, बारामती, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज शरदचंद्र जी पवार बहुउद्देशीय केंद्र धनकवडी येथे ६०० कर्णबधिर व्यक्तिंना मोफत श्रवणयंत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यध्यक्ष मा.सुप्रियाताई सुळे, मा. आयुक्त रुचेश जयवंशी , मा. विजय कान्हेकर व संस्थेचे इतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बारामती मध्ये मोफत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप

स्टार्की फाऊंडेशन अमेरीका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती, महात्मा गांधी सेवा संघ आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यात ग्रामीण व शहरी विभागातील कर्णबधीर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. 

दिव्यांग कट्टयाला उस्फुर्त प्रतिसाद

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे अपंग हक्क विकास मंचातर्फे दर महिन्याला होणा-या आयोजित दिव्यांग कट्टयामध्ये "स्टॉलधारक अपंग व्यक्तींच्या समस्या" या विषयाला अनुसरुन या विषयावरती नूकतीच चर्चा झाली.

कट्टयामध्ये बृन्हमुंबई, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार, बदलापुर या महानगरपालिका/ नगरपरिषदेतील अपंग व्यक्तींनी सहभाग घेतला, आपआपल्या महानगरपालिकेत, नगरपरिषदेत स्टॉलधारक अपंग व्यक्तींना मिळणा-या सोयी-सुविधा आणि निर्माण झालेल्या समस्यांची मांडणी करण्यात आली.  रमेश कोळी यांच्या मदतीने पाठपुरावा करुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन  बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या 24 वार्डाच्या स्टॉलधारक अपंगांची तपशीलवार  माहिती प्राप्त केली असल्याचे अब्दुल्ला शेख यांनी सांगितले, त्याच धर्तीवर माहितीचा अधिकार अंतर्गत इतर नगरपालिकेतील स्टॉलसंदर्भातील सर्व माहिती मागविण्यासाठी अर्ज संबंधित नगरपालिकांना देण्यात आल्याची माहिती कट्टयाचे संयोजक शमीम खान यांनी दिली. तसेच बृन्हमुंबई महानगरपालिका व परिसरातील काही नगरपालिका, नगरपरिषदेच्या प्रत्येक वार्डमध्ये विषयाच्या अनुषंगाने एक संघटक नेमण्यात येणार असल्याचे मंचाचे अनिल चाळके यांनी सांगितले. या कामाला अधिक वेग येण्यासाठी प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीत या विषयावर साप्ताहिक बैठका घेण्यात येतील असे खान म्हणाले शेवटी उपस्थित सर्वांचे आभार अंबरनाथचे रवी कौल यांनी मानले.

Sunday, 12 August 2018

ठाणे विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा

ठाणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणदिनाचे औचित्य साधून यशवंतरांव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र ठाणे, कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती मुंबई - ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे आणि मुंबईकरांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन या दोन स्पर्धां आयोजीत करण्यात आल्या आहेत. यातील वक्तृत्व स्पर्धा दिनांक २२ ऑगस्ट रोजी एम. एच. हायस्कूल, ठाणे येथे दुपारी १ वाजता घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे नियम आणि तपशील माहितीसाठी विभागावार दिलेल्या संपर्क क्रमांकावरती व्हाट्सअॅप माध्यमातून संपर्क साधावा.
वक्तृत्व स्पर्धा - गट १ - ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता -  नववी ते बारावी ) 
१) सारे भारतीय माझे बांधव आहेत ?  
२) मालिकांमधील दाखवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि समाज  
३) स्मार्ट फोनच्या जमान्यात माणसं विचारांनी स्मार्ट झालीत का ? 
४) आवरा त्या प्लास्टिकच्या विळख्याला. 
५) आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाची गरज.   (संपर्क क्रमांक - ९८७०५ ८८६८२)  
वक्तृत्व स्पर्धा - गट २ - ( पदवी गट  - प्रथम वर्ष  ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल वा अन्य शाखा BMS BMM)
१) डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी  भारतीय समाजासाठी दिलेले योगदान
२) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ग्रंथसंपदा 
३)  कधी साकारेल का आरक्षण विरहित भारत ?  
४) जातीसाठी घालवावा का जीव आपला ? 
५) होय, भावना डिजिटल होतायत. (संपर्क क्रमांक - ८८९८५ ५३४९५)

संवाद लेखन स्पर्धा : गट १ = ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता -  नववी ते बारावी ) 
१) जातीविरहित भारत  याबाबत  भारतमाता आणि भारतीय नागरिक यांच्यातील संवाद 
२) कोणत्याही प्रवेश अर्जामध्ये  जात धर्म याबाबत होणा-या उल्लेखाबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद
३) गावातील बळी प्रकार थांबविण्याबाबत गावातील प्रतिष्ठित मांत्रिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांच्यातील संवाद. 
४)प्लास्टिक बंदीबाबत सकारात्मक - नकारात्मक विचार करणाऱ्या तरुणांतील संवाद. 
५) व्हाटसपवर येणाऱ्या संदेशापाठीमागे असणारी प्रचंड कल्पनाशक्ती याबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद. संपर्कक्रमांक - ७७३८९ ५४७०८ 
संवाद लेखन स्पर्धा  =  गट २ - ( पदवी गट  - प्रथम वर्ष  ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल वा अन्य शाखा BMS BMM )
१) देशाच्या अस्थिरतेबद्दल लढवय्या सैनिक आणि बळीराजा यांच्यातील संवाद.  
२) समाजाला पोखरणाऱ्या अंधश्रद्धेबद्दल श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संवाद.
३) आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्यांंबाबत शिवाजी महाराज आणि मावळे यांच्यातील संवाद. 
४)ढोलताशे बडवणारी संस्कृती निर्माण होतेय याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि युवावर्गाशी संवाद. 
५)करिअरच्या वाटेवर शिक्षण मूल्यांचा अभाव असलेली पिढी जन्माला येतेय याबाबत समाजसुधारकांचा तरुणांशी झालेला संवाद . (संपर्क क्रमांक - ८१०८२ ४७०७४)
स्पर्धेचे  नियम : (वक्तृत्व स्पर्धेसाठी नियम ) 
१) कोणत्याही स्पर्धेत एका शाळेचे वा महाविद्यालयाचे २ स्पर्धक असावेत.  
२) वक्तृत्व स्पर्धेसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी ५ मिनिटे तर पदवीसाठी ७ मिनिटांचा कालावधी आहे.
३) स्पर्धेच्या वेळी स्पर्धकाकडे शाळेचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक आहे. 
४) स्पर्धेसाठी आपली नावे - 
माध्यमिक - उच्च माध्यमिकगटासाठी ( शुभांगी विरकर -९८७०५ ८८६८२ ) 
पदवीगटासाठी ( कमलेश भिसे ८८९८५ ५३४९५ ) 
यांच्याकडे व्हाटसएपवरती २० ऑगस्ट पर्यंत द्यावीत. त्यानंतर नावनोंदणी करायची असल्यास याच समन्वयकांशी संपर्क साधावा. 
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 
६)काही शंका असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हास्टप द्वारा संपर्क साधावा.
७)वेळेत हजर राहणे अत्यावश्यक. 
पारितोषिके : रोख पारितोषिक  +  पुस्तकभेट +  प्रमाणपत्र 
बुधवार : दिनांक २२ ऑगस्ट  २०१८ - दुपारी   १.०० वाजता स्थळ : एम एच हायस्कूल , ठाणे 
संवाद लेखनासाठी नियम : 
१) संवाद लेखन इमेल वर पाठवायचे आहे -  
वैभव मेल आणि नंबर - ७७३८९ ५४७०८ vpadave7@gmail.com
रुपाली  मेल आणि नंबर - ८१०८२ ४७०७४ rupalipinjan@gmail.com  
२) मेलवर संवादलेखन पाठवताना ते टाईप केलेले असले तर उत्तम... पण त्यासोबत font ही पाठवावा.
३) जर टाईप करुन पाठवता येणे शक्य नसेल तर उत्तम हस्ताक्षरात कागदावर लिहून त्याचा क्लिअर फोटो पाठवावा..
४) संवादलेखन करताना चार पेक्षा जास्त पात्र नसावीत..
५) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्यासाठी २०-२५ संवाद असावेत. तर पदवीगटासाठी ३०-३५ संवाद असावेत. साधारण ३-४ फुलस्केप असावेत. 
६) संवाद पाठविण्याची अंतिम तारीख १८ आँगस्ट आहे.. त्यानंतर पाठवायचे असल्यास संबंधित समन्वयकाशी संपर्क साधावा.
७) संवादलेखन पाठवताना त्यासोबत विद्यार्थ्याचे नाव , पत्ता, शाळा / महाविद्यालयाचे नाव, वर्ष, इयत्ता, संपर्क नंबर , पाठवणे अत्यावश्यक आहे.
८) काही शंका असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा..किंवा 
deepathanekar73@gmail.com या मेलवर शंका विचाराव्यात. 
९) निकाल आपल्याला फोन करून कळविला जाईल आणि पारितोषिक वितरणासंबंधीसुद्धा आपल्याला मेल केला जाईल. 
पारितोषिके :   रोख पारितोषिक  +  पुस्तकभेट +  प्रमाणपत्र 
ठाणे आणि मुंबईतील अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रा. दीपा ठाणेकर, श्री निखिल मोंडकर आणि श्री. अमोल नाले यांनी केले आहे.

संदेश भंडारे यांच्या 'देवळी' छायाचित्र प्रदर्शन उत्साहात सुरू

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र,औरंगाबाद व एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयातर्फे आयोजित प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या 'देवळी कोनाडा' या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज एमजीएम च्या कलादीर्घा आर्ट गॅलरीमध्ये विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, याप्रसंगी संदेश भंडारे,प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी याप्रसंगी संवाद साधतांना म्हटले की,आधुनिकीकरणात आपण बऱ्याच गोष्टींना मुकत चाललो आहे. देवळी व कोनाडा ही घराचा अविभाज्य भाग असलेली गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे, हे फक्त छायाचित्र प्रदर्शन नाही तर एका समृद्ध परंपरेचा दस्तावेज आहे. त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणीही यावेळी सांगितल्या, प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी देवळी कोनाडा प्रदर्शन पाहताना आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या,बालपणीच्या आठवणी या देवळी कोनाडा हे आपल्या प्रिय व्यक्तिशी जोडल्या गेल्या आहेत, असे प्रतिपादन केले. छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी याप्रसंगी हे छायाचित्र काढण्यामागील आपली भूमिका विस्तारपूर्वक मांडली.हळूहळू आपल्या जगण्याचा भाग असलेल्या अनेक गोष्टी इतिहासजमा होत आहेत कालांतराने प्रत्येक घराचा आवश्यक भाग असलेले देवळी कोनाडे हे कालौघात नव्या स्वरूपात बदलत आहेत वा आता त्याची उपयुक्तता संपत चालली आहे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य रा. रं.बोराडे यांचा अंकुशराव कदम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला ,याप्रसंगी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन एमजीएम फिल्म आर्ट्सचे प्रमुख शिव कदम यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुबोध जाधव,गणेश घुले, राजेंद्र वाळके,प्रवीण देशमुख,सचिन दाभाडे,मंगेश निरंतर,उमेश राऊत यांनी प्रयत्न केले.

सदरील प्रदर्शन दि १९ ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी खुले असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

वाहतुक सुरक्षा उपक्रमाचा विश्वास को-ऑप. बँकेतर्फे गौरव

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील रस्ते वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाहनचालकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, बेशिस्तपणा हे यामागचे कारण आहे. रस्ते वाहतूकीमध्ये होणारे अपघात हा ही एक प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे. हे अपघात कमी होण्यासाठी वाहनचालकाने काळजी घेण्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे निश्‍चितच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. वाहतूक सुरक्षा व हेल्मेट सक्तीविषयी जनप्रबोधन व्हावे या उद्देशाने विश्वास को-ऑप. बँक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांचे संयुक्त विद्यमाने काठे गल्ली, नाशिक येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची संकल्पना बँकेचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. विश्वास को-ऑप. बँक सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रभागी असते. त्याचाच एक भाग होता. विश्वास ठाकूर यांची ‘नाशिक फर्स्ट’ या संस्थेतर्फे व वाहतूक सुरक्षेविषयक प्रबोधन करण्यासाठी २४ सन्माननीय व्यक्तींमध्ये DON (Dost of Nashik) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून वाहतूक सुरक्षेविषयी ते अनेक उपक्रम राबवित असतात. 

निमित्त होते गेल्या ९९ दिवसांपासून काठेगल्ली सिग्नल, द्वारका येथे केरळ महिला विकास समितीतर्फे राबविण्यात येणार्‍या ‘हेल्मेट सक्ती’ विषयी उपक्रमाचे त्यांच्या या अभियानास आज १०० दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केरळ महिला विकास समितीच्या श्रीमती जया कुरूप व त्यांच्या सहकार्‍यांचा सौ. ज्योती विश्वास ठाकूर यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना सौ. ज्योती विश्वास ठाकूर म्हणाल्या की, तरूण पिढीने आपल्या जीवनाचे मोल तसेच कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. हेल्मेट सक्ती शिवायही हेल्मेट वापरण्याची सवय ज्या दिवशी जोपासली जाईल त्यादिवशी भारतात होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत हे कौतुकास्पद आहे. विश्वास को-ऑप. बँकेचा यातील सहभाग सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
संदीप भानोसे यांनी याप्रसंगी रस्ते अपघात आणि नियमांचे उल्लंघन या विषयी जनजागृती होण्यासाठी असे उपक्रम निश्‍चितच दिशादर्शक आहेत असे विचार मांडले. यावेळी काठे गल्ली सिग्नलवर हेल्मेटधारक व सिट बेल्टचा वापर करणार्‍यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ज्योती विश्वास ठाकूर, माधुरी हावरे, मधुरा पंचाक्षरी, बँकेच्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारीका देशपांडे, किशोर त्रिभुवन, वैशाली दाणी, स्मिता पवार, पूनम काशिकर, प्रियंका ठाकूर, रूचिता ठाकूर, जया हरीदास, मिनी नायर, अनु रविंद्रन आदी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Wednesday, 8 August 2018

युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१८

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१८... राष्ट्रभक्तिच्या जाणिवांचा जागर...मंगळवारी १४ ऑगस्ट २०१८ शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ते चैत्यभूमी दादर...वेळ सायंकाळी ५ वाजता....

Tuesday, 7 August 2018

मोफत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर

स्टार्की फाऊंडेशन अमेरीका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती, महात्मा गांधी सेवा संघ आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील एकूण ७०० ग्रामीण व शहरी विभागातील कर्णबधीर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी करून शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २०१८ रोजी ग. दी. माडगुळकर सभागृह, विद्या प्रतिष्ठान एम. आय. डी. सी. बारामती, येथे तर सोमवारी १३ ऑगस्ट २०१८ रोजी शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय केंद्र धनकवडी, पुणे येथे सकाळी १० सायंकाळी ६ यावेळेत मोफत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरात प्रत्येक कर्णबधीर मुलास व ज्येष्ठ नागरिकास श्रवणयंत्र देण्यात येईल.

चित्रपट चावडीतर्फे 'द लॉन्ग वॉक टू फ्रिड्म' चित्रपट दाखवणार....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत 'द लॉन्ग वॉक टू फ्रिड्म' हा चित्रपट शुक्रवारी १० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता चव्हाण सेंटर मध्ये दाखविण्यात येणार आहे.
१८ जुलै १९१८ला जन्मलेल्या मंडेलांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी जो अतूलनीय लढा दिला त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. द 'लॉन्ग वॉक टू फ्रिड्म' हा त्याच्या आयुष्यावरील चित्रपट असून त्यामध्ये व्यक्तीगत आयुष्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा आणि जागतिक पातळीवरील अनेक लढ्यांचा पट यामध्ये पहायला मिळतो. मंडेला १९९४ ते १९९९ या काळात दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष होते. वर्षानुवर्ष 'काळे' म्हणून हिनवल्या गेलेल्या समूहातील ते पहिले राष्ट्राध्यक्ष. शांततेचं नोबेलही त्यांनी प्रदान करण्यात आले होते. अशा ब-याचशा घटना प्रेरणा देणा-या आहेत. प्रेरणा देणारी ही फिल्म सुमारे दोन तास कालावधीची आहे. ही फिल्म सर्वांसाठी विनामूल्य असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Thursday, 2 August 2018

औरंगाबादमध्ये 'देवळी' छायाचित्र प्रदर्शन....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने संदेश भंडारे यांच्या 'देवळी' छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ११ ऑगस्ट ते रविवार १९ ऑगस्ट दरम्यान देवळी छायाचित्र प्रदर्शन औरंगाबाद वासियांना एमजीएम कलादिर्घा आर्ट गॅलरी, एमजीएम स्टेडियम परिसर, गेट क्र. ७ औरंगाबाद (क्लोवरडेल शाळेच्या बाजूकडील गेट) येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत पाहता येईल.

संदेश भंडारे यांच्याबाबत थोडक्यात माहिती...एक विषय निवडून, त्याचे उभे-आडवे असंख्य छेद घेत, अनेकविध कोनांमधून, छायाचित्रांमधून मांडणारा, बोलणारा, भाष्य करणारे सुप्रसिध्द छायाचित्रकार !
संदेश यांच्या एक ब्राह्मण, तमाशा, बहुरूपी, कुस्ती, वारी, देवळी-कोनाडा या विषयांवरील छायाचित्रांची लंडन, पॅरिस, मुंबई, विद्यापीठ, पुणे, कोची व कोल्हापूर येथे प्रदर्शने झालेली आहेत. या व्यतिरिक्त असा एक महाराष्ट्र, मुंबई विद्यापीठ, पुणे शहर, कोल्हापूर शहर ही त्यांची छायाचित्रांचे पुस्तकेही प्रसिध्द आहेत.
संदेश यांचा कॅमेरा वास्तवाच्या पार जाऊन वस्तू, आकार, अवकाश, चेहरे आणि आकृत्यांचे नवे अर्थ उलगडून दाखवतो.

Wednesday, 1 August 2018

विज्ञानगंगाचे एकोणतीसावे पुष्प...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत एकोणतीसावे पुष्प टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील शास्त्रज्ञ प्रा. विदिता वैद्य यांचे 'द इमोशनल ब्रेन' या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि १७ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.