दि. २० : पर्यावरणाचे जनत व संवर्धन ही
आपली सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी ‘इको फ्रेंडली’ ही
संकल्पना प्रत्येकाने आपल्यात रूजवणे म्हणजे निसर्गाशी मैत्री होय. त्यासाठी शाडू
मातीपासून गणेशमूर्ती तयार करून प्रत्येकाने आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन
सौ. राजश्री शिंपी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक,
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक,
सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणा विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने दिनांक २० व २१
ऑगस्ट रोजी दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. पहिली
कार्यशाळा महानगरपालिका शाळा क्र. ४३, अटल बिहारी वाजपेयी प्राथमिक
विद्यामंदिर,
काठे गल्ली येथे झाली तर दुसरी पंचवटी माध्यमिक विद्यालय उदय
कॉलनी क्रांतीनगर, पंचवटी येथे संपन्न झाली. संकल्पना विश्वास गृपचे कुटुंबप्रमुख
विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.
पर्यावरण जागृतीचा, रक्षणाचा अनोखा संदेश देणारी ‘शाडू मूर्ती पासून गणेश मुर्ती
कार्यशाळा’ विद्यार्थ्यांमध्ये नवी जाणीव निर्माण करणारी ठरली.
यात १०० हून अधिक विद्यार्थ्यांना सहभाग
घेतला. यात सौ. शिंपी यांनी शाडू मातीचे फायदे विशद केले व विद्यार्थ्यांकडून गणेश
मूर्ती बनवून घेतल्या. तसेच ध्वनी व जलप्रदूषण गणेशोत्सवात होत असल्याने ते
रोखण्याचे आवाहन केले.
शाळेचे स्वागत व प्रास्ताविक
मुख्याध्यापक प्रशांत पाटील यांनी केले. ते म्हणाले की, पर्यावरणाविषयी
लोकजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून असे उपक्रम राबवण्याची गरज आहे.
त्याच प्रयत्नांचा हा भाग आहे. यावेळी शाळेचे शिक्षक धनंजय शुक्ला, नामदेव बागूल, रोहिदास कोकणी, अंकुश
तळपे,
निता आमले यांनी मेहनत घेतली. या प्रसंगी दिपांजली महाजन,
मुख्याध्यापक व्ही के आहिरे, एस एस आव्हाड, एन सी कारे, मनिषा पगारे, ममता जाधव, ज्ञानेश्वर शिरसाठ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment