Friday, 28 July 2017

'विज्ञानगंगा'चे अठरावे पुष्प..'जेनेटिक्स'


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अठरावे पुष्प, आघारकार रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथील प्राध्यापक श्री. सुरेंद्र घासकडबी यांचे 'जेनेटिक्स' या विषयावर शुक्रवार, दिनांक १८ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे गुंफणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे. 

करिअरचा कानमंत्र


यशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी आणि महाराष्ट्र महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स आणि नोकरी विषयक नूकतेच चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. करिअर गाईडन्स आणि नोकरी या विषयावर प्रफुल्ल बाईंग यांनी मुलांना मार्गदर्शन केले. 
इंटरनेट, फेसबुक आणि व्हॉट्स अप्प या गोष्टी गरजेपुरत्या वापरुन आपला बहुमोल वेळ निवडलेल्या क्षेत्राला द्यावा, तसेच आपण निवडलेल्या क्षेत्राची आपल्याला पुर्ण माहिती असावी. या गोष्टी आतापासून केल्यास आपल्याला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो असे प्रफुल्ल बाईंग यांनी मुलांना मार्गदर्शन केले. 

Monday, 24 July 2017

महिला व्यासपीठतर्फे "पौष्टिक सॅलडस्"ची प्रात्यक्षिक


सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या म्हणजेच आहाराच्या सवयी बदलल्या आहेत. जंक फूड व फास्टफूड मुळे स्वत:च्या आरोग्याकडे व आहाराकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचे दुष्परिणाम फार त्रासदायक होतात. तेव्हा आपल्या आहाराविषयी सतर्क रहाणे फार गरजेचे आहे. चौकस आहारात सॅलडचे फार महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे ४ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत सुप्रसिध्द शेफ तुषार प्रीती देशमुख यांचा "आई आणि स्वयपांक घर" हा मनोगत, गप्पा व प्रश्न उत्तरे व पदार्थ्यांची पाककृती असा चौरस कार्यक्रम बेसमेंट सभागृह, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्याजवळ नरीमन पॉंईट मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत "पौष्टिक सॅलडस्" ची प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम विनामुल्य असून प्रात्यक्षिकास सर्वांनी जरूर उपस्थित रहावे. 

Friday, 21 July 2017

'विज्ञानगंगा'चे सतरावे पुष्प संपन्न

'विज्ञानगंगा'चे सतरावे पुष्प संपन्न 


'
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सतरावे पुष्प 'चिरतारुण्य' या विषयावर टीआयएफआरमधील शास्त्रज्ञ डॉ. उल्लास कोलथुर यांनी चव्हाण सेंटरमध्ये उपस्थितांना चिरतारुण्य जपण्याबाबत मार्गदर्शन केले.
आपलं आयुष्य जेवढं आहे तेवढं चांगलं जगू असं बोलून कोलथुर यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. नंतर ते माणसाच्याच नव्हे, तर समस्त प्राणीसृष्टीच्या शरीरातील चिरतारुण्याला चैतन्य देण्याची क्षमता नेमकी कुठे दडली आहे, त्याचे रहस्य काय आहे याबाबत मार्गदर्शन केले.
सर्व सजीवांमध्ये आढळणाऱ्या चिरतारुण्याच्या जनुकास सक्रिय करण्याची क्षमता निश्चितपणे कोणत्या क्षेत्रात आहे, हेही उपस्थितांना पटवून दिले. तूमचं शरीर म्हणजे एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये अनेक मशींन्स आहेत. लागेलं तितकाच पौष्टिक आहार घ्या. जितकं शरीर चांगलं ठेवालं तितकं चांगलं आयुष्य जगालं असे ते म्हणाले. 

Thursday, 20 July 2017

रंगस्वरतर्फे ‘नदी वाहते’ चित्रपट‘श्वास’ चे दिग्दर्शक मा. संदीप सावंत यांचा नवीन आगामी चित्रपट ‘नदी वाहते’ प्रदर्शित होणार आहे. येत्या शनिवारी, दिनांक २२ जुलै २०१७ रोजी, संध्याकाळी ६:३० वाजता रंगस्वर या उपक्रमांतर्गत हा चित्रपट यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखवण्यात येणार आहे. तरी या चित्रपटास आपण उपस्थित राहावे हि विनंती.

अंडा विरहीत केकची कार्यशाळा संपन्न

अंडा विरहीत केकची कार्यशाळा संपन्न 


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रेश 'वेज' केक (अंडा विरहीत) या विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये अधिक महिलांनी सहभाग घेतला, ब्लॅक फॉरेस्ट केक, व्हाइट फॉरेस्ट केक, आंबा केक,अननस केक, स्टॉबेरी केक आणि चॉकलेट ट्रफेल केकची प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थी कडून करून घेतली. तसेच केकच्या संदर्भातल्या नोटस् देऊन शंकांचे निरसन केले.

मोफत करिअर गाईडन्स मार्गदर्शन...


यशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी आणि महाराष्ट्र महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी २८ जुलै २०१७ रोजी दुपारी ३ वाजता चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स आणि नोकरी विषयक मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संपर्क २२८१७९७५, २२०४३६१७, ९७६९२५६३४३.

Wednesday, 19 July 2017

‘चित्रपट चावडी’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘अ समर्स टेल’

‘चित्रपट चावडी’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे
चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘अ समर्स टेल’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने
‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार २१जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘अ समर्स टेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३. येथे दाखविण्यात येणार आहे.
विविध ऋतुंवर आधारित कथानकांच्या मालिकेतील एरिक रोहमर यांची ‘अ समर्स टेल’ ही नर्मविनोदी प्रेमकथा आहे. तरूण गणिताचा विद्यार्थी पण गिटार वादनाचा शौक असलेल्या गॅस्पार्ड व त्याची मैत्रिण लेना यांच्या सुट्टीमध्येˆस्पेनमधील भेटीची पण भेटीच्या दरम्यान त्याची आणखी दोन स्त्रियांशी गाठ पडते. गॅस्पार्ड आता तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या भेटीमुळे गोंधळात पडला आहे. त्यातुन तो कसा मार्ग काढतो ते पहाण्यासाठी जरूर या. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ११३ मिनीटांचा आहे.
न्यू सिनेमाच्या लाटेमधील एरिक रोहमर अपरिचित पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहे. चाळीसहून अधिक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. खास फ्रेंच ठसा असलेला एरिकचा सिनेमा म्हणजे थेट सरळ, सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सहज घटना टिपणारा त्यातून आपल्याला सौंदर्यदृष्टी, नातेसंबंधाची जाणीव सहजपणे जाणवते.
‘अ समर्स टेल’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Sunday, 16 July 2017

शिक्षण हक्क क़ायदा आणि गुणवत्ता विषयी मार्गदर्शन

शिक्षण हक्क क़ायदा आणि गुणवत्ता विषयी मार्गदर्शन 

मुंबई : शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणकट्टा' या उपक्रमांर्तगत नियमितपणे विविध विषयांचे आयोजन केले जाते. यावेळी "शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता" या महत्वाच्या विषयासंदर्भात शिक्षणकट्टयावर शिक्षक, पालक, यांची चव्हाण सेंटर मध्ये सकारात्मक चर्चा झाली.   सुरुवातीला श्रीमती बसंती रॉय यांनी उपस्थित पालक शिक्षक आणि पत्रकारांना कार्यक्रमाचे स्वरुप समजावून सांगितले आणि आजचा विषय शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले. सध्या पहिली ते आठवी पर्यंत मुलांना अधिनियम निष्पती केंद्रिय शाळांना लागू करण्यात आली आहे. म्हणजेच काही ठराविक गोष्टी मुलांना आल्याच् पाहिजेत असे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम सध्या तेलांगना राज्यात लागू करण्यात आला आहे. यावर उपस्थितांची मते संयोजक डॉ.वसंत काळपांडे जाणून घेतली.  उपस्थित शिक्षकांची समस्या जाणून घेऊन काळपांडे यांनी मार्गदर्शन केले. 

Friday, 14 July 2017

अपंग तपासणी शिबीर यशस्वीरीत्या संपन्न....
सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर पुणे जिल्हा परिषद, पुणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे आयोजित अपंग (दिव्यांग) व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी नाव नोंदणी व मोजमाप शिबीर आज जिल्हा रुग्णालय पौंढ येथे सहभागींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमात तब्बल हजार दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी झाली आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांची सर्व कार्यक्रमांना विशेष उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींच्या विविध समस्या, संवाद व समन्वयाच्या भूमिकेतून सोडविण्यासाठी अपंग हक्क विकास मंचाकडून कार्य केले जाते. या मंचामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत शिबिरांचे आयोजन करून सर्व प्रवर्गातील अपंगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साहित्य साधनांसाठीचे मोजमाप घेऊन, अपंगांना कृत्रिम अवयव व साधने वाटप मोफत उपलब्ध करून दिली जातात. या मंचामार्फत प्रत्येक अपंगांना त्यांच्या समस्येनुसार योग्य ती माहिती व सल्ला दिला जातो. अपंगांना आपल्या स्तरावरून सतत योग्य ते सहकार्य व मदत करण्याचा मंचाचा प्रयत्न असतो.
मागील तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, सासवड, भोर-वेल्हे, खडकवासला, पौंड येथे सुरू असलेल्या कार्यक्रमाला तहसिलदार, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. शिबीराच्या यशस्वितेसाठी महात्मा गांधी सेवा संघाचे कर्मचारी, अपंग हक्क विकास मंच, संयोजक विजय कान्हेकर, अभिजीत राऊत, विजय कस्बे, यांनी अधिक परिश्रम घेतले.

Wednesday, 12 July 2017

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असून दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असून दीर्घकालीन उपाययोजनांची गरज 

औरंगाबाद : शेतक-यांच्या मोठ्या मागणी नंतर शासनाकडून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. परंतु आज अतिदक्षता विभागा (आयसीयू) मध्ये असणा-या शेतक-यांसाठी ही कर्जमाफी म्हणजे फक्त एक सलाईन असून त्यांना खऱ्या अर्थाने जीवनदान देण्याकरिता दीर्घकालीन उपाय योजनांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी व्यक्त केले. 
     यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद उपक्रमात आयोजित “शेतक-यांची आंदोलने आत्ताच का?” या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. हमीभाव ही संकल्पनाच चुकीची असून शेतमालाला यापेक्षाही अधिक भाव मिळायला हवा, आणि उत्पादनाची थेट खरेदी शासनाने बाजारभावाने करावी असे त्यांनी यावेळी म्हंटले.
    १९८८ पासून २०१७ पर्यंत भारतात दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्यांपेक्षाही देशात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची आकडेवारी अधिक असून राज्यकर्त्याकरिता ही खेदाची बाब आहे. तसेच विविध प्रकारच्या शेतमालाचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा सरकारला अंदाज असतानाही याबाबत योग्य ते नियोजन केले नसल्याने याचा प्रचंड फटका शेतक-यांना बसला आहे.  त्याप्रमाणेच २०१४ ते १०१७ या कालावधी दरम्यान शेतमालाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली असून मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वात जास्त फटका शेतक-यांना बसला असल्याचे मतही यावेळी तांबे यांनी व्यक्त केले.
     या कार्यक्रमासाठी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम,  प्रा. जयदेव डोळे, डॉ.मानवेंद्र काचोळे, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, डॉ. रेखा शेळके यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रास्ताविक संयोजक नीलेश राऊत यांनी तर सूत्रसंचालन अपूर्वा कुलकर्णी व ऋचा वझे यांनी केले.  

Tuesday, 11 July 2017

"शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता"


"शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता" 

शिक्षण विकास मंच, चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  'शिक्षणकट्टा' या उपक्रमांर्तगत नियमितपणे आयोजन केले जाते. यावेळी  "शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता" या महत्वाच्या विषयासंदर्भात शिक्षणकट्टयावर चर्चा होणार आहे. या चर्चेस जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे याची मुख्य उपस्थिती राहणार आहे. तरी या चर्चेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षणतज्ज्ञ,पञकार ,पालक,विद्यार्थी यांची अधिक असावी. या चर्चेत सहभागी होण्याचे  आवाहन शिक्षणकट्टयाच्या निमंत्रिका श्रीमती बसंती रॉय यांनी केले आहे. या कार्यक्रम बोर्ड रूम ,पाचवा मजला ,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंञालयसमोर १५ जुलै रोजी शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत होईल. माधव सूर्यवंशी (समन्वयक) ९९६७५४६४९८ 

Monday, 10 July 2017

शेतक-यांची आंदोलने आत्ताच का ?

शेतक-यांची आंदोलने आत्ताच का ?

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्र संवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात सुरू असलेल्या शेतक-यांच्या विविध आंदोलनाच्या अनुषंगाने शेतक-यांची आंदोलने आत्ताच का ? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वा आईस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय एमजीएम परिसर औरंगाबाद व्याख्यानाला सुरूवात होईल. 
व्याख्यानाकरिता ज्येष्ठ पत्रकार व शेती प्रश्नाचे अभ्यासक मा. सुनील तांबे (मुंबई) यांना आमंत्रित करण्यात आलेले असून ते  देशभरातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाची भूमिका, दुष्काळामुळे प्रभावित कृषी जीवन, केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण  शेतकरी आंदोलनांमधील राजकीय सामाजिक सहभाग, कर्जमाफी आदी मुद्यांवर भाष्य करतील. 
सुनील तांबे हे मागील पंचवीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून कृषी पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. 'रॉयटर्स' या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत अनेक वर्ष त्यांनी कार्य केलेले असून 'शेती व मान्सून' तसेच हवामान बदल व त्याचा शेतीवर होणारा परिणाम' हे त्यांचे लिखानाचे विषय प्रामुख्याने राहिलेले आहे.
आताच्या परिस्थितीवर नेमकेपणाने सर्वांगीण मांडणी करणा-या या विशेष व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव मुकूंद भोगले, नीलेश राऊत, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव, रेणुका कड आदींनी केलेले आहे.  

अपंग तपासणी शिबीर दौंड येथे यशस्वीरीत्या संपन्न....

अपंग तपासणी शिबीर दौंड येथे यशस्वीरीत्या संपन्न....
सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर पुणे जिल्हा परिषद, पुणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे आयोजित अपंग (दिव्यांग) व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी नाव नोंदणी व मोजमाप शिबीर आज उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे सहभागींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमात एकूणच १००० दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी झाली आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींच्या विविध समस्या, संवाद व समन्वयाच्या भूमिकेतून सोडविण्यासाठी अपंग हक्क विकास मंचाकडून कार्य केले जाते. या मंचामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत शिबिरांचे आयोजन करून सर्व प्रवर्गातील अपंगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साहित्य साधनांसाठीचे मोजमाप घेऊन, अपंगांना कृत्रिम अवयव व साधने वाटप मोफत उपलब्ध करून दिली जातात. या मंचामार्फत प्रत्येक अपंगांना त्यांच्या समस्येनुसार योग्य ती माहिती व सल्ला दिला जातो. अपंगांना आपल्या स्तरावरून सतत योग्य ते सहकार्य व मदत करण्याचा मंचाचा प्रयत्न असतो.

Friday, 7 July 2017

निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी अनोखी गुरूपौर्णिमा

निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
रविवारी अनोखी गुरूपौर्णिमा

नाशिक : जीवनाच्या जडणघडणीत गुरूंचं जसं स्थान मोलाचे आहे तितकंच आपलं सृष्टीशी व निसर्गाशी आहे. कलावंतांच्या कलेचे अविष्कार तर निसर्गाची विविध रूपे घेऊन अवतरत असतात. याच सृष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमेला एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ या संत तुकाराम महाराजांच्या विचारांशी बांधिलकी जोडण्याचा हा अनोखा उपक्रम आहे. आर्किटेक्ट, चित्रकार शितल सोनवणे यांची या उपक्रमाची संकल्पना आहे. ‘आर्ट ऑफ शितल’ तर्फे आयोजित हा कार्यक्रम रविवार ९ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गंगापूर रोड जवळील  सुयोजित गार्डन, दत्त चौक, सहदेव नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. येथे आठ फुटाच्या भिंतीवर चिमण्या पोपट, बुलबुल इत्यादी पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यात आली आहेत.
कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित शपथ घेणार आहेत. मी पर्यावरणाचे रक्षण करेन, प्लास्टीकचा वापर करणार नाही, हॉर्न वाजवून ध्वनीप्रदुषण करणार नाही.
जनजागृती व प्रबोधनपर हा उपक्रम आहे. निसर्ग या गुरूला वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आर्ट ऑफ शितल’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Thursday, 6 July 2017

चित्रपटप्रेमींसाठी माय नाईट अ‍ॅट मॉड चित्रपट

चित्रपटप्रेमींसाठी माय नाईट अ‍ॅट मॉड चित्रपट

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार ७ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘माय नाईट अ‍ॅट मॉड’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
न्यू सिनेमाच्या लाटेमधील एरिक रोहमर अपरिचित पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहे. चाळीसहून अधिक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. खास फ्रेंच ठसा असलेला एरिकचा सिनेमा म्हणजे थेट सरळ, सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सहज घटना टिपणारा त्यातून आपल्याला सौंदर्यदृष्टी, नातेसंबंधाची जाणीव सहजपणे जाणवते.
एरीकने दिग्दर्शित केलेल्या सहा नितीकथांच्या मालिकेतील ही तिसरी कथा यात घटस्फोटीत एका डॉक्टरची व एका मध्यमवयीन तरूणीची भेटीची गोष्ट आहे. त्यात तत्वज्ञान, धर्म आहे.  राजकारण व नीतीमत्तेच्या संकल्पनांची चर्चा आहे. जीवनातील मूल्यांचा शोध आहे. १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १०५ मिनीटांचा आहे.
‘माय नाईट अ‍ॅट मॉड’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Wednesday, 5 July 2017

अंडा विरहीत केकची कार्यशाळा (वेजकेक)

अंडा विरहीत केकची कार्यशाळा (वेजकेक)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रेश 'वेज' केक (अंडा विरहीत) या विषयावरती २० जुलै २०१७ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेमध्ये ब्लॅक फॉरेस्ट केक, व्हाइट फॉरेस्ट केक, आंबा केक,अननस केक, स्टॉबेरी केक आणि चॉकलेट ट्रफेल केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळेची वेळ दुपारी २ ते ५ असून सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीं १००० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०

Tuesday, 4 July 2017

छत्र्यांवर ओघळला पावसाच्या शब्द-चित्रांचा अविष्कार

छत्र्यांवर ओघळला पावसाच्या शब्द-चित्रांचा अविष्कार
सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कार्यशाळेला जोरदार प्रतिसाद


नाशिक : पांढर्‍या शुभ्र छत्र्या आणि त्यावर ओघळणारे सप्तरंगी रंग आणि पावसावरच्या कवितांच्या, गाण्यांच्या ओळी कार्यशाळेतील प्रत्येकाला नवनिर्मितीचा आनंद देत होत्या. पावसाचे अनेक विभ्रम आपआपल्या छत्रीवर रेखाटत होता. पाऊस आणि मानव यांचं नातं किती विलक्षण आणि आनंददायी असते, याचाच हा अनुभव होता.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, अबीर क्रिएशन्स, अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या अंब्रेला पेंन्टींग कार्यशाळेचे विश्वास क्लब हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अच्युत पालव यांनी सप्रयोग मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस ५० हून अधिक रसिकांनी सहभाग नोंदविला.

अच्युत पालव यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या मनात पावसाचं रूप असतं आणि त्याचा अविष्कार प्रत्येक कलावंत, रसिक कलाकृतीतून देत असतो. आरती प्रभूंच्या ‘येरे घना येरे घना, असो किंवा चिंब पावसानं रान झालं आबादानी’ महानोरांचे शब्द असो त्याला एक सर्जनाचं दृश्य रूप असतं. पावसाळ्यातील पाण्याचा खळखळाट सरींवर सरी असोत. तीच अनुभूती प्रत्येक जण घेत होता. छत्र्यांतून अक्षरातून निथळणारा पाऊस आठवणींचा, विरहाचा, शुभ्रसंकेताचा उद्गार देत होता. पाऊस आपल्यातील सृजनशीलतेलाच आव्हान देत असतो. कार्यशाळेसाठी निलेश गायधनी, केतकी गायधनी व चिंतामण पगारे यांनी सहकार्य केले.