Friday 16 August 2019

युवा स्वतंत्रता रैली उत्साहात संपन्न…



नाशिक : देशासाठी लढणार्‍या हुतात्म्यांचे स्मरण करून देश विकासासाठी एकत्र येऊन देशाच्या विकासा साठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धार युवा स्वतंत्रता रॅलीत सहभागी झालेल्या सर्वानी दिला
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, 
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वतंत्रता ज्योत रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७.०० वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड येथून रॅलीला प्रारंभ झाला. गंगापूरनाका, के.टी.एच.एम. महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल,  हुतात्मा स्मारक सीबीएस येथे रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी  यांनी राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन डॉ मनोज शिंपी विनायक रानडे यांच्या बरोबर उपस्थितांनी केले. भारतमातेच्या वेशातील मुलगी सजविलेल्या रथात विराजमान झालेली होती.
यावेळी उपस्थित युवकांनी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. रॅलीत अनेक सामाजिक संस्था उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. रॅलीच्या रॅलीमध्ये  प्रसाद पाटील, कैलास पाटील, विनय अंधारे, जयंत जोगळेकर, मिलिंद धटिंगण, विक्रम उगले, सारिका देशपांडे, गोरख चव्हाण, वसंत ठाकरे, विवेकराज ठाकूर, मंदार ठाकूर, कैलास सुर्यवंशी, किशोर त्रिभुवन, रमेश बागुल, सुरेश वाघ, भूषण भोसले, महेंद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.






No comments:

Post a Comment