Wednesday 28 November 2018

विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर या संस्थेला यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार प्रदान...


Image may contain: 6 people, people smiling, people standing and wedding
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी स्वागतपर भाषण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. त्यानंतर खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक भाषणात अपंग हक्क विभागातर्फे ६००० विद्यार्थांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले याची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले. त्यामध्ये विजय कान्हेकर यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले त्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला. तसेच विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून राबविला जात आहे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१९ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ रिझर्व्ह बँकेचे माजी २३ वे गव्हर्नर रघुराम राजन यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.

नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विद्वज्जनांच्या पुढे यावे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापना होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून यावर्षी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार विदर्भातील 'विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर' या संस्थेला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार संस्थेच्या वतीने राजेंद्र पाठारे व मदन कुलकर्णी यांनी स्विकारला.या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले

राजू परुळेकरांचे सत्याविरुध्दचे प्रचारयुग विषयावरवरती विध्यार्थ्यांना धडे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बा.ना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे येथे सत्याविरुद्धचे प्रचार या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
कार्यक्रम महाविद्यालयात असल्याने विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती होती. विध्यार्थ्यांना कळेल आणि समजेल अशा उदाहरणे देऊन परुळेकरांनी व्याख्यानाला सुरुवात केली. एक असत्य बोलल्यावर किती असत्य बोलावं लागतं. हे उदाहरण त्यांनी सुरुवातीला दिल. त्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील उदाहरणे दिली. हा संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवरती उपलब्ध आहे.
https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/2114104765570632/

फिल्म अॅप्रीसीएशन वर्कशॉप'...


९ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ च्या निमित्ताने दिनांक ३० नोव्हेंबर कलिना विद्यापीठ, १ डिसेंबरला मंगला हायस्कूल, ठाणे (पूर्व) या ठिकाणी 'फिल्म अॅप्रीसीएशन वर्कशॉप' होणार आहे. यासाठी डॉ. जब्बार पटेल व समर नखाते उपस्थित राहणार असून सहभागी होणा-यांना मार्गदर्शन करतील. हे वर्कशॉप मोफत असून नाव नोंदणीसाठी Registration yiffonline.com किंवा sms FAW to 7021753978 वर करणे आवश्यक आहे.
शिक्षण विकास मंच’आयोजित राज्यस्तरीय परिषद
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्ममाने “शालेय शिक्षण : आज आणि उद्या” या विषयावरती राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/584305991982456/

Tuesday 20 November 2018

शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिव्यांग कट्टा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्तविद्यमाने शनिवारी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता दिव्यांग कट्ट्याचे आयोजन प्रतिष्ठानच्या बेसमेंट हॉल मध्ये करण्यात आले आहे. हा कट्टा संयोजक मा. विजय कान्हेकर यांच्या उपस्थितीत होणार असून अधिक दिव्यांगांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजीत संस्थाकडून करण्यात आले आहे. संपर्क सुकेशनी शेवडे ८६५२११८९४९.

ठाणे विभागातर्फे सत्याविरुध्दचे प्रचारयुग या विषयावरती व्याख्य़ान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे आणि बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्तविद्यमाने यशवंत व्याख्यानमाला कार्यक्रमांतर्गत सत्याविरुध्दचे प्रचारयुग या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर मार्गदर्शन करणार आहेत.

भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. ज्ञान, विज्ञान, संशोधन, कला साहित्य, शिक्षण, क्रिडा, सामाजिक सुधारणा या प्रत्येक घटकांबाबत विलक्षण आस्था होती. भावी समाजाच्या उभारणीसाठी तरूण पिढीकडून त्यांना विशेष अपेक्षा होत्या. या दृष्टीकोनातून यशवंत व्याख्यानमाला सुरू केली आहे.

हा कार्यक्रम सोमवारी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता पतंजली सभागृह, बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात सकाळी ११ वाजता सुरू होईल. अधिक संख्येने व्य़ाख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन मुरलीधर नाले आणि माधुरी पेजावर यांनी केले आहे. 

Sunday 18 November 2018

यंदाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार विदर्भ संशोधन मंडळाला जाहीर

यशवंतराव चव्हाण यांच्या विविध क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीमुळे एक सुसंस्कृत नेते व द्रष्टे लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात आजही अढळ आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात झाली.

प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मा. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने  राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक कृषी औद्योगिक समाज रचना किंवा व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता/विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास/अर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती/ कला-क्रिडा या क्षेत्रातील भरीव व पथदर्शी कार्य करणा-या व्यक्तीस अगर संस्थेस देण्यात येते.

महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती आणि इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात विदर्भ संशोधन मंडळ ही एक नामवंत संस्था आहे. विदर्भातील नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विव्दज्जनांच्या पुढे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापणा होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून या वर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरावरील पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.   

Tuesday 13 November 2018

आहार, विहार, विचार,आचार मिळून स्वास्थ्याचा विचार - सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जितुभाई कुटमुठीया

नाशिक : आहार, विहार, विचार, आचार मिळून स्वास्थ्याचा विचार पूर्ण होतो, त्यासाठी नकारात्मक विचार न करणे हा सर्वात मोठा सकारात्मक विचार आहे, त्याकरीता शरिरासाठी आवश्यक आणि मुलभूत गोष्टींचा विचार करणे म्हणजे निरोगी आयुष्य होय, असे प्रतिपादन सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जितुभाई कुटमुठीया यांनी केले.
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, ग्रेप कंट्री, ग्रंथ तुमच्या दारी, इशाश्री कन्सट्रक्शन, अ‍ॅम्रो कॉलेज सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मेक वर्ल्ड बेटर’ उपक्रमातंर्गत ‘मंत्रा टु बी हेल्थी’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक  करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. आर्किटेक्ट मंजु बेळे-राठी यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. व्याख्यानाचा शुभारंभ विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री. जितुभाई कुटमुठीया म्हणाले की, जगातील अशी एकही व्यक्ती नाही, ज्यांना एखादा विकार किंवा आजार नाही. वडापाव आपण अगदी चवीने खातो. पण आपलं पोट त्याला नाही म्हणतं. तरी देखील आपण चवीचवीने खातो आणि त्रास करून घेतो. आपल्यामध्ये कायम सकारात्मकता असावी. आपल्यातील नकारात्मकतेमुळे आपण मानसिक ताण वाढवून घेतो त्याचा शेवटी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. मधुमेहाची वय असलेल्यांनादेखील तीन महिने औषध सेवन न करता बंद ठेवून त्यांची प्रकृती उत्तम राहिल्याचे त्यांनी उदाहरण दिले. औषधांच्या जास्त सेवनाने देखील विविध आजार बळावतात. औषधांच्या सवयीमुळे त्यातील अनावश्यक घटक लिव्हरपर्यंत पोहचतात. या सवयीमुळे विविध आजार वाढून माणसावर मृत्युदेखील ओढावला जाऊ शकतो.

आपण हायजेनिक - हायजेनिक म्हणतो पण आपल्या शरिरात देखील बँक्टेरीया देखील असतो. लहान मुलांना आपण अन्न पाणी सर्व काही स्वच्छ देतो उकडून देतो पण बाहेरचं काही खाल्लं तर ते लगेच आजारी पडतात. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते.

माजी कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी जितुभाई यांच्या सेंद्रीय शेती प्रक्रियेची दखल घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेव्हा आमच्या पिकांवर बी-१२ रोग नव्हता तेथील एका संस्थेतील एचओडीकडून त्यांनी खात्री केली की बी-१२ चा प्रादुर्भाव राज्यात सर्वत्र असतांना आमच्या शेतीतील पिकांवर हा रोग नसल्याची खात्री होताच शरद पवार यांनी जितुभाई यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची प्रशंसा केली. हा रोग आमच्या कोणत्याही पिकांवर नव्हता कारण कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत आमच्या पिकांवर टाकत नसल्याचे ते म्हणाले.
क्लोरीनचं पाणी आपल्या शरिराला खुप घातक असतं. जैन समाजबांधव लोक पाण्यात राख टाकून पाणी पितात. याने पाण्यातील क्लोरीन कमी होऊन पाण्यातील मिनरल्स वाढते आपण देखील रोज सकाळ संध्याकाळ पाण्यात राख टाकून पाणी पिले पाहिजे.

देशी शुद्ध तुप, कच्च्या घाण्याचे खोबर्‍याचे तेल शरिरासाठी चांगले असते. रिफाईन तेल हे शरिरासाठी घातक असते. गहू साखर, रिफाईन ऑईल दुर केल्यास तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. त्याऐवजी नागली, भात खावा, असेही ते म्हणाले.

आपण फळांवर कीटकनाशकांचा मारा करतो. कीटक नाशकांसह खातो आणि आजारपण वाढवून घेतो एखाद्या पिकावर जिवाणी असतात ते पिक काढल्यावर मरतात मग जमीनीवर पसरतात आणि पाऊस पडल्यावर  बी १२ सारखे रोग पिकांवर पसरतात. घरात आपण झाडलेली रस्त्यावरची धुळ, माती सुद्धा आपल्या कुंडीतील रोप चांगल्या पद्धतीने वाढवते.

‘मेक वर्ल्ड बेटर’ या संकल्पनेच्या माध्यमातून  अशा अनेक व्याख्यान आणि पर्यावरण पुरक उपक्रम विनामुल्य स्वरूपात कोणताही आर्थिक उद्देश समोर न ठेवता पर्यावरणाच्या आणि मानवी आरोग्याच्या संरक्षणासाठी आपण यापुढे राबवणार असल्याचे मंजु बेळे-राठी म्हणाल्या.
यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमास डॉ.सुधीर संकलेचा, किरण चव्हाण, विनायक रानडे, धनंजय ठाकूर, मनिष मारू, शैलेश येवले, निता वैद्य, अश्‍विनी देशपांडे, जय नरसे, श्रीकांत चिंचोलीकर, प्रकाश कठपाळ, विनोद चावला, सुनंदा सोनी, संदीप मदाने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंजु बेळे-राठी यांनी केले.

Monday 12 November 2018

शिक्षण विकास मंच’आयोजित राज्यस्तरीय परिषद


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्ममाने “शालेय शिक्षण : आज आणि उद्या” या विषयावरती राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत  ‘रंगस्वर’, चौथा मजला, मंत्रालयासमोर,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होईल.

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, राज्यात कृषी आणि औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, तळागाळातल्या लोकांना पंचायत राजच्या माध्यमातून लोकशाही ताकदीचे देणारे मा. यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्युनंतर त्यांचे कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर १९८५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली.
शेती, सहकार, महिला बचत गट आणि महिलांसाठीचे कार्यक्रम, युवकांसाठीचे कार्यक्रम, अपंगांसाठीचे कार्यक्रम आणि कायदेविषयक सल्ला अशा सामाजिक विकासाच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान काम करत आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या शिक्षण विकास मंचाची स्थापना २००८ मध्ये डॉ. कुमुद बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांचे २०१२ मध्ये अकाली निधन झाले.
प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक असून डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजक, बसंती रॉय विशेष सल्लागार आणि माधव सूर्यवंशी समन्वयक म्हणून जबाबदारी पाहतात. शिक्षण विकास मंच शैक्षणिक विषयांवर परिषदा, चर्चासत्रे, शिक्षणकट्टे, व्हाट्सअॅप समूह, शिक्षक साहित्य संमेलने, दत्तक शाळा योजना, उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथांना पुरस्कार, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
“शालेय शिक्षण: आज आणि उद्या” हा या वर्षीच्या परिषदेचा विषय आहे. शिक्षण व्यवस्था समाजाच्या गरजा पूर्ण करत असते, तर शिक्षण व्यवस्थेत समाजाच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या असतात. तंत्रज्ञान, आर्थिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत वेगाने बदल होत आहेत. शिक्षणात या बदलांचे प्रतिबिंब पडणे अपरिहार्यच असते. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन पद्धती, प्रशासन, भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य, पालकांची भूमिका अशा सर्वच क्षेत्रांत त्या अनुषंगाने बदल होत असतात. या बदलांचा ऊहापोह करणे या परिषदेचे मुख्य प्रयोजन आहे. सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म वर नोंदणी करावी. गुगल फॉर्म- https://goo.gl/baHVoj अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी - ९९६७५४६४९८