Wednesday, 29 January 2020

Certificate Multimedia Creations Course


Certificate Course in Multimedia Creations (CCMC) conduct at Academy of Information Technology Yashwantrao Chavan Pratishthan, Y.B. Chavan Centre
Course duration - 4 months
Daily - 2 hours
For more information contact AIT YCP
9769256343
022-22817975
वाचनातून मिळाली लिहिण्याची आवड... – वीणा गवाणकर


मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वीणा गवाणकर ह्यांचा जन्म ६ मे, इ. स. १९४३ पुण्याजवळ लोणी काळभोर येथे झाला. त्या मराठी लेखिका आहेत. कृषी, निसर्ग, पर्यावरण आणि प्राणी या क्षेत्रात महत्त्वाच काम करणा-या तज्ञांच्या जीवनावरती त्यांनी ललितलेखन केलेलं आहे. वीणाताई चार वर्षे मिलिंद कला महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरीला होत्या.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकर ( एक होता कार्व्हर, डॉ. सालीम अली अशा अनेक चरित्र ग्रंथांच्या प्रसिद्ध लेखिका) यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्याल आले होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या कार्यकारी संयोजिका ममता कानडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या संयोजिका रेखा नार्वेकर आणि प्रा. सुहासिनी किर्तीकर यांनी वीणाताईंशी संवाद साधला.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा अमेरिकेल जन्मलेला एक अनाथ गुलाम, त्याने कृषी क्षेत्रात जी क्रांती केली, त्याची कथा वीणाताईंनी आपल्या एक होता कार्व्हर या पुस्तकातून लोकांसमोर मांडली. या पुस्तकाबरोबरच वीणा गवाणकर यांचे नाव साहित्यजगतात ओळखीचे झाले.
एक होता कार्व्हरत्यानंतर डॉ. आयडा स्कडर, गोल्डा मेयर, सर्पतज्ज्ञ रेमंड डिट्मार्स, लीझ माइट्नर, रोझलिंड फ्रँकलीन, पक्षितज्ज्ञ डॉ. सालीम अली, डॉ. खानखोजे, यांच्या जीवनावर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांनी केलेल्या लेखनासाठी त्यांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार आदी पुरस्कारांसह २०१४ मध्ये एसएनडीटी विद्यापीठातर्फे वूमन ऑफ दी इयर या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.
हे सर्व साहित्य लिहिताना त्यांना त्या काळी माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
डॉ आयडा स्कडर हि वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात देणारी जगातली पहिली डॉक्टर होती. तिने दक्षिण भारतात खूप मोठ कामं केलं. त्यात बालविवाह, बालमाता, बालमृत्यू अशा वेगवेगळ्या विषयांवर तिने मार्ग शोधले. तिच्याविषयी महिती मिळवण्यासाठी वीणाताईंनी सहा दिवस मद्रासला जाऊन माहिती मिळवली.
यासर्वाबरोबरच वीणाताई ठिकठिकाणी कार्यक्रमाला जात असतात. यावेळी मिळालेल्या मानधनातून प्रवास खर्च वगळता उर्वरित रक्कम त्या कु़डाळ येथील जीवन आनंद या संस्थेस देतात.
साहित्य लिहिताना एक लेखिका म्हणून झालेला प्रवास, या प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव अशा अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी या मुलाखतीत केला. Sunday, 26 January 2020

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे कविसंमेलनात जगण्याचे विविध आविष्कार सादर


नाशिक (दि. २५) बदलतं वास्तव आणि जगण्याचा संघर्ष देशप्रेम, गझल, लावणी अशा विविध विषयांवर दर्जेदार कवितांनी कविसंमेलनात रंग भरला जीवन किती वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी, क्षणांनी भरलेले असते. त्याची अनोखी अभिव्यक्ती कवितांमधून कवींनी पेश केली. बालकवी ते ज्येष्ठ कवी असे ७० हून अधिक कवी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, यांच्या संयुक्त विद्यमाने कविसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिक जिल्ह्यातील कवी तसेच कवीवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा, नाशिक कवी, काव्य मंच, नाशिक, माझी कविता परिवार, संवाद नाशिक व डे ला आर्टेस्टा, नाशिक साहित्य कणा फाऊंडेशन या संस्था सहभागी झाल्या होत्या.
कवी संमेलनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिकचे विश्वस्त अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. बोलताना ते म्हणाले, की 'कविता ही अनेक अर्थानी अनुभवांनी समाजाला नवा विचार देत असते आणि त्यातून समाज परिवर्तन होत असते.
बालकवयित्री तनिष्का सहाणे यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व विषद केले.
थोर पुरुषांमुळे मिळाले आपल्याला स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे स्वप्न झाले साकार तेव्हाच इंग्रजांनी घेतली माघार
कवी सुभाष सबनीस यांनी लावणी आणि अभंगांचे वेगळेपण मांडले
लावणीला भुलुन
अभंग झुराया लागला
दिवे लागणीला पेले
रिचवायला लागला
कवी अजय जाधवने प्रेम आणि आसक्ती याची जाणीव अलवारपणे व्यक्त केली.
तिच्या आठवणींना तुझ्या
कवितांचा आधार
परत जाताना तुला
आठवण्याचा आधार दे
कवी राजेंद्र उगले यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने संमेलनात चांगलीच रंगत आणली. नितीन ठाकरे व राजेंद्र उगले यांचा सन्मान विश्वास बँकेचे महाप्रबंधक रमेश बागुल यांनी केला वेदांशू पाटील यांनी प्रास्ताविक केले. कविसंमेलनात संजय चौधरी यांच्या गोपाळकाला कवितेने दाद मिळवली. दयाराम गीलान कर राज शेळके, विजय जोर्वेकर, रूपंम बिरारी, राधाकृष्ण साळुंके, नंदकिशोर ठोंबरे, अजय बिरारी, वैशाली शिंदे, संजय गोरडे, अमित भामरे, आदींनी कविता सादर केल्या.

जीवनदीप महाविद्यालयात पार पडली विधी साक्षरता कार्यशाळा...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने जीवनदीप महाविद्यालय, गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे येथे विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले.
पहिल्या सत्रात चार व्याख्याने पार पडली. अॅड. प्रकाश धोपटकर यांनी अल्पवयीन मुलांवरील अत्याचार व बालगुन्हेगारी या विषयावर बालकांवर जे अन्याय होतात त्यापासून कसं संरक्षण मिळावं या संदर्भातील कायदा व्याख्यान दिले. अॅड. दिलीप तळेकर यांनी महिलांवरील अत्याचार व सुरक्षिततेचे कायदे याविषयावर व्याख्यान दिले. अॅड. भूपेश सामंत यांनी मानसिक स्वास्थ्य अधिनियम - १९८७ तर अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर अॅड. विनायक कांबळे यांच्या व्याख्यानाने पहिल्या सत्राची सांगता झाली.
दुस-या सत्रात अॅड. प्रॉस्पर डिसोझा यांनी सायबर कायद्याविषयी व्याख्यान दिले. अॅड. जगन्नाथ पाटिल यांनी शिक्षणाचा हक्क आणि कायदे याविषयावर व्याख्यान दिले.
उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने आभार प्रदर्शन करुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


प्रकाशाच्या प्रदुष्णाचा परिणाम प्राण्यावर होत असतो - प्रा. विनय आर. आर.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई व मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने महिन्यातून एकदा विज्ञानाच्या विषयावर माहिती देण्यासाठी 'विज्ञानगंगाकार्यक्रमाचे आयोजन होत असते. विज्ञानगंगाच्या सेहेचाळीसाव्या पुष्पामध्ये प्रकाश आणि अंधार' ('Light and Darkness) या विषयावर प्रा विनय आर. आर. ह्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक वेगळ्यापद्धतीने हे व्याख्यान सादर केले..व्याख्यानात प्रकाश व अंधार यामध्ये जीवसृष्टी व प्राण्यावर काय परिणाम होतो ह्यांची सखोल माहिती त्यांनी दिली. एक उदाहरण दाखल पाण कासव हे जेव्हा सूर्याचे दक्षिण व उत्तर दिशेने होणारे संक्रमण काळामध्ये अंधार जास्त होतो त्यावेळी ही पाण कासव आपली अंडी घालतात. परंतु आता समुद्र किना-यावर ठिक ठिकाणी प्रकाश असल्यामुळे त्यांच्या प्रजन्नावर परिणाम झाला आहे असे त्यांनी सांगितले. असे अनेक मुद्दावर विद्यार्थांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नोत्तराला उत्तर देत मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर पुढील विज्ञानगंगा व्याख्यान दिनांक २१ फेब्रुवारी २०२० रोजी 'महाराष्ट्राचा दुष्काळया विषयावर डॉ. अतुल देऊळगावकर व्याख्यान देणार आहे असे जाहिर केले.

Monday, 20 January 2020

७ व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजन...


महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश, जगभरातील ४० फिल्म्सचे होणार प्रदर्शन
औरंगाबाद : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. ५ ते रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. पैठण मेगा फुड पार्क प्रा. लि., सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. एमजीएम फिल्म आर्ट डिपार्टमेंट या महोत्सवाचे अ‍ॅकॅडमीक पार्टनर आहेत. एस.प्रेस.ओ हे बेव्हरेज पार्टनर तर ओआरबीसी हे थीम पार्टनर आहेत.

ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकर यांची मुलाखत


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आयोजित ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकर ( एक होता कार्व्हर, डॉ. सलीम अली अशा अनेक चरित्र ग्रंथांच्या प्रसिद्ध लेखिका) यांची मुलाखत.
मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या संयोजिका रेखा नार्वेकर आणि प्रा. सुहासिनी किर्तीकर या वीणाताई गवाणकर यांची मुलाखत सांस्कृतिक सभागृह, ४ था मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई ४०००२१ येथे घेतील.

विज्ञानगंगाचे सेहेचाळीसावे पुष्प 'प्रकाश आणि अंधार'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत प्रकाश आणि अंधार' ('Light and Darkness) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद आणि पुणे विभागाचे माजी अध्यक्ष प्रा. विनय आर. आर हे शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली आहे.

Sunday, 19 January 2020

स्मिता पाटील यांच्या अभिनयात प्रचंड सामर्थ्य : विद्या बालन

click here, to watch full video...

स्मिता पाटील यांच्या अभिनयात एवढी ताकत होती की, संभाषण न करताही त्यांच्यातील भावमुद्रावरून आपल्याला त्यांच्या भावना समजत होत्या, त्या काळी सोशल मिडिया नसतानाही त्यांना मिळालेली लोकप्रियता ही त्यांच्यातील अभिनयाचे सामर्थ्य सिद्ध करते, अशा अभिनेत्री दुर्मिळ आहेत, असे विचार ज्येष्ठ अभिनेत्री विद्या बालन यांनी १०व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ता आयोजित स्मिता पाटील यांच्यावरील स्मृती कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चित्रपटसृष्टीत वावरताना आपल्याला प्रत्येक गोष्टींचे सूक्ष्म बारकावे समजून घ्यावे लागतात,हा एक निरंतर अभ्यासू वृत्ती जोपासण्याचा प्रकार आहे. त्यासाठी खूप मेहनतदेखील आवश्यक आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये,वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करताना आपल्यातील कौशल्याचा कस लागतो. त्यासाठी तितक्या ताकदीने आपण काम केले तर रसिकांपर्यंत आपले विचार व तो प्रसंग पोहचविणे शक्य होते. आजच्या जमान्यात रसिकवर्ग देखील अधिक प्रगल्भ आहे. चर्चादेखील मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे इतकी वर्षे होऊनसुद्धा आपण स्वतःला अपडेट ठेवत असतो. हे प्रत्येक कलाकाराने ठेवलेच पाहिजेअसेही विद्या बालन यांनी सांगितले.
कलाकारांचे जीवन ग्लॅमरस वाटत असले तरी त्यामागे खडतर मेहनत आहे,अनेक प्रवास,खाण्यापिण्याबाबत करावी लागणारी तडजोड तसेच खासगी आयुष्यावर येणारे निर्बंध याची जाणीव अनेकदा इतरांना नसते. त्यामुळे हे क्षेत्र अधिक आव्हानात्मक आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणा-यांनी या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे,या मुद्द्यावर भर देताना त्यांनी आपल्या चित्रपट प्रवासातील अनेक आठवणी तसेच किस्से सांगितले. त्याचबरोबर आलेल्या अनेक आव्हानांतून कसे सामोरे गेलो,याचाही ऊहापोह केला.

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन;

शर्मिला टागोर यांचा विशेष गौरव....
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास गौरवशाली आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचीही मोठी परंपरा असून त्यात प्रामुख्याने सामनासिंहासनजैत रे जैतउंबरठा असे सिनेमे जब्बार पटेल यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न भारतीय दिग्दर्शकांनी सिनेसृष्टीला देऊन हे क्षेत्र समृद्ध केले तसेच जगात लौकिक वाढवला आहेअसे विचार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १०व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. या महोत्सवात सिनेसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या ख-या अर्थाने आजही `सपनों की रानीअसून त्या ज्या राज्यातून आहेतत्या पश्चिम बंगालने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मान्यवर दिले असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहेअसेही विचार त्यांनी व्यक्त केले.भारतीय सिनेमा क्षेत्रात वावरताना चांगले दिग्दर्शक मिळालेत्यामुळे अभिनय शिकता आला तसेच ह्या क्षेत्राने खूप मानसन्मान मिळवून दिलात्यामुळे आपण खूप समाधानी आणि आनंदी आहोतअसे उद्गार शर्मिला टागोर यांनी काढले तसेच हा मनाचा पुरस्कार दिल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
चित्रपट महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी या महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. या कार्यक्रमास सिनेक्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती. या महोत्सवात २३जानेवारी २०२०पर्यंत विविध वर्गवारीतील सुमारे ६५चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. भारतचीनरशियाफ्रान्सइराणबेल्जियमअर्जेंटिनाइस्त्रायल,तुर्की आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.


आजच्या चित्रपटांचे विषय व आशय प्रधान, नवा विचार देणारे - अशोक राणे (चित्रपट समीक्षक)

नाशिक (दि. १८) : सिनेमा हे सर्व कलांचा संगम असून अविष्काराची अनेक रूपे त्यात असतात. सादरीकरणाच्या शक्यता सामावलेल्या असतात. त्यामुळे सिनेमाच्या कुतुहलामुळे या माध्यमाकडे वळलो आणि तो जगण्याचा भाग झाला. फिल्म सोसायटीची चळवळ माझ्यासाठी जगण्याचं,सिनेमाचे विद्यापीठच होय. त्यातून मी घडत गेलो. आजचा सिनेमा बदलला असून आजच्या पिढीची दृश्याविषयीचे आकलन बदलले आहे. त्यामुळे दृश्यभाषा बदलली आहे. वाढते चॅनेल्स,सिनेमांची निर्मिती वाढली आहे. त्यातून सिनेमाविषयीची व्याख्याच बदलली आहे. नवे प्रश्‍नकाळाचे प्रश्‍न घेऊन येणार्‍या सिनेमांना रसिकांची मागणी आहे असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक अशोक राणे यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईविभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट,नाशिक,सारस्वत बँक,रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक राणे यांच्या सिनेमा पाहिलेला माणूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अशोक राणे यांची मुलाखत डॉ. कैलास कमोद यांनी घेतली. यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास कथन केला. विश्र्वास हब येथे हा कार्यक्रम झाला१९९० पासून सिनेमा बदलत असून अ‍ॅक्टीव्ह ऑडीअन्स तयार झाला आहे. आजच्या तरूण दिग्दर्शकांनी जुने मराठी-हिंदी सिनेमे आवर्जुन बघावेत व परंपरा समजून घ्यावी व आपले वेगळेपण दिग्दर्शनातून सिद्ध क रावे. मेहनत व अभ्यास करावा. मल्याळी चित्रपट क्षेत्र आधुनिक असून त्यात नव-नवीन व आशय प्रधान सिनेमे तयार होत आहेत. प्रादेशिक सिनेमे बघावेत व आपली जाण समृद्ध करावी.समाजातील बदलत्या प्रश्नांचा वेध दिग्दर्शकांनी घ्यावा,दादासाहेब फाळके या चित्रमहर्षींनी आपल्याला सिनेमाचे नवे जग दाखवले व जगण्याला नवा विचार,आनंद दिला त्याची आपण जपणूक करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व अशोक राणे यांचा परिचय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिकचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला. प्रतिष्ठानचे सचिव डॉ. कैलास कमोद यांनी अशोक राणे व विवेक गरूड यांचा सन्मान केला. कार्यक्रमास विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी,मिलींद धटिंगण,रघुनाथ फडणीस,श्रीकांत वाबळे,गजानन ढवळे,रणजीत गाडगीळ,आशिष चव्हाण,विश्वास को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रजिंदर कौर यांच्या स्वरांतून निथळली ईश्वरभक्तीची आस

सूर विश्वासनाशिक (प्रतिनिधी) : सकाळच्या प्रसन्न थंडीत सुरांची अलवार भेट सर्वांना सुखावून गेली आणि स्वरमाधुर्य आणि अस्सल सुरांची भेट रसिकांना आनंद देऊन गेली. स्वर आणि शब्दांतील नाद यांची जाणीव शास्त्रीय संगीतातील प्रयोगांची नवी ओळख करून देणारा होता.
विश्वास गृ्रपतर्फे ‘सूरविश्वास’चे बारावे पुष्प रजिंदर कौर यांच्या स्वरांनी गुंफले. नटभैरव रागाने त्यांनी मैफिलीची सुरूवात केली. शब्द होते ‘लालन तुमसे भली न हो’ एक अनाहत नाद आणि शब्दा-शब्दांतून निथळणारा आशय यातून मैफल रंगत गेली. त्यानंतर ‘दादरा’ सादर केला. ‘सैय्या मोरे तोरी बाकी नजरीया’ यातून आर्तता आणि प्रेमाचा, आपुलकीचा स्रोत स्वरांतून ओसंडत होता. यानंतर पंजाबी भावभक्तीचा स्वर शबद मधून सादर केला. भक्ती आणि जीवन जगण्यातला आनंद यातून निनादत होता. ‘सून यार हमारे सजन’ ही विनवणी होती. भैरवी ने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘आयी शरण निहारी’तून परमेश्वर भक्तीची आस व्यक्त केली. सुजीत काळे (तबला), कृपा परदेशी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ‘विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम विश्वास गार्डन, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे रा.शं. दातार नाट्यगौरव पुरस्काराबद्दल दत्ता पाटील यांना रमेश देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कलावंतांचे सन्मान रागीणी कामतीकर, डॉ.मनोज शिंपी, अमर भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.


फिनलंडची शिक्षणपद्धती - प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

डॉ. हेरंब कुलकर्णी यांनी फिनलंड सारखा एक छोटासा देश १९७० नंतर शिक्षणातील बदलामुळे कसा प्रगतीप्रथावर पोहोचला याचे विश्लेषण करून आज जगातल्या पहिल्या पाच देशाबरोबर या देशाचा GDP कशारीतीने वाढला आहे याची तुलनात्मक आकडेवारी मांडली. फिनलंड मधील शिक्षणपद्धतीत पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,पदवी पदव्युत्तर,पीएच. डी. यांसारखे शिक्षण कशारीतीने दिले जाते याचा आलेख त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. फिनलंड या देशात सरकारी शाळांचे प्रमाण हे जास्तीचे म्हणजे ९० च्या वर आहे. तिथे खाजगी शाळांचे प्रमाण खूप कमी आहे. खाजगी शिकवणी वर्ग नाहीत. फिनलंडमध्ये वयवर्षे ७ पर्यंतची मुले शाळेत जाण्याऐवजी डे-केअर मध्ये जातात आणि तिथे त्यांचा भावनिक,शारीरिक,सामाजिक,बौद्धिक विकास केला जातो. इयत्ता निहाय परीक्षा पद्धती नाहीपण मूल्यमापनाच्या विविध पद्धती आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कोणता बदल आवश्यक आहे. याबद्दलचे मत त्यांनी व्यक्त केले.
शाळा,अभ्यासक्रम,पुस्तके,परीक्षा,अध्यापनाच्या पद्धती,शिक्षक,मुख्याध्यापक,यांची नियुक्ती त्यांचे पगार,समाजात असलेले त्यांचे स्थान यांसंदर्भात मुक्त संवाद डॉ. हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थितांशी साधला. भारतीय शिक्षणपद्धती आणि फिनलंडची शिक्षणपद्धती यांचा तुलनात्मक आढावा व त्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थितांनी मांडले.
कार्यक्रमाचे निवेदन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख मा. दत्ता बाळसराफ यांनी केले व उपस्थितांचे आभार शिक्षण विकास मंचाचे समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी मांडले.
Monday, 13 January 2020

विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी, वळखण, ता. शहापूर, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी मोफत एक दिवसीय विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला उपस्थितांकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले.