ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठानच्या सृजन अंतर्गत हवामान पुरक सकस आहार- कोशिंबीरी हा कार्यक्रम
घेण्यात आला. हवामान बदलाचा पहिला तडाखा हा आपल्या आरोग्यावर पडत असतो. सतत
बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला-ताप असे आजार होत असतात. अशावेळी कोणत्या
प्रकारच्या आहार घेतला असता मुले निरोगी राहू शकतील यावर सृष्टी संस्थेच्या संगीता
खरात यांनी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर
कडधान्ये, दुधी भोपळा,
लाल
भोपळा, पडवळ, कच्ची
पपई, कोबी यासारख्या मुले शक्यतो न खाणा-या भाज्यांपासून विविध कोशिंबीरी बनवन्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात
आले. मुलांनी भाज्या चिरणे, साले
काढणे,
किसणे अशा सर्व कामात खुप उत्साहाने
भाग घेतला.
अन्नपचन संस्था उत्तम राबवण्यासाठी प्रथिने, जीवनसत्वे आणि चोथा हे खुप महत्वाचे घटक अन्नमधून मिळवायचे असतील तर कोशिंबीरी हे पुर्णान्त म्हणून उपयुक्त आहेत. त्याशिवाय मुलांमध्ये जेवन बनवण्यासाठी प्राथमिक पायरी म्हणून कोशिंबीरी बनवणे हा महत्वाचा टप्पा आहे.

No comments:
Post a Comment