यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
विभागीय केंद्र नांदेड तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या
जयंतीच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचे पणतू तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित
करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
विभागीय केंद्र नांदेड चे अध्यक्ष कमलकिशोरजी कदम असणार आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९ चा पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ
गांधी अभ्यासक, तुषार गांधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर २०१९
रोजी सायंकाळी ६ ते ८.३० वाजता कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडीअम परिसर,
नांदेड येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे, ही
विनंती.
No comments:
Post a Comment