सूर विश्वास
नाशिक (दि. १६) : स्वरांची कोवळी रिमझिम
मधून निथळणारे अनवट स्वर,
शब्दातील लालित्य, आर्तता यांचा अनोखा अविष्कार ‘सूरविश्वास’च्या
मैफलीत सादर झाला. जगण्याचं आर्त, परंपरा याचं संचित घेऊन मैफल मनाचा ठाव
घेऊन गेली. सदरची मैफल गायिका गीता माळी यांना समर्पित करण्यात आली.
रसिक कुलकर्णी (तबला), कृपा
परदेशी (संवादिनी),
जास्वंदी जोशी (तानपुरा), केतकी
गोरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे
यांनी केले. ‘विश्वास
ग्रृप’चे
कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना
विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम क्लब हाऊस, विश्वास
को-ऑप. बँकेसमोर,
सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक
येथे संपन्न झाला.
विश्वास गृ्रपतर्फे ‘सूरविश्वास’चे
दहावे पुष्प,
अमृता जोशी यांनी गुंफले. मैफलीची सुरूवात बिलासखानी रागाने
केली. बंदिश होती ‘बिसरावे
काहे बलमा’ स्वरांचा
धारदारपणा आणि तितकेच माधुर्य समोर आले. त्यानंतर छोटा ख्याल सादर केला. ‘दिन
कटत रैन’ मनाचं
रितेपण आणि हळवेपण याचं प्रखर दर्शन यातून अमृताने घडवले.
लोकगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा अनोखा
मिलाफ संगीतात आला आहे. त्याचीच अनुभूती राजस्थानी मांड या गीत प्रकारातून सादर
केली. ‘सावरीया’ या
शब्दांतून राजस्थानी जीवन व्यवहारांचे परंपरांची जाणीव व्यक्त झाली.
भावभक्ती व नामस्मरणातून वातावरणात
चैतन्य निर्माण झाले. भजन होते ‘गिरीधर
के घर जाऊ’ यानंतर
मैफलीने परमोच्च बिंदू गाठला तो भैरवीने. शब्द होते ‘जीवन
के दिन चार’.
कार्यक्रमाची सुरूवात दिवंगत गायिका
गीता माळी यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. साथसंगत करणार्या कलावंतांचा
सन्मान मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त स्मिता गायधनी, राजश्री
शिंपी,
नाट्य समीक्षक एन. सी. देशपांडे, अॅड.
प्रेरणा देशपांडे,
सुवर्णा महाबळ यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान,
मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास
ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत
बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज
प्रतिष्ठान,
ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
No comments:
Post a Comment