click here, to watch full video...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, शिक्षण विकास मंच आयोजित १० वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आज
मुंबई येथे ‘शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती’ या विषयावर वर संपन्न झाली.
‘शिक्षण विकास मंच’ च्या एकूण कामाचा आढावा मुख्य सल्लागार
मा.
बसंती रॉय यांनी घेतला. जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि शिक्षण विकास
मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे प्रास्ताविक मांडून हा विषय घेण्यामागची
भूमिका स्पष्ट केली. ग्रंथालीचे संस्थापक मा. दिनकर गांगल यांनी परिषदेच्या
विषयावर अनुभवात्मक बीजभाषण केले. वाचन संस्कृती का व कशी वाढेल? याचेही
विवेचन केले. बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी लहान मुलांचे वाचन यावर उपस्थितांशी
दिलखुलास संवाद साधला. यानंतर ‘मुलांमध्ये वाचनाची आवड कशी वाढवावी..?’ या
विषयावरील परिसंवादामुळे भरपूर काही शिकायला मिळालं. या
परिसंवादात बालभारती ‘किशोर’ चे
संपादक सन्माननीय किरण केंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार, गीतांजली देगावकर, अरविंद शिंगाडे, आणि
वयमच्या संपादिका शुभदा चौकर आदीच्या अनुभवसंपन्न चर्चेमुळे मुलांमध्ये वाचनाची
आवड निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होऊ, यासंदर्भातील समाधान निर्माण झाले.
भोजनोत्तर सत्रात विद्यार्थी सोहम
कुलकर्णी (नाशिक) यांनी आपले वाचन कसे घडत गेले, याचे
अनुभव सांगितले. ‘वाचन लोकल ते ग्लोबल’ या विषयावर मा. विजय जोशी (स्वित्झरलंड)
यांनी आपले विचार व्यक्त केले.
मा. अजित
तिजोरे यांनी शालेय मुले काय वाचतात? याचा मूल्यमापनात्मक आढावा सादर केला.
यानंतरच्या खुल्या सत्रात राज्यभरातील प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले.
मा. जयवंत कुलकर्णी, मा. संभाजी पाटील, संपदा जोशी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त
केल्या. आजच्या परिषदेला राज्यभरातून एकूण ३०० प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण विकास मंचचे समन्वयक माधव
सूर्यवंशी यांनी उपस्थितींचे आभार मानले.
No comments:
Post a Comment