विकास अध्ययन केंद्र आणि
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने नॅशनल उर्दू हायस्कूल, जोगेश्वरी, मराठा
हायस्कूल, चौराहा, श्री सरस्वती भुवन
प्रशाळा, वेनुताई चव्हाण हायस्कूल, एमजीएम संस्कार विद्यालय आणि शारदा मंदिर कन्या शाळा येथे बाल दिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या
विद्यार्थ्यांसोबत सायबर सुरक्षा आणि बाल विश्व याविषयावर आठवडाभर जाणीवजागृती
कार्यक्रम घेण्यात आला. मूल सोशल मीडिया कोणता वापरतात हे जाणून घेतले. तेव्हा
टिकटॉक वापरणारे मुले सगळ्यात जास्त होती. बरेच विद्यार्थी फेसबुक आणि टिकटॉकचे
युजर्स आहेत. फेसबुक फ्रेंडस किती आहेत हे जाणून घेतले असता १००० ते १२०० चा आकडा मुलांनी सांगितला.
आपल्या देशात सायबर
पॉलिसी आहे का?, कायदा कोणता आहे? असे प्रश्न मुलांनी
विचारले. मोबाइल आणि इंटरनेटच्या वापराने मुलांचे ज्ञान अफाट आहे, अशी माहिती
रेनूका कड यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, मुलांमध्ये टिकटॉकचा वापर जास्त
प्रमाणात आहे. १५ दिवसांत एकूण ३०० व्हिडिओ मुलांकडून टाकले जातात. एका दिवसात ही मूल जवळपास २० व्हिडिओ शेयर करतात. टिकटॉक विडिओला जास्तीत
जास्त लाईक्स मिळविण्यासाठी ही मूल अनेक उपाय करतात.
No comments:
Post a Comment