डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट
शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०१९ जाहीर...
शिक्षण विकास मंच, यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई यांच्याकडून दरवर्षी उत्कृष्ट शैक्षणिक विषयांवरील
पुस्तकांची निवड करून त्यांचे लेखक/संपादक आणि प्रकाशक यांना डॉ. कुमुद बन्सल
उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २०१९ च्या डॉ. कुमुद बन्सल
उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कारासाठी पुढील दोन पुस्तकांची निवड समितीने एकमताने
निवड केली आहे:-
१. पुस्तकाचे
नाव:- मुलांचे ग्रंथालय,
संपादक:- डॉ. मंजिरी निंबकर
प्रकाशक:-
ज्योत्स्ना प्रकाशन,
पुणे
२. पुस्तकाचे नाव:- नवी पालकनीती
लेखक :- रेणू
दांडेकर
प्रकाशक :-
सुरेश एजन्सी,
पुणे
पुरस्कार वितरण रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित होणाऱ्या शिक्षण परिषदेत
उद्घाटनप्रसंगी (सकाळी १०.०० ते ११.३० या कालावधीत) मा. सुप्रिया सुळे, निमंत्रक, शिक्षण विकास मंच आणि कार्याध्यक्ष, यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई यांच्या हस्ते
प्रदान करण्यात येईल. लेखक/संपादक यांना पाच हजार रुपये रोख, गौरवपत्र
आणि स्मृतिचिन्ह ;
तर प्रकाशकांना गौरवपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे
स्वरूप असेल.
पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
No comments:
Post a Comment