Sunday 9 February 2020

कॅन्सर प्रबोधन यात्रेचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र परभणी, प्रयास अमरावती, आरंभ अहमदनगर व ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कॅन्सर प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी वेळ सकाळी १० वा ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील विविध महाविद्यालयातील युवक व युवतींना कॅन्सर कसा होतो व तो झाल्यावर काय करायला पाहिजे, तो कसा बरा होउ शकतो या विषयी प्रसिध्द कॅन्सर प्रबोधनकार मा. डॉ. अविनाश सावजी यांनी मार्गदर्शन केले व अनेक कॅन्सर ग्रस्त व्यक्तींचे अनूभव कथन या कार्यक्रमात केले.
या कॅन्सर प्रबोधन यात्रेची सुरूवात अहमदनगर येथून दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी झाली. ती यात्रा अहमदनगर, बिड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व दि. ७ फेब्रुवारी ला परभणीत सकाळी ९ वाजता आगमन झाले व दिवसभर शहरातील विविध महाविद्यालयात या यात्रेचे प्रबोधन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, परभणी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. सौ. संध्याताई दुधगावकर(प्राचार्य तथा अध्यक्ष परभणी केंद्र) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. भावनाताई नखाते(मा. उपाध्यक्ष जि. प. तथा महिला व्यासपीठ प्रमुख विभागीय केंद्र परभणी) तर प्रमुख मार्गदर्शक प्रसिध्द कॅन्सर प्रबोधनकार तथा थोर समाज सेवक मा. डॉ. अविनाश सावजी तथा कॅन्सर प्रबोधन यात्रेचे संयोजक मा. श्री. प्रदिप काकडे (आरंभ आहमदनगर) तर कॅन्सर योद्धा. सौ. भाग्याश्री वैद्य व खराटे मामा यांनी कॅन्सर सोबत कसा लढा दिला व तो कशा यश्यस्वी केला या बद्दल उपस्थित महाविद्यालयीन युवक व युवंतींना अनुभवकथन केले. या कॅन्सर प्रबोधन यात्रेचे आयोजन श्री. विष्णू वैरागड यांनी केले. यात्रेतील मान्यवराचे भोजन नियोजन मा. श्री. कांतराव काका झरीकर तर पि. डी. जैन. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दाभाडे यांनी केले.







No comments:

Post a Comment