यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
विभागीय केंद्र ठाणे तर्फे बहुभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. महेश
केळुसकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. निरनिराळ्या भाषा घेऊन शशिकांत
तिरोडकर (मराठी), प्राजक्ता सामंत (मालवणी), दिलीप सावंत (मराठी), गोविंद नाईक
(मराठी), हरी मृदुल (हिंदी), रूजुल भानुशाली (गुजराती), फिलोमिना सॅमफ्रान्सिको
(कोकणी) हे कविसंमेलनात सहभाग घेणार असून रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी
सायंकाळी ५.३० वाजता, मराठी ग्रंथ संग्रहालय, तिसरा मजला, राजावत ज्वेलर्स समोर,
गोखले रोड, ठाणे (प.) येथे हे कविसंमेलन पार पडेल. तरी अशा बहुभाषिक कविता
ऐकण्यासाठी आपण या कविसंमेलनास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment