बहुतांश शाळा कॉलेजातील मुले ही अंमली
पदार्थ सेवनाच्या आहारी जातात. वाईट संगतीत राहून आयुष्य खराब करून घेतात. यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई व अन्वय प्रतिष्ठान यांच्या
संयुक्त विद्यमाने SIES
महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ
सेवना विरुद्ध शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता
SIES कॉलेज ते नेरुळ रेल्वे स्टेशन व परत अशी सुमारे ६ किलोमीटरची
रॅली (मोर्चा) काढण्यात आली.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, अन्वय प्रतिष्ठानचे डॉ. अजित मगदूम, प्रा.
वृशाली मगदूम,
कॉलेजचे प्राचार्य, अध्यापक व भाग घेणारे सुमारे २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment