यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान, मुंबई, ठाणे जिल्हा
केंद्राच्या वतीने ‘बहुभाषा काव्यसंमेलना’चे
आयोजन करण्यात आले होते. डॉ. महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडलेल्या या संमेलनात शशिकांत तिरोडकर यांनी त्यांची 'मिठी' नदीवरील कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. दिलीप सावंत यांनी त्यांच्या मराठी कवितांचं सादरीकरण केले. तर हरी मृदुल यांनी हिंदीतल्या
''चादर',
'खेल ही खेल में',
'देश की खातिर',
'अमेरिका',
'जेब में गांधी मसलन पांच
सौ का नोट', 'मटर की फलियों के बहाने',
'और'
अश्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. प्राजक्ता सामंत यांनी मालवणी भाषेतून सौ. राजूल भानुशाली यांनी गुजरातीतून तर
फिलोमीना यांनी मी जर मुलगा असती तर याविषयावरील कोंकणी कवितेने रसिकांना मंत्रमुग्ध केलं.
गझलकार गोविंद नाईक यांनी मराठी गझल सादर करून श्रोत्यांची
मन जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष
डॉ. महेश केळुसकर,
खजिनदार जवकर, सदस्य श्याम घोरपडे, डॉ. वसुधा सहस्त्रबुध्ये तसेच निमंत्रित मान्यवरांच्या
साक्षीने स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून कार्यक्रमाची सुरूवात
झाली. त्यानंतर संस्थेचे सचिव श्री.
अमोल नाले यांनी उपस्थितांना
प्रतिष्ठानच्या ध्येय धोरणांचा तसेच बहुभाषा काव्यसंमेलनासाठी आलेल्या निमंत्रित पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. या सर्व मान्यवरांचा संस्थेच्या कार्यकरिणीकडून संस्थेचे अध्यक्ष श्री.
मुरलीधर नाले यांनी सत्कार
केला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी केले.
सदर कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थिती लावली असल्यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत रंगत गेला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, गझलकार चंद्रशेखर सानेकर, पत्रकार आणि रसिक आवर्जून हजर होते. सरतेशेवटी संस्थेचे सचिव अमोल नाले यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment