आजकाल महिलांसोबत नेहमीच छेडछाडीचे
प्रकार घडत असतात. अशा प्रसंगी महिलांनी सक्षम रहावे, यासाठी यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे १३ फेब्रुवारी २०२० रोजी स्व-संरक्षण
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी सांगितला. तसेच
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा खिल्लारे यांनी केले. उषादेवी पांडुरंग हायस्कुल, कुलाबा चे मुख्याध्यापक, सुरेश धनावडे, शिक्षक राजाराम भोसले, Combat
Tactical Systems
– CTS
चे
भूषण चव्हाण यांनी उपस्थित महिलांना प्रात्यक्षिक दाखवून
मार्गदर्शन केले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता
बाळसराफ, नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या कार्यालयातील मिनल सावंत आणि मनिषा
खिल्लारे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment