साहित्य-संवाद
मुंबई ; दि. १७ : यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान, मुंबई तर्फे डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आले
आहे. शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२० रोजी दुपारी ३ वाजता, रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, नरिमन
पॉइंट, मुंबई ४०० ०२१ येथे ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अभ्यासक सुनील
तांबे मुलाखत घेणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी वनस्पतीशास्त्रात
पदव्युत्तर पदवी संपादन केले असून ‘बायोकेमिस्ट्री’
या विषयात पी. एच. डी. केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन
भाषांमध्ये त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. भीष्म सहानी यांची ‘तमस’ ही कादंबरी, चंद्रकांत देवताले, पाश इत्यादी नामवंत कवींचे मराठी अनुवाद, मराठी
कवितांचे हिंदी अनुवाद,
परदेशातील कवींच्या निवडक कवितांचे मराठी अनुवाद, मराठी आणि हिंदी भाषेत लिहीलेली साहित्य समीक्षा, वर्तमानपत्रांतून स्तंभ लेखन असा त्यांच्या कार्याचा व्याप
आहे. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली
देण्यात आला. मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात
येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार त्यांना १४ सप्टेंबर, २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. अहिंदी भाषिक लेखकांनी आपल्या
सृजनशील लेखनातून हिंदी भाषेला समृद्ध केले आहे, अशा ज्येष्ठ आणि लिहित्या लेखकांसाठी हा
सन्मान गेल्या तीन वर्षांपासून दिला जातो. हिंदी आणि मराठी भाषेत चंद्रकांत पाटील
यांची आजवर ५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
समकालीन कविता, कादंबरी, समीक्षा यांचा साक्षेपी आढावा घेणार्या या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
समकालीन कविता, कादंबरी, समीक्षा यांचा साक्षेपी आढावा घेणार्या या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
No comments:
Post a Comment