यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
नवी मुंबई केंद्रा तर्फे ‘यशवंतराव चव्हाण
गौरव पुरस्कार’ देण्यात येणार असून मानपत्र व रोख रू २०,००० असे
पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष
प्रमोद कर्नाड यांनी दिली आहे. मराठी साहित्य, संस्कृती
तसेच कला-क्रिडा या शिवाय सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामिण
विकास,
आर्थिक सामाजिक विकास, कृषी औद्योगीक समाज रचना, व्यवस्थापन प्रशासन यांपैकी
कोणत्याही एका क्षेत्रामध्ये भरीव कार्य अथवा योगदान करणा-या व्यक्ति किंवा
संस्थेस यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार सभारंभपुर्वक दि. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी
प्रदान केला जाणार आहे. इच्छुक व्यक्ती अथवा संस्थेने प्रमोद कर्नाड संपर्क ९८६७६७३३१९/
९०८२६९८९०४ किंवा ९८१९३३९९४४ या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधून दि. २५ ऑक्टोबर
पूर्वी आपली प्रवेशीका प्रतिष्ठानकडे सादर करावी, असे
अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment