Monday, 14 October 2019

ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा २०१९

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये चार कर्तबगार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच सोबती ज्येष्ठ नागरिक संघ, विलेपार्ले या संघटनेचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यावर्षी रविवार दि. ६ ऑक्टोबर २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बांद्रा ते दहिसर या विभागामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिक संघटनांचा मेळावा भरविण्यात आला होता. महिला ज्येष्ठ नागरिक श्रीमती कुमुद मंगलदास पटेल (सांताक्रुज), प्रो. निर्मला अशोक बतिजा (खार), पुरूष ज्येष्ठ नागरिक श्री. विरेंद्र शांताराम चित्रे (अंधेरी), श्री. माधव अनंत पुरोहित (कांदिवली) या चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प्रमुख पाहूणे डॉ. आनंद नाडकर्णी व प्रतिष्ठानचे सरचिटणीस व निवड समितीचे अध्यक्ष मा. श्री. शरद काळे यांच्य हस्ते सत्कार करण्यात आला.




No comments:

Post a Comment