Wednesday, 23 October 2019

कायद्याचे अनेक विषय कौशाल्याने हाताळणे गरजेचे – अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड


सोलापूर दि. १२ ऑक्टोबर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कायदेविषयक व्याख्यानमाला संपन्न झाली.
अटक, कोठडी व जामीन या विषयावर अॅड. डॉ. राजेंद्र अनभुले यांनी मार्गदर्शन केले. नाहक एखाद्यावर हा प्रसंग आला तर कायद्याच्या कोणत्या कोणत्या कलमाचा कसा उपयोग करावा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तर अॅड. योगेश दंडे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे श्रेष्ठत्व या विषयावर बोलताना वेगवेगळ्या न्यायाधीशांनी वेगवेगळ्या खटल्यात कसे निकाल दिले आणि त्याचा आधार नंतर अनेक प्रकरणात तसा प्रभावी ठरला हे विस्तृतपणे सांगितले आणि नेमका त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड यांनी हिंदू वारसा कलम ६ या विषयावर बोलताना महिलेला माहेरून अनेक हक्क या कायद्यात दिले आहेत. त्यामुळे भावा बहिणीच्या नात्यात अंतर कसे निर्माण होते आणि त्यामुळे सामाजिक परिस्थिती कशी बिघडते आणि सासरकडून या कायद्यात महिलांना कोणतेच संरक्षण नाही आणि सासरचे लोक माहेरच्या लोकांना या कायद्याचा आधार घेऊन कसा त्रास देतात, यामुळे एखाद्या महिलेचे आयुष्य कसे उध्वस्त होते याबाबत वकिलांनी घ्यावयाची काळजी याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
या व्याख्यानमालेत ३५० वकिलांनी सहभाग घेतला.  




No comments:

Post a Comment