Wednesday 16 October 2019

शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षण परिषद शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण परिषद आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी ही रविवार, दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित होईल. या दहाव्या वार्षिक परिषदेचा विषय शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती असेल.
ही परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगस्वर सभागृह, चौथा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होईल.
या परिषदेत:-
वाचनसंस्कृतीचे महत्त्व
वाचनसाहित्याचे विविध प्रकार
वाचनसंस्कृतीची सद्यस्थिती
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू असलेले वाचन कट्ट्यासारखे विविध उपक्रम, चळवळी यांचा आढावा.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सूचना, नियोजन, अंमलबजावणी या विषयांवर प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या संदर्भात चर्चा होईल.
या परिषदेत चर्चा सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पुस्तकप्रेमी प्रतिनिधींना पुढील लिंक उघडून नोंदणी करता येईल.
परिषदेस प्रवेश निःशुल्क असला तरी मर्यादित आसनसंख्येमुळे लवकरात लवकर नोंदणी करावी.
उपरोक्त परिषदेबाबत आपल्या सूचनांचे स्वागत आहे. या सूचना पुढील ईमेल आयडीवर पाठवता येतील.
कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:
ते ९.४५ - प्रत्यक्ष नोंदणी आणि चहापान
१० ते ११.३० उदघाटन (प्रमुख उपस्थिती:
मा. सुप्रिया सुळे, निमंत्रक, शिक्षण विकास मंच आणि कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, श्री. शरद काळे, सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, श्री. दिनकर गांगल, ग्रंथाली वाचन चळवळ. शिक्षणमंत्री/शिक्षण सचिव यांनाही निमंत्रण देण्यात येईल. याच वेळी डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्काराचे वितरण होईल.)
११.३० ते १२ बीजभाषण - श्री. दिनकर गांगल
१२ ते १.३० - वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रात सुरू असलेले विविध उपक्रम
१.३० ते २.३० - भोजन
२.३० ते ४.०० - शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी काय कोणत्या उपाययोजना कराव्या? (पॅनेल चर्चा)
ते ४.३० - समारोप 
सविस्तर कार्यक्रम पत्रिका नंतर देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी, समन्वयक, शिक्षण विकास मंच यांच्याशी ९९६७५४६४९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.


No comments:

Post a Comment