click here to watch full video
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत ‘आय.ओ.टी. चे तंत्रज्ञान' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते डॉ. रामचंद्र सत्यदेव तिवारी यांनी आय. ओ. टी. तंत्रज्ञान म्हणजे नेमक काय? त्याचा उपयोग कसा केला जातो? एखाद्या वस्तूचा उपयोग करून तिला आय. ओ. टी. तंत्रज्ञान जोडून कसा उपयोग करता येऊ शकतो हे त्यानी समजावून सांगितले. आय. ओ. टी. तंत्रज्ञानामुळे आधुनिकीकरण कस वाढत चालले आहे हे त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितले. शेवटी प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment