Thursday, 5 September 2019

शिक्षक दिन


आदर्श माणूस तयार करणे हे शिक्षणाचे मुलभूत कार्य - सचिन उषा विलास जोशी
नाशिक : शिक्षण हे कौशल्यधारीत असले पाहिजे व विद्यार्थ्याला आवडीनुसार शिकता आले पाहिजे. त्याला जास्तीत जास्त चुका करण्याची संधी द्यायला हवी. परीक्षेतील गुणांवर आयुष्याची किंमत ठरवणे म्हणजे त्याच्यातील हुशारीला लगाम घालणे होय. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील आंतरीक आवडीचा शोध घेऊन त्याला आदर्श माणूस बनवणे हेच शिक्षणाचे मूलभूत काम आहे असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ सचिन उषा विलास जोशी यांनी केले.
शिक्षण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक, विश्वास कम्युनिटी रेडिओ ९०.८ एफ. एम., विश्वास गार्डन, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमधील सेवानिवृत्त व उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी,
विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ञ सचिन उषा विलास जोशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,
शिक्षणातून स्वत:ची ओळख निर्माण झाली पाहिजे तेच खरे शिक्षण होय. प्राथमिक शाळेत शिकविणारा शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या पाया रचत असतो. तोच घटक आज दुर्लक्षित आहे. समाजात शिक्षकाचा सन्मान होणे गरजेचे असून शिक्षणपद्धतीत अमुलाग्र बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असेही ते म्हणाले.
प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, शिक्षण ही जगण्याशी निगडीत गोष्ट आहे. त्यातून नव्या जाणिवांना आकाश मिळायला हवे. गुरू हा जीवनाच्या प्रत्येक टप्यावर नवे शिकवत असतो, त्याचा आदर करावा. कार्यक्रमात उपक्रमशील शिक्षक-श्रीमती सुरेखा राजेश पालवे, श्रीमती जया दगडू पाटील,
सौ. निलांबरी आनंद क्षिरसागर, कु. सिमिता अशोक रामराजे, सौ. वीणा दिपक वाणी, श्रीमती नुतन मोठाभाऊ देवरे, सौ. वैशाली संजय जवादे, सौ. रोहिणी रमाकांत देशपांडे, श्रीमती सीमा बाबुराव रूद्रवंशी, सौ. मेघा राहूल जोशी, सौ. धनश्री प्रविण देशमुख, सौ. दिपिका विलास पाटील, निलेश तिवारी तसेच सेवानिवृत्त शिक्षक -सौ. अपर्णा अनिल जोशी, श्रीमती मंगला गणपत वनमाळी, श्री. दिलीप दौलत पवार, श्रीमती सुनंदा वसंत सोनार, सौ. स्मिता सतिश गायधनी, सौ.निर्मला विकास शेलार, सौ. रत्नमाला श्यामकांत भदाणे, सौ. मंदाकिनी सुभाष कुलकर्णी, सौ. स्मिता हेमंत मुजुमदार, सौ. आशा मंगेश मिशाळ, सौ. उषा वसंत शुक्ल आदींचा समावेश होता. प्रातिनिधीक मनोगत स्मिता मुजुमदार, बाजीराव जोर्वेकर, सुरेखा पालवे यांनी मांडले. सचिन जोशी यांचा सन्मान प्रतिष्ठानचे सचिव डॉ. कैलास कमोद यांनी केला. तसेच परिचय निलेश तिवारी यांनी केला.        
सदस्य कविता कर्डक, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास हावरे, कार्याध्यक्ष रंगनाथ शिरसाठ, कोषाध्यक्ष मधुकर बनकर, सहसेक्रेटरी डॉ. जयराम खोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलांबरी क्षिरसागर यांनी केले. तर आभार प्रदर्शन रंगनाथ शिरसाठ यांनी केले.






No comments:

Post a Comment