Thursday 5 September 2019

भाषणासाठी प्रमाणभाषेचा आग्रह धरू नका ; बोलीभाषेतून व्यक्त व्हा ! : डॉ. जगदीश कदम


लातूर येथील अमित कदम नांदेड विभागीय फेरीचा मानकरी !
दि. ४ (नांदेड) : वक्तृत्व विकासाकरिता वाचन व चिंतनाची गरज असते, त्याकरीता आपल्या प्रमाणभाषेची गरज नाही, तुम्ही तुमचा अभ्यास व विचार आपल्या बोलीभाषेचा वापर करून देखील व्यक्त करू शकता. प्रमाणभाषेचे ओझे अंगीकारण्याची काही गरज नाही, असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या नांदेड विभागीय फेरीचा पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. जाधव, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, कोषाध्यक्ष शिवानंद सुरकूतवार, सदस्य बापू दासरी, कल्पना डोंगळीकर, डॉ. मनोरमा चव्हाण, डॉ. विशाल पतंगे, नामदेव दळवी, जर्नलसिंग गाडीवाले, श्रीकांत मांजरमकर, दासराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील ७६ विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेला परीक्षक म्हणून सुचेता पाटील, अॅड. राजा कदम व महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - अमित रामराव कदम, महात्मा बसवेश्वर कॉलेज, लातूर, द्वितीय क्रमांक - नितीन माधवराव कसबे, राजीव गांधी कॉलेज, नांदेड, तृतीय क्रमांक - अलमास अमीन शेख, फार्मसी कॉलेज, नांदेड, उत्तेजनार्थ क्रमांक - आशिष साडेगावकर, डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय, कळमनुरी, जि. हिंगोली व कृष्णा व्यंकट तिडके, राजीव गांधी महाविद्यालय, नांदेड.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, पीपल्स कॉलेजचे डॉ. विशाल पतंगे, अक्षय पतंगे, सौरभ करंडे, दिनेश तोटावाड, विजय घायार, अविनाश काळकेकर आदींनी परिश्रम घेतले.







No comments:

Post a Comment