click here, to watch full video
अभिजीत अनिल खोडके प्रथम, तर ऐश्वर्या एस.भद्रे द्वितीय...
मुंबई १८ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे आयोजित 'यशवंत
शब्दगौरव' राज्यस्तरीय अंतिम फेरी बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९
रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या
कार्याध्यक्षा व खासदार सुप्रियाताई सुळे तसेच सरचिटणीस श्री. शरद काळे यावेळी
उपस्थित होते.
यशवंत शब्दगौरव राज्यस्तरीय स्पर्धा ९
विभागामध्ये घेण्यात आली,
त्यामध्ये ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम
पारितोषिक अभिजीत अनिल खोडके (सीपी अॅन्ड बेरार कॉलेज नागपूर ) यांना १५,००० रुपये
रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर दुसरा क्रमांक ऐश्वर्या एस. भद्रे
(मुंबई विद्यापीठ ) १०,००० रुपये रोख रक्कम व मानचिन्ह व तिसरा क्रमांक शुभम सतीश
शेंडे (एस.एम. जोशी कॉलेज,
हडपसर) ह्यास ७,०००
रुपये रोख व मानचिन्हे तसेच उत्तेजनार्थ म्हणून जीवन प्रकाश गावंडे (श्री शिवाजी
आर्ट व कॉमर्स,
अमरावती), गणेश ज्ञानदेव लोळगे (एएमजीओआय, कोल्हापूर ), श्रुती अशोक बोरस्ते ( एचपीटी कॉलेज, नाशिक), अभिजीत अंबारास जाधव ( एसएमटी, सीएचएम
कॉलेज,
मुंबई) व तेजस दिनकर पाटील (मॉर्डन कॉलेज, पुणे ) ३००० रोख
रुपये व मानचिन्ह देण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या
कार्याध्यक्षा व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले की यावेळी ही
स्पर्धा ९ विभागीय केंद्रामध्ये घेण्यात आली होती, आता
पुढील वर्षी अजून जळगाव,
चंद्रपूर व सोलापूर या तीन केंद्रामध्ये तसेच पणजी व
बेळगावचाही सहभाग करण्यात येईल. पुढील वर्षी ‘महाराष्ट्र ६० वर्षांचा इतिहास’
हा विषय घेऊन ही स्पर्धा राबविण्यात येईल असेही त्या बोलताना म्हणाल्या.
लायब्ररीची संख्या कमी होत चालली आहे अशी खंतही त्यांनी व्यक्ती केली व विजेत्या
स्पर्धकांचे अभिनंदन केले. प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी यशवंतराव चव्हाण
यांचा वक्तृत्व स्पर्धेचा किस्सा सांगून विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता वाढवली.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून कोमल कुंभार, सचिन परब व आनंद क्षेमकल्याणी यांनी
पाहिले.
यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व
स्पर्धेचा निकाल..
१. प्रथम पारितोषिक : अभिजित अनिल खोडके
( सी.पी.अँन्ड बेरार कॉलेज, नागपूर )
२. द्वितीय पारितोषिक : ऐश्वर्या एस.
भद्रे ( मुंबई विद्यापीठ )
३. तृतीय पारितोषिक : शुभम सतीश शेंडे (
एस.एम. जोशी कॉलेज,
हडपसर)
उत्तेजनार्थ पारितोषिक
१. जीवन प्रकाश गावंडे ( श्री. शिवाजी आर्ट आणि कॉमर्स, अमरावती)
२. गणेश ज्ञानदेव लोळगे ( एएमजीओआय, कोल्हापूर )
३. श्रुती अशोक बोरस्ते ( एचपीटी कॉलेज, नाशिक )
४. अभिजीत अंबारास जाधव ( एसएमटी सीएचएम
कॉलेज,
मुंबई)
५. तेजस दिनकर पाटील ( मॉर्डन कॉलेज, पुणे )
No comments:
Post a Comment