Thursday 26 September 2019

विश्वास ग्रृपतर्फे शनिवारी ज्ञानेश्वर कासार यांच्या गायनाचे आयोजन...


दि. २७ सप्टेंबर, नाशिक : नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वासहा अनोखा उपक्रम विश्वास ग्रृप तर्फे सुरू करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून,विश्वास ग्रृप चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक आहेत व संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
शनिवार दि. २८ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६.३० वा. नव्या पिढीतील गायक ज्ञानेश्वर कासार यांच्या गायनाचे आठवे पुष्प गुंफले जाणार आहे. डॉ. आशिष रानडे (हार्मोनियम), रसिक कुलकर्णी (तबला) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे करणार आहेत.
अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास गार्डन शेजारी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी ग्वालियर घराण्याच्या सौ. स्वाती देशमुख आणि श्री. राजेश पुराणिक यांच्याकडे ज्ञानेश्वर कासार यांचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण झाले. पुढील शिक्षण पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं.श्री. सुरेश वाडकर यांच्याकडे झाले. तिथुनच त्यांच्या सांगितिक प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली. सद्या किराणा घराण्याचे पं. अविराज तायडे यांच्याकडे
गायकीचे पुढील शिक्षण सुरू आहे. संगीतकार श्री. संजय हांडे, संगीतकार श्री. श्रीकृष्ण चंद्रात्रे आणि श्री. श्रीनिवास खळे यासारख्या जेष्ठ-श्रेष्ठ संगीततज्ञांचे सुगमसंगीतासाठीचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले. संगीत विशारद आणि संगीत भूषण या परिक्षेत्र केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.
संगीतातील एन.ई.टी. (नेट) ही परीक्षा देखील सलग दोनवेळा उत्तीर्ण झाले आहेत. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक असून. गायनासोबतच संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही विशेष कार्य केले आहे. अनेक नाटके, आकाशवाणीवरील मालिका, ध्वनिमुद्रिका, रंगमंचीय कार्यक्रम यांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मुसाफिर का सफरनामाउर्दु/गझल ध्वनिफित तसेच, ‘आनंदाचे डोहही भक्तिरचनांची ध्वनिफित प्रकाशित झालेली आहे. मराठी आणि हिंदी गजल क्षेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीमार्फत दिला जाणारा गजल गायक या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment