नाशिक दि. २८ : शब्द आणि शब्दातील आशय
स्वरांतून निथळतांना होणारी रूणझूण रसिकांना आनंद देत होती आणि गाण्यातील गोडवा
अनोखी स्वरानुभुती देत होता. शब्दसूरांतून ओठांवर रेंगाळणारी जाणीव रसिकांनी अलगद
आणि नकळतपणे जपूनही ठेवली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे
आठवे पुष्प गायक ज्ञानेश्वर कासार यांनी गुंफले. डॉ. आशिष रानडे (हार्मोनियम), रसिक कुलकर्णी (तबला),
श्रीपाद घोलप (तानपुरा), जागृती नागरे (तानपुरा), यांनी
साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक रानडे व डॉ. स्मिता मालपुरे यांनी
केले. ‘विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना
विनायक रानडे यांची आहे.
मैफीलीची सुरूवात ‘राग
मियांकी तोडी’
या रागाने केली. शब्द होते ‘अब तो मोरे राम’ यातून
अल्हाददायक वातावरण निर्माण झाले. शब्दांची, लयीची नजाकत यातून समोर आली. त्यानंतर
बंदिश सादर केली. ‘मै सन लागी’,
आर्तता आणि आठवणींचा माहौल याची वीण अलगद उसवली गेली. या
बंदिशीनंतर ज्ञानेश्वर कासार यांनी आपली रचना सादर केली. ‘कासे
कहु मन की बिचरा’तून मनाची खोलवर अवस्था व्यक्त झाली. सुरांची ही मैफल राग अहिर
भैरव रागापर्यंत येऊन ठेवली. प.अविराज तायडे यांची रचना सादर झाली. शब्द होते ‘आवरे
अव शाम’ मैफीलीचा समारोप पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या
अभंगांनी केला. अभंग होते ‘सुखाचे जे सुख, चंद्रभागे तटी, पुंडलीका
पाठी उभे ठाके’
व ‘अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके’.
सदर कार्यक्रम अॅडमिनिस्ट्रेटीव्ह
डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास
गार्डन शेजारी,
विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय
कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यात संगीत
विषयात डॉक्टररेट पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.आशिष रानडे, नृत्य
विषयात डॉक्टररेट मिळाल्याबद्दल डॉ. सुमुखी अथनी, नवी
दिल्ली येथील स्वर्ण भारत ट्रस्ट तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘नेक्स्ट
जनरेशन अवॉर्ड’
मिळाल्याबद्दल विजया लक्ष्मी मणेरीकर यांचा सन्मान अनुक्रमे
सी.एल. कुलकर्णी,
डॉ. मनोज शिंपी, पं. अविराज तायडे यांच्या शुभहस्ते
करण्यता आला. कलाकारांचा सन्मान पं. जयंत नाईक, श्रीराम
तत्त्ववादी,
एन.सी. देशपांडे, मोहन उपासनी, माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात
आला.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान,
मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक,
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक,
सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
No comments:
Post a Comment