चित्रपट चावडी
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान मुंबई,
विभागीय केंद्र नाशिक व
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक,
विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक,
सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या
संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’
उपक्रमांतर्गत शुक्रवार ६ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३०
वाजता सुप्रसिद्ध आईसलँड दिग्दर्शक बेनेडीक्ट एरलींगसन यांचा ‘वुमन
अॅट वॉर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड
ट्रेनिंग हब,
ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक
येथे दाखविण्यात येणार आहे.
हाला ही साधारण पन्नाशीतील बाई कॉयर
कंडक्टर व पर्यावरण अॅक्टीव्हीस्ट आहे. तिचे पर्यावरण प्रेम तिला भलतेच
आव्हानात्मक आणि जोखमीची कामे करण्यास प्रवृत्त करते. तिच्या ह्या घातक
कृत्यांमुळे आईसलँडचे सरकार व बहुराष्ट्रीय धातु कंपन्या चक्रावून जातात. त्यात
हाला एका युक्रेनीयन मुलीला दत्तक घेऊ इच्छिते. पर्यावरणातील बदलामुळे होणारे दुष्परिणाम
व ते थांबविण्यासाठी सज्ज झालेली हाला व तिचे वैयक्तीक आयुष्य, अशी थरारक व विनोदी कथा नक्कीच बोधक व रंजक आहे. २०१८ साली
प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १०१ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त
संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष
विश्वास ठाकूर,
सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment