Thursday 5 September 2019

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवार, दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता, मंगला हायस्कूल हॉल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त उपसचिव, नियोजन विभागाचे मुरलीधर नाले आणि संवादक सौ. धनश्री प्रधान-दामले या असतील. डॉ. शर्मिला पाटील, श्री. मंदार टिल्लू, श्री. संदीप पाटील, श्री. सचिन खैरनार, सौ. रुपाली कदम या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ठाणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुसकर आणि सचिव अमोल नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment