संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
‘महिला गौरव पुरस्कारा’ला
अभिनेत्री सीमा देशमुख यांची उपस्थिती...
यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्र महिला
व्यासपीठ तर्फे 'महिला गौरव पुरस्कार 'चे
आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे पहिलेच वर्ष होते. कार्यक्रमाची
सुरुवात शारदास्तवनाने व दीप प्रज्वलाने झाली. यानंतर संयोजिका रेखा नार्वेकर
यांच्या हस्ते प्रास्ताविक व ग्रंथ प्रदान करण्यात आले. महिला गौरव पुरस्काराच्या
सन्मानपत्राचे वाचन जयश्री आपटे यांनी केले. यंदाचा 'महिला
गौरव पुरस्कार' समाजसेवाव्रती श्रीमती अनुसया
पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच अॅड.
सविता प्रभुणे यांनी उपस्थित महिलांना भारतीय दंडविधान कलम ४९७ बद्दल मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती सीमा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची
सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment