अभिजात स्वरांनी रंगली पहाटेची मैफिल...
‘सूर विश्वास’
उपक्रमाचे द्वितीय पुष्प आशिष रानडे यांनी गुंफले. त्यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने मैफिलीत रंग
भरला. रानडे यांनी मैफलीची सुरूवात ‘बैरागी
भैरव’ रागातील विलंबित एक तालाने केली. शब्द होते पिया के घर..., त्यानंतर
त्यांनी छोटी तीन तालातील बंदिश सादर केली. वातावरणात सुमधूर तालाचा अनुभव होता. मैफिलीची सांगता ‘राम रंगी रंगले’ या
गीताने झाली. मैफिलीला साथसंगत ईश्वरी
दसककर (हार्मोनियम),
रसिक कुलकर्णी (तबला), तानपुरा साथ सिद्धार्थ निकम व हेमांगी
कटारे यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ध्वनी
व्यवस्था पराग जोशी यांची होती.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक,
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक,
ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८
कम्युनिटी रेडिओ,
विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न
झाला. या कार्यक्रमास शेफाली भुजबळ, किशोर पाठक, अनिल
लाड,
डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, सुरेखा
गोविलकर,
डॉ. हरी कुलकर्णी, सी.एल. कुलकर्णी, विवेक
केळकर,
माधुरी कुलकर्णी, संजय परांजपे, सतीश
गायधनी,
मिलींद धटींगण आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment