संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विज्ञानगंगाचे छत्तीसावे पुष्प ‘मेंदूतले डावे-उजवे’...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत छत्तीसावे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संशोधक डॉ. उज्ज्वला दळवी यांनी ‘मेंदूतले डावे-उजवे’ या विषयावर व्याख्यान दिले. मेंदूचे डावे-उजवे त्यांनी अगदी उत्तमरीत्या समजावून सांगितले. मेंदू कसा काम करतो, मेंदूचा डावा व उजवा भाग कसा कार्य करतो, प्रत्येक भागाकडे कोणते कार्य विभागून दिलेले असते याबाबतची संपूर्ण माहिती डॉ. उज्ज्वला दळवी यांनी आपल्या व्याख्यानातून दिली. त्यांनी माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले. शेवटी उपस्थितांना प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.








No comments:
Post a Comment