Monday 11 March 2019

शब्द सूर व कलावंतांच्या अनोख्या आठवणींनी रंगली ‘दिलखुलास मैफल गप्पांची’...


शब्द सूर व कलावंतांच्या अनोख्या आठवणींनी दिलखुलास गप्पांची मैफल रंगली

जीवन हा आस्वाद घेण्याचा स्वर्ग आहे आणि या स्वर्गात अनेक कवी, कलावंत, साहित्यिकांनी आपल्या विलक्षण अविष्काराने रसिकांना अवर्णनीय आनंद दिला आणि त्यातून अनेकांचे जीवन समृद्ध केले. ग.दि. मांडगुळकरांनी काव्य, गीतांतून जीवनगाणे जगासमोर आणले. गुलजारांनी कवितेतून सामान्य माणसाची अस्वस्थता आपल्या गीतांतून संवेदनशीलतेने रेखाटली. पुस्तकांचे जग त्यांनी आपल्या कवितांतून दाखवले. विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे, कवी बा.भ. बोरकर यांनी आपल्या लेखनातून गावाकडचं जग, चालीरीती विविध शब्दांतून मनावर रेंगाळत ठेवण्याचे काम ठेवले आहे.
यशंवतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत, समाजकारणाची दिशा दिली. कला-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण म्हणजे त्यांच्या विचारांची जोपासना होय.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलकर्णी यांच्या दिलखुलास-मैफल गप्पांचीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मिलिंद कुलकर्णी यांनी शब्द-सूरांच्या आठवणींनी संध्याकाळ सोनेरी केली. यावेळी मिलींद कुलकर्णी यांनी शांता शेळके, सुधीर मोघे, वैभव जोशी, लता मंगेशकर, वसंतराव देशपांडे यांच्या कलाकर्तुत्वाच्या आठवणींना उजाळा दिला.
स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. परिचय कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी करून दिला. मिलिंद कुलकर्णी यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांनी केला. सौ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांचा सन्मान विवेक केळकर यांनी केला.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे, डी.जी. हंसवाणी, साधना जाधव, सतिश गायधनी, रघुनाथ सावे, प्रसाद पाटील, संतोष पाटील, डॉ. हरी कुलकर्णी, रमेश बागुल आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment