कायदा साक्षरता कार्यशाळा संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
मुंबई व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १७
मार्च रोजी कायदा विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ‘कायदा साक्षरता कार्यशाळा’ टिळक
महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये कायद्याच्या
शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची उपयुक्तता, महिला व मुलांचे लैंगिक शोषण आणि
प्रतिबंधीत करण्यासाठी कायदेशीर तरतुद, प्रजननविषयक करार / करार विवाह इ., सरोगेसी प्रक्रिया संबंधित कायदेशिर पैलू, माहितीच्या
अधिकाराचे महत्त्व या पाच विषयांवर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये व्याख्याने आयोजित
करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र
देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला
फोरमचे सचिव विनायक कांबळे, अॅड.दिलीप तळेकर, अॅड. प्रॉस्पर डिसुजा, अॅड. भूपेश
सामंत, अॅड. डॉ. प्रकाश देशमुख, आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment