Thursday, 30 May 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी वॅगॅबॉण्ड


चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शुक्रवार ३१ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रान्स दिग्दर्शक अ‍ॅग्नेस वरदा यांचा वॅगॅबॉण्डहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
दक्षिण फ्रान्समध्ये ग्रामीण भागात एक तरूण मुलीचे प्रेत बर्फात गोठलेल्या अवस्थेत सापडते. तिच्या ओळखीबद्दल पोलीस अनभिज्ञ असतात. मग प्रवास सुरू होतो. तिच्या अनिर्बंध वागण्याचा, फिरण्याचा, तिच्या बेफीकीरीचा. दारिद्रय, गोठवून टाकणारी थंडी, भूक, असुरक्षितता यांच्याशी सामना करणारी कोण होती ही तरूणी? गुढ तसेच चक्रावुन टाकणारे अवहेलना व गैरवर्तनांना बळी पडणारे तिचे व्यक्तिमत्त्व चित्रपट संपल्यावरही तुमचा पाठलाग करत राहते. सन १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या फ्रेंच चित्रपटाचा कालावधी १०५ मिनिटांचा आहे.                          
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment