Sunday, 2 June 2019

अमेझिंग औरंगाबाद या प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद, इंस्टाग्राम वरील ग्रुप कलर्स ऑफ औरंगाबाद व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत अमेझिंग औरंगाबाद : द फोटोथॉनया छायाचित्र प्रदर्शनाचा चौथा टप्पा रविवार २ जून पासून चार दिवस एमजीएमच्या कला दीर्घा आर्ट गॅलरीत सुरू झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद चे अध्यक्ष अंकुशराव कदम, ज्येष्ठ कृषीतज्ञ विजय अण्णा बोराडे, डॉ.आर.आर.देशपांडे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, शिव कदम, विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.यावेळी सहभागी छायाचित्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
'अमेझिंग औरंगाबाद : द फोटोथॉन' ज्यामध्ये औरंगाबाद शहराचा ऐतिहासिक वारसा, स्थापत्य, रस्ते, खाद्यसंस्कृती आणि जीवसृष्टी यांचा त्यांच्या दृष्टीकोणातून दर्शन होते.
५५० हौशी छायाचित्रकारांनी या प्रदर्शनाकरिता आपले छायाचित्र पाठविले होते. त्यातील निवडक शंभरहून अधिक छायाचित्र प्रदर्शनाकरिता निवडण्यात आले आहे. यामध्ये स्ट्रीट, लॅण्डस्केप, वाईल्डलाईफ, पीपल अ‍ॅण्ड पोट्रेट यासारख्या विविध छायाचित्रांचा समावेश आहे. संपूर्ण कलाकृतींचा आस्वाद घायचा असल्यास पाच जून पर्यंत एमजीएम कला दीर्घा आर्ट गॅलरीला नक्की भेट द्या. प्रदर्शन सर्वांकरिता खुले आहे.
प्रदर्शनाचा यंदाच्या वर्षाचा आता समारोप आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर पाटील, सुबोध जाधव, आदित्य दिवाण, ऍड.स्वप्नील जोशी, निखिल भालेराव, आदित्य वाघमारे, संकेत कुलकर्णी, प्रवीण देशमुख, मंगेश निरंतर, दीपक जाधव आदींनी परिश्रम घेतले.






No comments:

Post a Comment