यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाशिक
विभागीय केंद्रातर्फे वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली
आहे. शनिवार दि. ११ मे व रविवार दि. १२ मे रोजी पहिली बॅच आणि सोमवार दि.१३ मे व
मंगळवार दि. १४ मे रोजी दुसरी बॅच होईल. सकाळी १० ते १ या वेळेत बेसिक कोर्स होईल.
दुपारी २ ते ५ या वेळेत ऍडव्हान्स कोर्स होणार असून त्यात कापडावर आणि
मातीच्या पॉटवर वारली पेंटिंग कसे करायचे
हे शिकविण्यात येणार आहे. क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर
येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीचे
अभ्यासक संजय देवधर हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांमध्ये ५ ते ७५
वयोगटातील कलाप्रेमींना सहभागी होता येईल. बेसिक आणि ऍडव्हान्स आणि कॉम्बो कोर्स
असे या कोर्सचे स्वरूप आहे. कार्यशाळेत सहभागी होताना पेन्सिल, पाण्यासाठी
बाऊल, जुना रुमाल आणि पॅड आणावे. सहभागी सर्वांना आवश्यक साहित्य, पुस्तक
व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी राजू देसले ७७२००५२५७२, सचिन हांडे ७७२००५२५५७, ज्ञानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८ व विनायक रानडे ९९२२२२५७७७ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी कार्यशाळेत सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील शाश्वत कला शिकून कलानिर्मिती करण्याचा आनंद मिळवावा असे आवाहन आहे.

No comments:
Post a Comment