Thursday 16 May 2019

क्रिस्तोफर नोलन यांच्या ‘डंकिर्क’ चित्रपटाचे प्रदर्शन...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचालीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत शनिवार, दि. १८ मे २०१९ रोजी सायं. ६ वा. क्रिस्तोफर नोलन यांचा डंकिर्कहा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.
ब्रिटिश-अमेरिकन-फे्रंच-डच यांची सहनिर्मिती असलेला डंकिर्कहा चित्रपट असून यामध्ये जॅक लोडेन, हॅरी स्टिल्स, एन्युरीन बर्नार्ड, जेम्स डी आर्सी, बॅरी किओहान, केनेथ ब्रानाघ, सिल्लियन मर्फी, मार्क रिलान्स आणि टॉम हार्डी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी क्रिस्तोफर नोलन यांना दिग्दर्शन करण्यासाठी प्रथम ऑस्कर नामांकन मिळाले आहे. दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आयमॅक्स फॉरमॅटमध्ये चित्रीत झालेला डंकिर्कहा चित्रपट बघण्यासाठी त्याच दर्जाचे थिएटर असणे गरजेचे असते. एमजीएमच्या फिल्म आर्टच्या चित्रपती व्ही शांताराम थिएटरमध्ये या सर्व सुविधा आहेत. त्यामुळे दुसर्या महायुद्धात डंकर्क या ठिकाणी घडलेला थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
चित्रपट सर्वांसाठी खुला असून चित्रपट रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,  कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, विजय कान्हेकर आदींनी केले आहे.




No comments:

Post a Comment