Sunday 12 May 2019

शाहिर अनंत फंदी यांच्या शहिरीतून समाज वास्तवाचे परखड़ प्रतिबिम्ब -प्रा शिरीष गंधे



महाराष्ट्रातील शाहिरांनी धीटपणाने सामाजिक वास्तव मांडले, विलक्षण भाषावैभव संवेदनशीलता यांचा अनोखा संगम त्यांच्या शाहिरीत दिसून येतो. अनंत फंदी यांची शाहिरी काळाचे नेमके चित्रण करणारी होती म्हणूनच ते द्र्ष्टे कलावंत होते.
त्यातूनच समाजाबरोबरच सामान्य माणसाचे दुःख, त्यांची हतबलता त्यांच्या काव्यात सहजपणे येते.
दागिन्यांची वर्णन करणारी 'चंद्रावळ' सारखी लावणी असो किंवा दुसऱ्या बाजीरावाला उद्देशून 'दोन दिसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको' त्यांच्यातील रोखठोक शाहिरीचे दर्शन घडवते असे प्रतिपादन प्रा. शिरीष गंधे यानी केले. प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्षानिमित्त अनंत फंदी-चरित्र व कार्य या विषयांवर सुप्रसिद्ध लेखक प्रा. शिरीष गंधे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. विश्वास ग्रुप चे कुटुंबप्रमुख, विश्वास ठाकुर कार्यक्रमाचे आयोजक होते. अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, येथे हा कार्यक्रम संपन्न झाला
शाहिरी लोककला ही समाजाचा आरसा आहे व त्यांचे जतन तसेच संवर्धन करणे म्हणजे अनंत फंदी यांचे खरे स्मरण होईलअसे ते म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत व् प्रास्ताविक प्रसाद विजय पाटील यानी केले. प्रा. गंधे यांचा सन्मान विनायक रानडे यांनी केला. अनिता गंधे यांचा सन्मान अनिता नेवे यानी केला.
















No comments:

Post a Comment