Sunday, 26 May 2019

मानवी नातेसंबंध, अपुरेपण यांचा अविष्कार ‘चार सख्य चोवीस’ मधून सादर




मानवी नातेसंबंध, जगण्याची उत्कटता, जगण्यातले वैविध्यपण, माणूस म्हणून जगण्याची नेमकी गरज, काळाला पूरून उरणा-या नात्यांची उपयुक्तता, काळाचा वेग आणि कौटुंबिक अस्वस्थता यांचा अनोखा वेध चार सख्य चोवीसकथांच्या अभिवाचनातून रसिक घेत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांच्या
ध्यानस्थकथेने अभिवाचनाची सुरुवात झाली. त्यानंतर सोनाली लोहार यांनी कालाय तस्मै नम:या कथेतून जगण्यातील गुंतवळ, अपुरेपण, आतली धुसपूस प्रभावीपणे मांडली. कथेतून आजूबाजूच चित्र जसेच्या तसे उभे राहत होते. संवादातील तरलता, भाषेचा स्वाभाविक वापर कथांची परिणामकारकता वाढवत होता.
सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, सोनाली लोहार या चौघी जणींनी हा कथा अविष्कार सादर केला. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक विनायक रानडे होते.
चार समविचारी, सहसंवेदना असणा-या मैत्रिणींनी कथामधून आजचं जगण्याचं नेमकं विश्व उभे केले. स्त्री लेखिकांनी अभिव्यक्तीचा नवा अविष्कार भाषेचे वेगळेपण घेऊन समोर आला.
हेमंत टकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,
स्त्रियांनी केलेले लेखन हे नवी उर्मी आणि गरज घेऊन निर्माण होत आहे. त्यातून समाजाचं नेमकं प्रतिबिंब पडत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. हरी विनायक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री शिंपी यांनी केले. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा सन्मान आ. हेमंत टकले यांनी, हर्षदा बोरकर यांचा सन्मान सारिका देशपांडे, निर्मोही फडके यांचा सन्मान विनायक रानडे, सोनाली लोहार यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांनी केला. आभार प्रदर्शन विनायक रानडे यांनी केले.






No comments:

Post a Comment