‘चित्रपट चावडी’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय
केंद्र नाशिक व
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास
ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८
कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत
शनिवार ४ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रान्स दिग्दर्शक अॅग्नेस
वरदा यांचा ‘जाकू’
हा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर
रेसिडेन्सी,
विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर
रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
ही अॅग्नेस वरदा यांच्या चित्रपट
दिग्दर्शक पती जॅक डेमी यांच्या बालपणाच्या गोष्टींवर आधारीत फिल्म आहे. लहानग्या
जाकूला नाटक,
सिनेमा,
पपेट्सचे आकर्षक आहे. फ्रान्समधील एका गावात त्याच्या वडीलांचे
मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्याने लहानपणीच ठरविले की आपण चित्रपट दिग्दर्शक
व्हायचे. इकडे दुसर्या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. जाकू कॅमेरा मिळवतो आणि
त्याचा स्वप्नवत प्रवास सुरू होतो, अशा विलक्षण प्रवासाची ही गोष्ट आहे.
सन १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या
फ्रेंच चित्रपटाचा कालावधी १२० मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त
संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष
विश्वास ठाकूर,
सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य
सौ.कविता कर्डक,
राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment