Thursday, 5 September 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी वुमन अ‍ॅट वॉर




चित्रपट चावडी
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार ६ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध आईसलँड दिग्दर्शक बेनेडीक्ट एरलींगसन यांचा ‘वुमन अ‍ॅट वॉर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
हाला ही साधारण पन्नाशीतील बाई कॉयर कंडक्टर व पर्यावरण अ‍ॅक्टीव्हीस्ट आहे. तिचे पर्यावरण प्रेम तिला भलतेच आव्हानात्मक आणि जोखमीची कामे करण्यास प्रवृत्त करते. तिच्या ह्या घातक कृत्यांमुळे आईसलँडचे सरकार व बहुराष्ट्रीय धातु कंपन्या चक्रावून जातात. त्यात हाला एका युक्रेनीयन मुलीला दत्तक घेऊ इच्छिते. पर्यावरणातील बदलामुळे होणारे दुष्परिणाम व ते थांबविण्यासाठी सज्ज झालेली हाला व तिचे वैयक्तीक आयुष्य, अशी थरारक व विनोदी कथा नक्कीच बोधक व रंजक आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १०१ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.



शिक्षक दिन


आदर्श माणूस तयार करणे हे शिक्षणाचे मुलभूत कार्य - सचिन उषा विलास जोशी
नाशिक : शिक्षण हे कौशल्यधारीत असले पाहिजे व विद्यार्थ्याला आवडीनुसार शिकता आले पाहिजे. त्याला जास्तीत जास्त चुका करण्याची संधी द्यायला हवी. परीक्षेतील गुणांवर आयुष्याची किंमत ठरवणे म्हणजे त्याच्यातील हुशारीला लगाम घालणे होय. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील आंतरीक आवडीचा शोध घेऊन त्याला आदर्श माणूस बनवणे हेच शिक्षणाचे मूलभूत काम आहे असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ सचिन उषा विलास जोशी यांनी केले.
शिक्षण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक, विश्वास कम्युनिटी रेडिओ ९०.८ एफ. एम., विश्वास गार्डन, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमधील सेवानिवृत्त व उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी,
विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ञ सचिन उषा विलास जोशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,

भाषणासाठी प्रमाणभाषेचा आग्रह धरू नका ; बोलीभाषेतून व्यक्त व्हा ! : डॉ. जगदीश कदम


लातूर येथील अमित कदम नांदेड विभागीय फेरीचा मानकरी !
दि. ४ (नांदेड) : वक्तृत्व विकासाकरिता वाचन व चिंतनाची गरज असते, त्याकरीता आपल्या प्रमाणभाषेची गरज नाही, तुम्ही तुमचा अभ्यास व विचार आपल्या बोलीभाषेचा वापर करून देखील व्यक्त करू शकता. प्रमाणभाषेचे ओझे अंगीकारण्याची काही गरज नाही, असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या नांदेड विभागीय फेरीचा पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. जाधव, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, कोषाध्यक्ष शिवानंद सुरकूतवार, सदस्य बापू दासरी, कल्पना डोंगळीकर, डॉ. मनोरमा चव्हाण, डॉ. विशाल पतंगे, नामदेव दळवी, जर्नलसिंग गाडीवाले, श्रीकांत मांजरमकर, दासराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील ७६ विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेला परीक्षक म्हणून सुचेता पाटील, अॅड. राजा कदम व महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - अमित रामराव कदम, महात्मा बसवेश्वर कॉलेज, लातूर, द्वितीय क्रमांक - नितीन माधवराव कसबे, राजीव गांधी कॉलेज, नांदेड, तृतीय क्रमांक - अलमास अमीन शेख, फार्मसी कॉलेज, नांदेड, उत्तेजनार्थ क्रमांक - आशिष साडेगावकर, डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय, कळमनुरी, जि. हिंगोली व कृष्णा व्यंकट तिडके, राजीव गांधी महाविद्यालय, नांदेड.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, पीपल्स कॉलेजचे डॉ. विशाल पतंगे, अक्षय पतंगे, सौरभ करंडे, दिनेश तोटावाड, विजय घायार, अविनाश काळकेकर आदींनी परिश्रम घेतले.







शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवार, दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता, मंगला हायस्कूल हॉल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त उपसचिव, नियोजन विभागाचे मुरलीधर नाले आणि संवादक सौ. धनश्री प्रधान-दामले या असतील. डॉ. शर्मिला पाटील, श्री. मंदार टिल्लू, श्री. संदीप पाटील, श्री. सचिन खैरनार, सौ. रुपाली कदम या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ठाणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुसकर आणि सचिव अमोल नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Monday, 2 September 2019

गणपती मूर्ती कार्यशाळा संपन्न...


गणेश चतुर्थी हा दहा दिवसांचा हिंदू उत्सव असून गणपती चा सन्मान करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
इको-फ्रेन्डलीचा शाब्दिक अर्थ पृथ्वीसाठी अनुकूल आहे किंवा पर्यावरणाला हानिकारक नाही असा आहे.
प्राचीन काळापासून लोक शेतीतील चिखलाचा वापर करुन स्वतःची गणेश मूर्ती तयार करुन त्यांची पूजा करीत होते. पण अखेरीस फार्म मातीची जागा प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इतर हानिकारक पेंट्सने घेतली. ज्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागला. परंतु सध्या आपण आपल्या मुळांकडे परत जात आहोत, मूर्ती तयार करण्यासाठी चिखल (चिकणमाती) वापरत आहोत. म्हणूनच जेव्हा मूर्ती नैसर्गिक जल संस्थांमध्ये विसर्जित केली जातात तेव्हा त्यामध्ये विरघळली जातात आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
इको फ्रेंडली मूर्ती बनविण्याकरिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून साकार सृजन तर्फे घेण्यात आलेली गणपती कार्यशाळा  यशस्वीरित्या घेण्यात आली. प्राची घाणेकर पूजा शिंदे आणि अनिकेत विश्वासराव यांनी ही कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला ८० विद्यार्थी उपस्थित होते.








भाषण पाठांतर करून नाही,तर आत्मसात करून करा : चंद्रकांत कुलकर्णी


यशवंत शब्दगौरव मुंबई विभागीय फेरीची प्राची जोशी मानकरी !

दि. ३१ (मुंबई) : भाषणकला तुमचे आयुष्य घडवते परंतु पाठांतर करून बोलणे म्हणजे भाषण नव्हे, भाषण करतांना तुमचे विचार आणि भूमिका स्पष्टपणे दिसल्या पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उभे राहते. तुमच्या व्यक्तिमत्वात ठामपणा येतो. आताच्या सोशल मीडियावरील ट्रोलर्स च्या काळात तुमच्यातील ठामपणा आणि विवेकी विचारांची गरज आहे. ती अंमलात आणा, तुमच्या मनातील विचार हे भाषण कलेतून मांडा, पाठांतर करून नव्हे, असे आवाहन प्रसिद्ध नाट्य-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियान व मराठी विभाग, रामनारायन रुईया स्वायत्त महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या मुंबई विभागीय फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनीष हाटे, नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. लीना केदारे, विजय कसबे उपस्थित होते.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यातील ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून जयदेवी स्वामी, दीपा कदम, अस्मिता मोहिते, महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या मुंबई विभागीय फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक : प्राची श्रीकांत जोशी, के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली,
द्वितीय क्रमांक : अभिजीत जाधव, सी. एच. एम. महाविद्यालय, उल्हासनगर,
तृतीय क्रमांक : प्रतीक पवार, रुईया महाविद्यालय, माटुंगा,
उत्तेजनार्थ : प्राजक्ता जाधव, रुईया महाविद्यालय व
प्रचिती परब, डी.जी. रुपारेल महाविद्यालय
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, अनघा पेंडसे, रमेश मोरे, मनीषा खिल्लारे, डॉ. अमित नागरे, मीनल सावंत, विवेक कनावजे, महेश साळवी, रणजीत बायस आदींनी परिश्रम घेतले.







कोकणातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वात भाषेचा गोडवा अधिक - शेखर निकम


महाड येथील लक्ष्मण कचरे रत्नागिरी विभागीय फेरीचा मानकरी

दि.३० (चिपळूण) : वक्तृत्व कलेत भाषेचा वापर हा अतिशय महत्वाचा असतो. वाचन,चिंतन व संवादातून तुमची भाषेबद्दलची समज अधिक समृद्ध होत जाते. कोकणाला विचारवंत, लेखक, साहित्यिक, राजकीय वक्ते यांची मोठी परंपरा आहे आणि कोकणात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचाही एक वेगळा गोडवा आहे. तोच गोडवा आजच्या पिढीतील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही कायम आहे असे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र चिपळूण चे अध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व सह्याद्री शिक्षण संस्थेचे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. चिपळून येथे शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी, सकाळी १० वा. मुख्य सभागृह, सह्याद्री शिक्षण संस्थेचे महिला विद्यालय, चिपळूण येथे विभागीय फेरी संपन्न झाली. याप्रसंगी निकम बोलत होते. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. टी वाय. कांबळे व प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - लक्ष्मण विठ्ठल कचरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, जि. रायगड,
द्वितीय क्रमांक - प्रतीक प्रभाकर गमरे, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय, मार्गताम्हाणे,
तृतीय क्रमांक - संकेत जयंत लाड, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, दहिवली,
उत्तेजनार्थ क्रमांक - अनिकेत विनायक कांगणे, गोखटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी व कौस्तुभ हेमंत फाटक, देव घैसास किर वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, विभागीय केंद्र रत्नागिरीचे सचिव अभिजीत खानविलकर,
विश्वनाथ कांबळे, सुनील घोडेकर, संदेश संसारे आदींनी परिश्रम घेतले.